लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रे

लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रे

कृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे आता प्रारूपापासून प्रत्यक्ष उपकरणापर्यंत पोचत असून, शेतीची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच काटेकोरपणा आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. इर्लहॅम संस्थेतील डॉ. झोऊ यांच्या गटातील संशोधकांनी इले येथील जीज ग्रोअर्स या कंपनीसाठी काढणी यंत्रामध्ये शिकण्याची क्षमता विकसित करणारा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याला ‘एअरसर्फ लेट्यूस’ असे नाव दिले आहे. सध्या लेट्यूस (पालक) पिकासाठी विकसित केलेल्या यंत्रामध्ये योग्य ते बदल केल्यास भविष्यामध्ये अन्य पिकांसाठीही त्यांचा वापर करणे शक्य असल्याचा संशोधकांचा दावा आहे. इंग्लंड येथील पूर्व अॅंगलिया भागामध्ये लेट्यूस उत्पादन हा मोठा व्यवसाय आहे. प्रतिवर्ष सुमारे १.२२ लाख टन उत्पादन घेतले जाते. उत्पादन व काढणी प्रक्रियेतील अकार्यक्षमता आणि मानवी चुका यामुळे यातील सुमारे ३० टक्के उत्पादन खराब होते. हे अत्याधुनिक तंत्राने टाळणे शक्य झाले तर आर्थिकदृष्ट्या मोठा फरक पडू शकतो.

  • शेतकऱ्यांना आपले पीक नेमके काढणीयोग्य झाले की नाही, हे अचूकपणे समजणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक ओळीमध्ये किंवा रोपाजवळ जाऊन तपासत बसणे हे वेळखाऊ आणि कष्टदायक होते. यासाठी मनुष्यबळही अधिक लागत असे.
  • त्याचप्रमाणे वाहतूक, व्यापार आणि विक्रीसाठी नियोजन करणे अडचणीचे होते.
  • दुसरा एक अडसर म्हणजे वातावरणातील बदल. गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातील बदलांमुळे पीक खराब होण्याची किंवा पक्वतेसाठी कमी अधिक वेळ घेण्याची शक्यता असे.
  • या अडचणीवर यंत्राच्या साह्याने मात करण्याचा प्रयत्न डॉ. जी झोऊ यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधक अॅलन बाऊर आणि अरॉन बोस्ट्रॉम यांनी केला आहे. त्यांनी एअरसर्फ तंत्रज्ञान विकसित केले असून, यंत्रामध्ये सखोल शिकण्याची क्षमता अंतर्भूत केली आहे. त्यात आईसबर्ग लेट्यूस पिकाच्या हवेतून घेतलेल्या उच्च दर्जाच्या प्रतिमांचे विश्लेषण करण्याचे तंत्र बसवले आहे. त्यातून पक्व पानांची संख्या, त्यांचे स्थान या बरोबरच त्याचा लहान मोठा आकार व दर्जाही अचूकतेने ओळखता येणार आहे.
  • या यंत्रणेची जोड जीपीएस तंत्रासोबत केल्याने शेतातील काढणीस तयार लेट्यूसचे नेमके वितरण कळू शकते.
  • संशोधनाचे उद्योग भागीदार जीज ग्रोअर्सचे नावीन्यपूर्णता व्यवस्थापक जेकब किरवान यांनी सांगितले, की पर्यावरणदृष्ट्या शाश्वत पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता वेगाने वाढत आहे. कोणत्याही टप्प्यावर पिकाची नासाडी होणे आता परवणारे नाही. त्यामुळे मोठ्या फार्ममध्ये शेती करताना अचूकता आणण्यासाठी स्वतः शिकणारी यंत्रे आवश्यक आहेत. या एअरसर्फ तंत्रज्ञानाने ही उणीव भरून काढण्यास मदत होईल. शेतातील वेगवेगळी वाढ शेतकऱ्यांना समजू शकते. त्यावरून निविष्ठा आणि सिंचनाचे नियोजन करणे शक्य होते.
  • हे संशोधन ‘हॉर्टिकल्चर रिसर्च’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com