agricultural stories in Marathi, Technowon, Livelihood improvement through Ecosystem-based Wetland Management | Agrowon

तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले ३२ टक्के उत्पन्न

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 ऑगस्ट 2021

परिसंस्थेवर आधारित पाणथळ जमीन व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत बराकपूर येथील बेलडांगा तलावामध्ये शास्रीय पद्धतीने मत्स्य उत्पादन घेण्यात आले.

बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य संशोधन संस्था पाणथळ जमिनीवर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी संस्थेद्वारे ‘आयसीएआर डब्ल्यू ३ प्रकल्प’ आणि अनुसूचित जमाती आराखड्याच्या आधारे परिसंस्थेवर आधारित पाणथळ जमीन व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत बराकपूर येथील बेलडांगा तलावामध्ये शास्रीय पद्धतीने मत्स्य उत्पादन घेण्यात आले.

बेलडांगा बराकपूर मच्छीमार संघटना १९५८ पासून बेलडांगा तलावाचे व्यवस्थापन पाहत आहे. मॉन्सून काळामध्ये या तलावाचा आकार घोड्याच्या नालाप्रमाणे होऊन सुमारे ६२ हेक्टरपर्यंत वाढतो. मात्र या तलावामध्ये माशांसाठी अखाद्य अशा पानवनस्पतींचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पाण्यामध्ये सूर्यप्रकाश व ऑक्सिजन मिसळले जाण्यात अडचणी येतात. परिणामी माशांमध्ये रोगांचे प्रमाण वाढत आहे. याचा अंतिम आर्थिक फटका हा मच्छीमार संघटनेला बसत आहे. या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य संशोधन संस्थेची मदत घेण्यात आली. या संस्थेने २०१९ मध्ये हा तलाव दत्तक घेऊन स्थानिक लोकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लोकांच्या शिक्षणासाठी या तलावामध्ये १० गुंठे क्षेत्रावर सुधारित पद्धतीने पिंजऱ्यातील मत्स्यपालन प्रकल्पाची उभारणी केली.

मत्स्य प्रकल्पाची उभारणी 

 • प्रकल्पाचा मुख्य उद्देश तलावातून अधिक मत्स्य उत्पादन घेऊन मच्छीमारांचे जीवनमान उंचावणे हा होता.
 •  साधारणपणे १० गुंठे क्षेत्रावर केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य संशोधन संस्थेने विकसित केलेले ५ पिंजरे लावण्यात आले.
 •  मत्स्यपालनासाठी भारतीय प्रमुख कार्प आणि चायनीज कार्प (गवत्या मासा) जातींच्या माशांचे संगोपन करण्यात आले.
 •  तीन महिन्यांनंतर माशांची लहान पिल्ले तळ्यामध्ये सोडण्यात आली.
 •  संगोपन कालावधीत माशांना वाढीनुसार खाद्यपुरवठा आणि आवश्यकतेनुसार रोगप्रतिबंधक औषधांचा वापर करून शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करण्यात आले.
 •  प्रकल्पाच्या उभारणीसोबतच संस्थेने मच्छीमारांसाठी क्षमता विकास कार्यक्रमांचे आयोजन केले. मच्छीमारांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
 •  मच्छीमारांना मत्स्यबीज, खाद्य आणि बांबूंचे आदी गोष्टींची पूर्तता करण्यात आली.

उत्पादन 

 •  मागील वर्षी पूर्ण प्रकल्पामधून साधारणपणे २८ हजार ३०७ किलो मासे उत्पादन मिळाले. हेक्टरी साधारण ६२९ किलो मत्स्य उत्पादन मिळाले.
 •  या प्रकल्पामुळे बैराकपूर मच्छीमार संघटनेला साधारणपणे ३२ टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन मिळाले.
 •  या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये साधारणपणे ६ हजार १९० किलो मासे उत्पादन मिळाले. कोरोनामुळे लावलेल्या निर्बंधांमुळे जास्त काळ मासेमारी करणे शक्य झाले नाही. तरीही उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले.
 •  तळ्यामध्ये सोडण्यात आलेल्या गवत्या या कार्प जातीच्या माशांमुळे नैसर्गिकरीत्या तळ्‍यातील पानवनस्पतींचे निर्मूलन होण्यास मदत झाली. तसेच वर्षअखेरीस त्यांच्या वजनातही वाढ झाल्याचे आढळले.
 •  चांगले उत्पादन मिळाल्यामुळे मच्छीमारांनी मत्स्यबीज निर्मितीसाठी आणखी २ पिंजरे तळ्यामध्ये लावले. असे लोकसहभागातून एकूण सात पिंजरे लावण्यात आले.

प्रकल्पाचे झालेले फायदे 

 •  शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक मत्स्य उत्पादन मिळण्यास मदत झाली.
 •  तळ्यातून मिळालेल्या वाढीव मत्स्य उत्पादनामुळे मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
 •  संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, तलावाच्या भागातील लोकांचे मासे खाण्याचे प्रमाण हे ५३ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन असे आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त असल्याचे आढळून आले.
 •  स्थानिक लोकांच्या पौष्टिक अन्नाची गरज भागत आहे.
 •  तलाव परिसरातील स्थानिक लोकांचे होणारे स्थलांतर आणि सामाजिक ताण-तणाव कमी होण्यास मदत झाली.

(स्रोत : आयसीएआर- केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य संशोधन संस्था, बराकपूर (कोलकाता)


इतर टेक्नोवन
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...