agricultural stories in Marathi, technowon, machine for plantation & intercropping | Page 2 ||| Agrowon

यंत्राने करा पेरणी, आंतरमशागत

वैभव सूर्यवंशी
बुधवार, 10 जुलै 2019

सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही भागांत लवकर पेरणी झालेल्या ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू होतील. पेरणी आणि आंतरमशागतीसाठी सुधारित अवजारांचा वापर केला तर निश्चितपणे कमी श्रम आणि वेळेवर कामे पूर्ण करणे शक्य आहे.

सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही भागांत लवकर पेरणी झालेल्या ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू होतील. पेरणी आणि आंतरमशागतीसाठी सुधारित अवजारांचा वापर केला तर निश्चितपणे कमी श्रम आणि वेळेवर कामे पूर्ण करणे शक्य आहे.

पेरणी यंत्रे ः
बैलचलित बहुपीक टोकण यंत्र :
१) सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग, सूर्यफूल, तूर इत्यादी पिकांची टोकण करता येते.
२) बियाण्याबरोबरच दाणेदार खत २५ ते ७०० किलो प्रतिहेक्टरी शिफारशीनुसार देता येते.
३) पिकाच्या आवश्यकतेनुसार दोन ओळींतील अंतर २२.५, ३० किंवा ४५ सें.मी. राखता येते.
४) ओळींतील रोपांत साधारणतः शिफारशीनुसार योग्य अंतर राखता येते. याकरिता प्रत्येक पिकासाठी वेगळ्या तबकड्या टोकण यंत्राबरोबर उपलब्ध असतात.

ट्रॅक्टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र :
१) भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी, मका, तूर इ. पिकांची टोकण करता येते.
२) बियाण्याबरोबरच दाणेदार खत शिफारशीनुसार देता येते.
३) दोन ओळींतील अंतर : २२.५ ते ४५ सें.मी.
४) फणांची संख्या : ५ ते ९ (दोन ओळींतील अंतराप्रमाणे)
५) ओढण शक्ती : ३५ एच.पी. ट्रॅक्टर
६) कार्यक्षमता : ३ ते ३.५ हेक्टर प्रतिदिन

ट्रॅक्टरचलित सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र ः
१) हे यंत्र ५५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
२) यंत्राने बियाण्याची टोकण ४.३२ सें.मी. खोलीवर करता येते. या यंत्राने होणाऱ्या कामाची रुंदी १८० सें.मी. एवढी करता येते.
३) सदर यंत्राद्वारे एका तासात ०.४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते.
४) यंत्राद्वारे सरी-वरंबा पद्धतीने बियाण्याची लागवड करण्यासाठी सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते.

आंतरमशागतीची अवजारे ः
दातेरी हातकोळपे :
१) पिकाच्या दोन ओळींत आंतरमशागत करण्यासाठी, मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे-पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो.
२) मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते.
३) कोळप्याचे पाते १५ सें.मी. लांबीचे असते, त्यामुळे दोन ओळींत १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकामध्ये या कोळप्याने निंदणी, खुरपणी करता येते.
४) कोळप्यामुळे साधारणपणे ३ सें.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते.
५) सर्व प्रकारच्या पिकांत आणि सर्व प्रकारच्या हलक्या, मध्यम, तसेच भारी जमिनीत कोळपे सारख्या क्षमतेने वापरता येते.
६) हातकोळप्याचे वजन ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते. एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी-खुरपणी करू शकतो.

सायकल कोळपे :
१) याचा उपयोग १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी, खुरपणी करण्यासाठी होतो.
२) ५ ते ७ सें.मी.पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते.
३) एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी सहजपणे करू शकतो.

ट्रॅक्टरचलित ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र :
१) ऊस तोडणीनंतर शेतात प्रतिहेक्टरी सरासरी ८ ते १० टन पाचट जमिनीवर पसरलेले असते. या पाचटाचा वापर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी होतो.
२) पाचटापासून खत तयार करण्यासाठी ८ ते १० महिने कालावधी लागतो. पाचटाचे शेतामध्ये छोटे छोटे तुकडे करून ते कुजविण्यासाठी जीवाणूसंवर्धक, शेणकाला आणि नत्रयुक्त खताची प्रक्रिया करावी लागते. यानंतर तीन ते साडेतीन महिन्यांत पाचट कुजण्याचे काम पूर्ण होते.
३) रोटाव्हेटरसदृश यंत्र तीन फुटांच्या खोडव्यात वापरून सरीतील पाचटाचे १० ते १५ सें.मी. बारीक तुकडे करता येतात.
४) यंत्रामधील पुढच्या बाजूला असलेल्या रोलरमुळे पाचट सरीत दाबले जाते. रोटरवर मधल्या भागात बसविलेली ‘जे’ आकाराची पाती पाचटाचे तुकडे करीत जातात.
५) यंत्राच्या दोन्ही बाजूंस बसविलेली ‘एल’ आकाराची पाती वरंब्याच्या बगलेची माती काढतात. ही माती पाचटासोबत थोड्या प्रमाणात मिसळली जाते.
६) यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरांवरील पाचटाचे तुकडे करता येतात. खोडव्याच्या वरंब्यालगतची माती काढल्यामुळे जारवा तोडला जातो.
७) ज्या शेतकऱ्यांकडे रोटाव्हेटर आहे, त्यांनी फक्त पाती बदलली, तर कमी खर्चात यंत्र तयार होते.

भेंडी तोडणी कात्री :
१) भेंडीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळहात आणि बोटांना त्यामुळे इजा होते. भेंडी काढण्यासाठी मजूर नाखूश असतात.
२) भेंडी तोडण्याच्या कात्रीचा वापर केल्यास हातांना त्रास होत नाही.
२) एका मजुराद्वारे दिवसाला ५० ते ६० किलो भेंडी सहजपणे काढता येते. भेंडी काढण्याचा खर्च कमी होतो.

भुईमूग शेंगा तोडणी चौकट ः
१) यामध्ये २ x १ x १ आकाराची चौकट असून, त्यावर उलट्या ‘व्ही’ आकाराचे दाते लावले आहेत.
२) शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूरशक्ती व वेळ यांची बचत होते.
३) चार स्त्री मजूर एकाच वेळी या शेंगा तोडणी चौकटीवर काम करू शकतात.
४) शेंगा तोडणीची क्रिया शेंगांसाहित असलेल्या वेलाला तोडणी चौकटीवर ओढता मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
५) चौकटीमुळे हाताने शेंगा तोडण्यापेक्षा जवळ जवळ चारपट शेंगा तोडणी जास्त होते.
६) साधारणपणे हाताने शेंगा तोडताना एक स्त्री मजूर ३० ते ३५ किलो शेंगा एका तासात तोडते. तीच स्त्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साहाय्याने १२० ते १३० किलो शेंगा एका तासात तोडते.

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र :
१) एका तासात एक मजूर सरासरी ५० ते ६० किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
२) शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम, पैसा वाचतो.
३) यंत्राने शेंगा फोडल्यास ६ ते ८ टक्के फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
४) यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

मका सोलणी यंत्र :
१) यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीतून खेड्यातील कारागीरही यंत्र तयार करू शकतो.
२) आकाराने लहान व वजनाने हलके, त्यामुळे हातात सहजपणे आणि जास्त श्रम न पडता धरता येते.
३) आठ तासांत साधारणपणे दोनशे किलो वाळलेली कणसे सोलून होतात.
४) लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणि वेळेची बचत करणारे हे यंत्र आहे.

वैभव विळा :
१) या विळ्याने ज्वारी, गवत इत्यादी कापणी जमिनीलगत करता येते.
२) दातेरी पात्यांमुळे या विळ्याला धार लावायची गरज नाही.
३) वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असून, समतोल साधून सहज कापणी होते.
४) एका तासामध्ये २ गुंठ्यांची कापणी करता येते.

संपर्क ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ (कृषिशक्ती आणि अवजारे), कृषिविज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कढीपत्ता भुकटी निर्मितीकढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर...
धान्य, बियाणे साठवणुकीसाठी झिल्ले,...महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांत अनेक...
निर्वातात पदार्थ तळण्याचे तंत्रज्ञान तळलेले पदार्थ हे आपल्या आहाराचा एक भाग आहे....
सागरी पवनचक्क्यांच्या उभारणीतील...गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या...
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेकांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार...
बेकरी प्रक्रिया उद्योगासाठी उपकरणेप्रामुख्याने तृणधान्यावरील प्रक्रिया उद्योगामध्ये...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर...
जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...
यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...
जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...
दुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...