agricultural stories in Marathi, Technowon, New food freezing concept improves quality, increases safety and cuts energy use | Page 2 ||| Agrowon

नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

गोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी आयसोकोरिक फ्रिजिंग या नव्या अन्न गोठवण प्रक्रियेकडे वळण्याची आवश्यकता अमेरिकन कृषी विभाग आणि कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे.

गोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी आयसोकोरिक फ्रिजिंग या नव्या अन्न गोठवण प्रक्रियेकडे वळण्याची आवश्यकता अमेरिकन कृषी विभाग आणि कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. यामुळे ऊर्जेमध्ये मोठी बचत होणार असून कर्बवायू उत्सर्जनही कमी राहण्यात मदत होईल. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘रिन्युएबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी रिव्ह्यूज’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जर जागतिक पातळीवर गोठवण प्रक्रियेमध्ये योग्य ते बदल करणे शक्य झाले तरी ऊर्जेतील बचत प्रति वर्ष ६.५ अब्ज किलोवॉट -तास इतकी असू शकेल. त्याच प्रमाणे कर्बवायूचे उत्सर्जन (जे या ऊर्जेच्या निर्मिती प्रक्रियेतून होते) ते ४.६ अब्ज किलो इतके कमी होईल. हे प्रमाण रस्त्यावरून धावणाऱ्या सुमारे १० लाख कार इतके असेल. अशी माहिती अमेरिकन कृषी संशोधन सेवेच्या अन्न तंत्रज्ञ क्रिस्टिना बिलबायो -सैन्झ यांनी दिली.

असे होतील नव्या तंत्राचे फायदे

  • या नव्या तंत्राच्या स्वीकारासाठी अन्न उत्पादन आणि गोठवण प्रक्रियेसाठीच्या उपकरणे आणि पायाभूत सुविधांमध्ये फारच थोडे बदल करावे लागणार आहेत. फक्त प्रक्रिया उद्योजकांनी नव्या तंत्र आणि पद्धतींचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे.
  • आयसोकोरिक फ्रिजिंग ही नवीन गोठवण पद्धत असून, त्याचा वापर पदार्थ सील असताना किंवा प्लॅस्टिक, धातू किंवा अन्य कोणत्याही भांड्यामध्ये असताना (अगदी त्यात पाण्यासारखा द्रव असतानाही) वापरता येते.
  •  पारंपरिक गोठवण प्रक्रियेमध्ये अन्नपदार्थ हे हवेमध्ये ठेवले जाते आणि घनपदार्थांची गोठवण ३२ अंश फॅरनहाइटपेक्षा तापमानावर केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नव्या तंत्रज्ञानामध्ये अन्नपदार्थांचे रूपांतर बर्फात करण्याची आवश्यकता राहत नाही.
  • त्याच प्रमाणे जोपर्यंत द्रवामध्ये खाद्यपदार्थ ठेवलेला असतो, तोपर्यंत त्यामध्ये बर्फाचे स्फटिक तयार होत नाहीत. बहुतांश अन्न गोठवणीमध्ये हा धोका असतो.
  • त्याच प्रमाणे या प्रक्रियेमध्ये पदार्थांची गोठवण संपूर्ण घनपदार्थ होईपर्यंत केली जात नाही. त्यामुळे नव्या प्रक्रियेमुळे ऊर्जेमध्ये मोठी बचत साधते.
  • आयसोकोरिक फ्रिजिंग हे ताज्या पदार्थाच्या साठवणीसाठीही चांगले उपयुक्त ठरते. उदा. टोमॅटो, स्वीट चेरीज आणि बटाटे इ. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा प्रदूषण नष्ट होते.

शेतकऱ्यांपासून अन्न प्रक्रिया उद्योगांपर्यंत आणि पुढे वितरण प्रणालीतील सर्व घटक या आयसोकोरिक फ्रिजिंग तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. ही पद्धती घरातील फ्रिजरमध्ये चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकते. हे सर्व कोणताही अतिरिक्त खर्च न करता साध्य होऊ शकते.
- तारा मॅकह्यूज, संचालक, डब्ल्यूआरआरसी केंद्र.

संशोधन आणि पेटंट
आयसोकोरिक फ्रिजिंग तंत्रज्ञानाचा विकास पहिल्यांदा कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील जैववैद्यकीय अभियंते बोरीस रूबिन्स्की यांनी पुनर्रोपणासाठी स्नायू आणि अवयव चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी केला. मात्र अन्न प्रक्रियेमध्ये या तंत्राचा वापर करण्यासाठी कृषी संशोधन सेवा आणि विद्यापीठ प्रयत्न करत असून, त्याचे संयुक्त पेटंट घेण्यात येणार आहे. यातून गोठवण अन्न उद्योगासाठी वेगवेगळी उपयोजना विकसित करणे शक्य होणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रसार करण्यासाठी ते व्यावसायिक भागीदाराचाही शोध घेत आहेत.

 


इतर टेक्नोवन
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...