केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय पिकांच्या कलमीकरणाचे नवे तंत्र

केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी एकलबीजपत्री वनस्पतींचे कलम करण्याची अनोखी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये गवतवर्गीय पिके केळी, भात, गहू यांसारख्या पिकांच्या बियांतील गर्भाचे स्नायू वापरले जाते. यामुळे नव्या पिकामध्ये उपयुक्त गुणधर्म उदा. रोग प्रतिकारकता, ताण सहनशीलता इ. आणणे सोपे होणार आहे.
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय पिकांच्या कलमीकरणाचे नवे तंत्र
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय पिकांच्या कलमीकरणाचे नवे तंत्र

एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले. सामान्यतः एका स्थानिक किंवा मुळे चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या वनस्पतींची मूळखंडावर दुसऱ्या अपेक्षित जातींच्या वनस्पतींच्या फुटव्यांचे, डोळ्याचे, दांडीचे कलम केले जाते. मात्र गवतवर्गीय वनस्पतींमध्ये कलम करणे जवळपास अशक्य मानले जाते. कारण हा गट मोनोकोटिलेडॉन्स (monocotyledon) मध्ये येत असल्यामुळे त्यात त्यांच्या खोडामध्ये संवहनी कॅम्बियम या विशिष्ट स्नायूंची कमतरता असते. ही समस्या दूर करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या बिया किंवा सुरुवातीच्या गर्भ अवस्थेतील मुळे व फुटव्यांचे स्नायू वेगळे मिळवून त्यांचे एकत्रीकरण (कलम) करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्याची माहिती ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित केली आहे. एकदल वनस्पतीमध्ये कलम करता येत नाही

  • एकदल किंवा एकल बीजपत्री वनस्पतींना शास्त्रीय भाषेमध्ये मोनोकोटिलेडॉन्स म्हणतात.
  • या गटातील कोणत्याही वनस्पतीमध्ये गर्भावस्थेमध्ये एकच बीजपान असून, फुले येतात.
  • पाने अधिक असली तरी त्यात समांतर शीर असेत. त्यांची फुले तीन भागांमध्ये विभागलेली असतात.
  • या गटात एकूण ६० हजार वनस्पती येतात. उदा. विविध प्रकारची गवते, लिली, नारळ, ऑर्किड, केळी इ.
  • त्यातील भात, गहू, बार्ली, ऊस यांसारख्या अनेक वनस्पती पीक म्हणून मोठ्या क्षेत्रात घेतल्या जातात.
  • त्यामुळे या संशोधनामुळे अशा पिकांची कलमे करण्याचा मार्ग खुला होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
  • द्विदल वनस्पतींमध्ये कलमे करणे शक्य द्विदल किंवा द्विबीजपत्री वनस्पतींना शास्त्रीय भाषेमध्ये डिकोटीलेडॉन्स म्हणतात. त्याचा अर्थ दोन बीज पाने असलेला, फुले येणाऱ्या वनस्पतींचा गट. सफरचंद, चेरी, टोमॅटो अशा अन्य द्विबीजपत्री वनस्पतींचे एकमेकांवर कलम करणे शक्य होते. त्यामुळे मुळांचा चांगला विस्तार होणाऱ्या वनस्पतींवर दुसऱ्या अपेक्षित फुटव्याचे कलम केले जाते. यामुळे अधिक उत्पादन, लवकर फुलोरा येणे, तसेच रोग, कीड प्रतिकारकता इ. गुणधर्म पुढे नेता येतात. केळीसारख्या पिकासाठी होईल फायदा जगभरातील केळी पीक व त्यावरील उद्योग हे प्रामुख्याने एकाच केळी जातीवर (कॅव्हेंडिश बनाना) अवलंबून आहेत. ही जात दीर्घ प्रवासामध्येही तग धरू शकते. त्यामुळे निर्यातक्षम असलेल्या या एकाच जातींची लागवड जगभरामध्ये प्रामुख्याने केली जाते. परिणामी, त्यातील जैवविविधताच राहिलेली नाही. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सध्या केळी निर्जंतुक करण्यावर भर दिला जात आहे. मात्र भविष्यात ते पुरेसे ठरणार नाही. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नव्या प्रतिकारक जातींचा विकास करण्याची आवश्यकता आहे. १) केळीसारख्या पिकामध्ये पनामा या मातीतून पसरणाऱ्या रोगांचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यात केळी पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंब्रिज विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागातील प्रो. ज्युलियन हिबार्ड यांनी सांगितले, की गवतवर्गीय वनस्पतीमधील गर्भावस्थेतील स्नायूंचे कलम करण्याचा मार्ग यातून खुला होणार आहे. आमच्या माहितीनुसार सध्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून वेगळ्या झालेल्या पण मूलतः एकाच वनस्पतीच्या गटातील कोणत्याही वनस्पतींचे कलम या तंत्राद्वारे करणे शक्य होईल. २) एकाच प्रकारातील दोन वेगळ्या प्रजातींचेही कलम करता येईल. जनुकीयदृष्ट्या मुळे आणि अंकुर, फुटवे वेगळी असलेल्या वनस्पतींपासून नव्या गुणधर्मांच्या जाती तयार करता येतील. उदा. बुटके फुटवे, रोग, किडींना प्रतिकारकता इ. अननस, केळी, कांदा, खजूर यांसारख्या पिकामध्ये या कलम पद्धतीचा वापर करणे शक्य आहे. हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी यापैकी एका वनस्पतींच्या मुळामध्ये चमकदार रंग (डाय) इंजेक्शनद्वारे सोडला. तो कशा प्रकारे सरकत वर फुटव्यापर्यंत येतो. येताना कलम जोडातून कसा पुढे जातो, हे पाहता आहे. ३) या संशोधनाचे प्रथम संशोधक डॉ. ग्रेग रिव्हज यांनी सांगितले, की कलमांच्या संदर्भातील जगभरामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचा अभ्यास संदर्भासाठी करताना एकच बाब सातत्याने पुढे येत होती, ती म्हणजे दोन मोनोकॉट्स मध्ये कलम शक्य नाही. आजवर जे अशक्य असल्याचे सांगितले जात होते, ते शक्य करण्यात आम्हाला यश आले आहे. केळीसारख्या अन्य पिकांमध्येही रोगांचा तीव्र प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होण्याच्या टोकावर पोहोचत आहे. अशा वेळी रोग प्रतिकारकता आणण्यासाठी वेगळ्या मुळांवर त्यांचे कलम करण्याची तातडीची आवश्यकता भासत आहे. ४) या संशोधनासाठी ब्रिटन येथील पाच विद्यापीठे आणि तीन संशोधन संस्थांनी एकत्रित येऊन चालवलेल्या सेरेस अॅग्री टेक या ज्ञान विनिमय भागीदारी प्रकल्पाने अर्थसाह्य केले आहे. केंब्रिज एन्टरप्राइज अंतर्गत या कलमीकरण तंत्राच्या पेटंट हक्कासाठी अर्ज केलेला आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com