agricultural stories in Marathi, Technowon, New method improves detection of harmful microscopic parasites in water | Agrowon

पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण तपासण्यासाठी सोपे तंत्र

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श येथील संशोधकांनी पाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांचा ओळख पटवण्यासाठी CRISPR तंत्राचा वापर केला आहे. या नव्या तंत्रामुळे पाणी तपासणी अत्यंत वेगवान, स्वस्त आणि सोपी होणार आहे. हे संशोधन ‘वॉटर रिसर्च’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श येथील संशोधकांनी पाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांचा ओळख पटवण्यासाठी CRISPR तंत्राचा वापर केला आहे. या नव्या तंत्रामुळे पाणी तपासणी अत्यंत वेगवान, स्वस्त आणि सोपी होणार आहे. हे संशोधन ‘वॉटर रिसर्च’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जिवाणूमध्ये काही विशेष समस्या निर्माण झाल्यास स्वतःमध्ये काही अत्यावश्यक जनुकीय बदल करण्याची क्षमता नैसर्गिकरीत्या असते. त्याला CRISPR तंत्र असे म्हणतात. या विशिष्ट क्षमतेमुळे जिवाणू आणि आर्चिई सूक्ष्मजीव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतो. याच त्यांच्या क्षमतेचा वापर करून पाण्यातील हानिकारक जिवाणूंची ओळख पटविण्याचे तंत्र सिडनी येथील जैव वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रो. इवा गोल्डी यांनी तयार केले आहे. आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या या संशोधनामुळे एका साध्या उपकरणाच्या साह्याने पाण्यातील क्रिप्टोस्पोरिडिअम यासारख्या सूक्ष्मजीवांची जिवंत किंवा मृत स्वरूपामध्येही ओळख पटवता येते. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाण हानिकारक पातळीपेक्षा कमी आहे, की अधिक याची माहिती मिळवता येते. या नव्या तंत्रामुळे अन्य जिवाणू आणि विषाणूंच्या शोधही सोपा होऊ शकतो. मात्र त्यावर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

क्रिप्टोस्पोरिडिअम हे सूक्ष्म परजीवी असून, त्यामुळे पोटांचे विकार उद्‍भवू शकतात. ते प्रामुख्याने जंगली किंवा पाळीव प्राण्यांच्या वावर अधिक असलेल्या पाण्याच्या स्रोतामध्ये आढळतात. दीर्घकाळाच्या दुष्काळानंतर पडलेल्या मोठ्या पावसामध्ये पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात या सूक्ष्मजीवांमुळे प्रदूषित होऊ शकतात.

स्वस्त, वेगवान आणि सोपे

  • सध्या क्रिप्टोस्पोरीडिअम सूक्ष्मजीवांची ओळख पटवण्यासाठी प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने न्यावे लागतात. त्यासाठी महागडी यंत्रे व उपकरणे वापरावी लागतात. त्या तुलनेमध्ये नव्याने विकसित केलेले तंत्र अत्यंत सोपे व वेगवान असून, प्रत्यक्ष जागेवरही नमुने तपासणे शक्य होते. यामध्ये खर्चात बचत होते.
  •  केवळ थोड्याशा प्रशिक्षणानंतर विश्लेषणाचे तंत्र शिकून घेता येण्याएवढे सोपे आहे.
  •  नमुन्यामध्ये क्रिप्टोस्पोरिडिअम जिवाणू असल्यास ते लक्षणीयरीत्या चमकदार रंगात स्पष्टपणे दिसतात.
  •  अगदी प्रत्येक सूक्ष्मजीवही वेगळा पाहणे व ओळखणे शक्य होऊ शकते. 
     

या नव्या तंत्रामध्ये एक साधा प्लेट रीडर वापरला जातो. त्यात CRISPR तंत्रज्ञानावर आधारित क्रिप्टोस्पोरिडिअम ओसिस्टच्या बाह्य पृष्ठभागावर असलेली विशिष्ट प्रथिने ओळखता येतात. यामुळे पाणी तपासण्याचा खर्च अत्यंत कमी होऊ शकतो. सध्या सांडपाण्यातील विविध विषाणूंच्या तपासणी आणि ओळख पटवण्यासाठी किमान ११ तासांपेक्षा अधिक काळ लागतो. तोही या नव्या तंत्राने नक्कीच कमी करता येईल. सध्या पाण्याचे नमुने घेणे व ते प्रयोगशाळेपर्यंत नेणे यात जाणारा वाहतुकीचा काळही अधिक आहे. तोही येथे कमी करता येऊ शकतो.
- प्रो. इवा गोल्डी, जैव वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सिडनी


इतर टेक्नोवन
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...