कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे परिणाम जाणता येतील अचूकपणे

वातावरण बदलामुले उत्पादनातील घटीचे प्रमाण हे वेगवेगळे सांगितले जाते.अशा वेळी इल्लिनॉइज विद्यापीठातील दोन अर्थशास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन माहिती विश्‍लेषणाची अचूक पद्धती विकसित केली आहे. या नव्या संख्याशास्त्रीय प्रणालीमुळे स्थाननिहाय, अचूक विश्‍लेषण व माहिती उपलब्ध होऊ शकेल.
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे परिणाम जाणता येतील अचूकपणे
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे परिणाम जाणता येतील अचूकपणे

गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी चर्चा होत आहे. पिकांच्या उत्पादनामध्ये होणारी घट ही बहुतेक शास्त्रज्ञांकडून अधोरेखित केली जात आहे. मात्र प्रत्येक शास्त्रज्ञांकडून दिले जाणारे उत्पादनातील घटीचे प्रमाण हे वेगवेगळे असल्याने सर्वसामान्य, शेतकरी आणि धोरणकर्ते यांच्यासाठीही उपाययोजना कशा प्रकारे करायच्या, याविषयी अडचणी निर्माण होत आहेत. अशा वेळी इल्लिनॉइज विद्यापीठातील दोन अर्थशास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन माहिती विश्‍लेषणाची अचूक पद्धती विकसित केली आहे. या नव्या संख्याशास्त्रीय प्रणालीमुळे स्थाननिहाय, अचूक विश्‍लेषण व माहिती उपलब्ध होऊ शकेल. वातावरण बदल व त्यामुळे होऊ घातलेले पिकांचे नुकसान या बाबत व्यक्त केले जाणारे विविध अंदाज आपण पाहिले तर नक्कीच गोंधळात पडल्याशिवाय राहणार नाही. काही शास्त्रज्ञांकडून वाढलेल्या तापमानाचे वाईट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते, तर काही वाढलेले कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण उत्पादनामध्ये वाढीसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे सांगतात. त्याविषयी माहिती देताना इल्लिनॉइज विद्यापीठातील कृषी व ग्राहक अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि वातावरण, प्रादेशिक, पर्यावरण आणि व्यापार अर्थशास्त्र केंद्राचे संचालक सॅण्डी डाल'इब्रा यांनी सांगितले, की हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हे अत्यंत सावकाश होणारी प्रक्रिया आहे. मात्र गेल्या शतकापासून औद्योगिकीकरणाच्या वाढलेल्या वेगाने त्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यांचे शेतीवरील परिणाम सांगताना अभ्यासकांमध्ये एकमत होण्याची शक्यता नाही. प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असून, वेगवेगळ्या अहवालातून प्रकाशित होतात. त्याचा फायदा होण्यापेक्षा शेतकरी, ग्राहक आणि धोरण कर्ते यांचा गोंधळ होण्याचीच शक्यता अधिक आहे. प्रो. सॅण्डी डाल'इब्रा व त्यांची पीएच.डी.ची विद्यार्थिनी चांग चाई यांनी आजवर प्रकाशित झालेल्या अनेक संशोधन पेपर व त्यातील माहितीचे एकत्रीकरण केले. वातावरण बदलांचे अमेरिकेतील वेगवेगळ्या प्रांतातील शेतीमालाचे मूल्य आणि त्यापासून मिळणारे उत्पादन यांच्यावरील परिणाम मोजण्याचा प्रयत्न केला. प्रांतनिहाय अंदाज हे अचूकतेच्या जवळ जाऊ शकतात. त्याच प्रमाणे त्यांचा उपयोग स्थानिक धोरणकर्त्यांनाही होऊ शकतो. सॅण्डी डाल'इब्रा यांनी सांगितले, की अमेरिकेमध्ये अनेक प्रकारच्या शेतीमालाचे उत्पादन घेतले जाते. एक किंवा ठरावीक पशू किंवा पिकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आर्थिक घटकांवर होणारा परिणाम तपासणे तुलनेने सोपे ठरणार आहे. कारण प्रत्येक घटकांचे मूल्य हे शेवटी पैशांमध्ये मोजता येते. देशातील प्रत्येक प्रांतातील शेतीक्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा योग्य आढावा घेणे व तुलना करणे शक्य होईल. त्यानंतर संशोधनाचे किंवा अभ्यास विषयाचे नेमक्या स्थानानुसार त्याचे विभाजन केले. या विभाजनानुसार निष्कर्षामध्ये पडणारे परिणाम जाणून घेण्यात आले. उदा. वातावरण बदलाच्या प्रत्येक संशोधनामध्ये अॅरिजोना प्रांतामध्ये तापमानात एक अंश सेल्सिअस किंवा फॅरनहिटने वाढ झाली तरी कृषी उत्पादनावर किती परिणाम होईल याचा काही अंदाज दिलेला असतो. त्याची तुलना इल्लिनॉइज प्रांतातील एक अंशाने तापमान वाढीच्या स्थितीमध्ये घटणाऱ्या उत्पादनाशी करता येऊ शकते. त्यातून फारच कमी ज्ञान पदरात पडते. उदाहरण म्हणून उच्च तापमान आणि कमी पाऊस किंवा मध्यम तापमान आणि खूप अधिक पाऊस अशा स्थितीतील पिकांवरील परिणाम जाणून घेण्यासाठी त्याचा काही फायदा होत नाही.

  • अलीकडे काही संशोधनामध्ये येणारे परिणाम आणि त्यांचे स्थानिक परिस्थितीतील नेमकेपणा वेगळा करण्याचा प्रयत्न होत आहे.
  • त्यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे अमेरिकेचे कोरडवाहू आणि बागायती यामध्ये विभाजन करून त्यावरील वातावरण बदलाचे परिणाम पाहणे. या पद्धतीने अॅरिझोना आणि इल्लिनॉइज प्रांताचे वेगवेगळ्या गटामध्ये अनेक तुकडे होतात. अॅरिझोना आणि मोन्टाना या दोन राज्यांवरील वातावरणाचे परिणाम एकच नसणार.
  • आणखी एक वेगळीच पद्धत वापरली जाते. ती म्हणजे कमी विरुद्ध अधिक उंचीवरील प्रदेशाची तुलना करणे.
  •  या सर्व प्रकाराच्या काही मर्यादा आहेत. त्यातून अचूकता
  • मिळण्यात अडचणी येतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे धोरणकर्त्यांना एकाच प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करावे लागणार आहे.
  • असे आहे संशोधन संशोधिका चांग चाई म्हणाल्या, की वातावरण बदलाचे भविष्यातील परिणाम जाणून घेताना त्यातील फरक जाणून घेणे महत्त्वाचे असते. एका कृषी विभागाचे दुसऱ्याशी, एका उत्पादनाचे दुसऱ्याशी तुलना करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे विभाग नेमके कसे पाडावेत, याबाबत अडचणी आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही संख्याशास्त्रीय तीन पद्धतीपैकी एका पद्धतीची निवड केली. सी लॅसो, कॅज्युअल फोरकास्ट अल्गोरिदम आणि जिओग्राफिकल वेटेड रिग्रेशन या तिन्ही पद्धती प्रामुख्याने माहितीवर आधारित असून, कोणत्याही गट किंवा विभागाशी त्यांचा काहीही संबंध नाही. सध्या या पद्धती ऊर्जा संवर्धन, मजुर बाजारपेठ अशा अन्य क्षेत्रामध्ये वापरल्या जातात. त्यांचा प्रथमच वातावरण बदलविषयक संशोधनासाठी वापर करण्यात आला आहे. या पद्धतीमध्ये माहितीतून कोणताही अर्थ काढण्याची आवश्यकता राहत नाही. माहिती स्वतःच स्पष्टपणे निर्देश करत असते. आपल्याला मिळालेले निष्कर्ष हे वेगवेगळ्या दिशेने असले तरी त्यांचे शेवटी रूपांतर आर्थिक बाबींमध्ये करण्यात येते. आर्थिक बाबी या स्वयंस्पष्ट असल्याने त्यात फेरफार करण्याच्या शक्यता कमी होतात.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com