एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल विनामशागत तंत्रातील तणनाशकांचा वापर

पिकांच्या योग्य फेरपालटासह एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा वापर केल्यास तणनाशकांचा वापर करण्याची गरजही कमी होते. एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीच्या वापरातून हे शेतकरी चांगल्या प्रकारे पीक उत्पादनामध्ये स्थिरता मिळवू शकतात. असा दिलासादायक निष्कर्ष पेन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे.
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल विनामशागत तंत्रातील तणनाशकांचा वापर
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल विनामशागत तंत्रातील तणनाशकांचा वापर

विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये फारच कमी वेळा नांगरणी केली जाते किंवा शक्यतो टाळली जाते. अशा ठिकाणी पिकांच्या योग्य फेरपालटासह एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा वापर केल्यास तणनाशकांचा वापर करण्याची गरजही कमी होते. एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीच्या वापरातून हे शेतकरी चांगल्या प्रकारे पीक उत्पादनामध्ये स्थिरता मिळवू शकतात. असा दिलासादायक निष्कर्ष पेन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. परदेशामध्ये विनामशागत शेतीमध्ये माती आणि ऊर्जेची बचत होत असली तरी ती प्रामुख्याने तणनाशकांच्या वापर, आच्छादन पिकांची लागवड आणि बहुवर्षायू पिकांवर अवलंबून असल्याचे मत सहयोगी प्रो. हिथर कार्स्टेन यांनी व्यक्त केले. मात्र यातून तणनाशकांचा वापर वाढत असल्याने अन्य धोक्यामध्ये वाढ होते. कार्स्टेन यांनी सांगितले, की शेतकरी मका आणि सोयाबीनच्या विनामशागत तंत्राने शेती करताना काही लोकप्रिय तणनाशकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र सातत्याने व अधिक विस्तृत प्रमाणातील तणनाशकांच्या वापरामुळे तणांमध्ये त्यांच्याप्रति प्रतिकारकता विकसित झाली आहे. आता ती तणनाशकांना दाद देईनाशी झाली आहेत. पेनसिल्वानिया राज्यातील विनामशागतीखाली असलेल्या पिकांपैकी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पीक क्षेत्रामध्ये अशा तणनाशक प्रतिकारक तणांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यांचे नियंत्रण शक्य होत नसल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. कार्स्टेन यांचा संशोधन गट एक दशकापेक्षा अधिक काळापासून दूध व्यवसायासाठी उपयुक्त शेती शाश्‍वत करण्यासंदर्भात अभ्यास आणि संशोधन करत आहे. त्यात अलीकडे त्यांनी एकात्मिक तण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. विनामशागत शेतीतील तणनाशकांचा वापर मर्यादित किंवा कमी करण्यासाठी त्यांनी चाचण्या सुरू केल्या. डेअरीशी संबंधित पीक फेरपालटामध्ये तणनाशकांचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी नऊ वर्षांपासून प्रयोग केले आहेत. या प्रयोगांमध्ये पदव्युत्तरचे विद्यार्थी हालैघ समर्स आणि जीवशास्त्राच्या प्रो. ग्लेना माल्कम आणि तणशास्त्राचे प्रो. विल्यम क्युरान यांचाही सहभाग होता. प्रयोग व निष्कर्ष ः फेरपालटामध्ये सोयाबीन, मक्यासोबत आच्छादन पिके आणि अल्फा अल्फा गवते तीन वर्षे, यानंतर हिवाळी कॅनोला हे मोहरीवर्गीय पीक. यात तणनाशकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मका आणि सोयाबीन काढून झाले की तेवढ्याच पट्ट्यात तणनाशक वापरले. त्यानंतर पिकांचे शिल्लक अवशेष आणि आंतरओळीत लागवड करणे, ओट्ससारख्या लहान धान्यांचे सहकारी पीक घेण्यासोबत वार्षिक अल्फाअल्फा गवत किंवा ऑर्चर्ड ग्रास. सहा वर्षांनंतर वार्षिक गवत काढून टाकण्यासाठी एकदाच मशागत करणे, ही पद्धत राबवली. या पद्धतीची तुलना नेहमीच्या तणनाशक आधारित तण व्यवस्थापन असलेल्या आणि सलग विनामशागत पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतांशी केली. दोन्ही पद्धतीतील सोयाबीन, मका आणि अल्फाअल्फा पिकाच्या पहिल्या दोन वर्षांतील तणांचे बायोमास मोजण्यात आले. या प्रयोगाचे निष्कर्ष नुकतेच ‘अॅग्रोनॉमी जर्नल’मध्ये प्रकाशित केले आहेत.

  • तणनाशकांच्या कमी वापरामुळे तणाचे बायोमास अधिक मिळाले. पुढे जसजसा तणनाशकांचा वापर आणखी कमी करत नेला, तरी अधिक तणे बायोमास मिळाले. या वाढलेल्या तणभारामुळे पिकाच्या उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे निव्वळ नफ्यामध्येही कोणताही फरक पडला नाही.
  • जिथे तणनाशकांचा वापर कमी केला होता, तिथे प्रति अल्फाअल्फाचा चारा अधिक मिळाला आणि तणभारही जास्त होता. मात्र दुसऱ्या वर्षी त्याचे प्रमाण कमी झाले.
  •  पिकाचे उत्पादन आणि निव्वळ नफ्यातील फरक बहुतांश पिके आणि वर्षामध्ये सारखाच असल्याचे दिसून आले.
  • यावरून एकात्मिक पद्धतीने केलेल्या तणनियंत्रणामुळे तणनाशकांचा वापर कमी करणे शक्य आहे.
  • या दीर्घकालीन अभ्यासामध्ये आम्ही तणनाशकांचा कमी करण्याची प्रात्यक्षिके घेतली. तणनाशकांचा वापर कमी करण्यासाठी पिकांचे विविधतेने फेरपालटीसह विविध पद्धतींचा अवलंब केला. पिकांच्या वाढवलेल्या विविधतेमुळे तणांचा उद्रेक कमी करणे शक्य झाले. त्याच प्रमाणे तणामध्ये निर्माण होत असलेली तणनाशकांप्रतिची प्रतिकारकता रोखणे शक्य झाले. या एकात्मिक पद्धतीमुळे अधिक शाश्‍वत आणि पर्यावरण पूरक पद्धतीने बऱ्यापैकी स्थिर उत्पादन घेता येते. - प्रो. हिथर कार्स्टेन, पेन स्टेट, अमेरिका

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com