ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन शेतीमाल बाजारपेठ

नागपूरच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान येथे प्रमुख वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या प्रगती गोखले यांनी पुढाकार घेतला. सॉफ्टवेअर विषयातील आपल्या तज्ज्ञतेचा वापर करत ‘मार्केटमिरची.कॉम’ हे ऑनलाइन पोर्टल तयार केले.
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन शेतीमाल बाजारपेठ
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन शेतीमाल बाजारपेठ

मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण उद्योजक त्याचा आपला शेतीमाल, उत्पादने विक्रीसाठी फारसा करत नाही. अशा वेळी नागपूरच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान येथे प्रमुख वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या प्रगती गोखले यांनी पुढाकार घेतला. सॉफ्टवेअर विषयातील आपल्या तज्ज्ञतेचा वापर करत ‘मार्केटमिरची.कॉम’ हे ऑनलाइन पोर्टल तयार केले. ग्रामीण अर्थकारण बदलणाऱ्या याच उपक्रमाची जागतिक पातळीवरही दखल घेण्यात आली असून, त्यांना नुकतेच ‘ग्लोबल वूमन ऑफ वर्थ ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. केंद्र शासनाच्या संस्थेत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान मध्ये कार्यरत असताना प्रगती गोखले यांना ग्रामीण औद्योगिक क्षेत्राच्या वाढीतील अडचणींचा अंदाज आला. त्यात सर्वांत मोठी अडचण ही विपणन असल्याचे जाणवले. हातातील मोबाइलच्या वापरातून डिजिटल मार्केटिंगचे मार्केटमिरची.कॉम हे व्यासपीठ तयार केले. त्यात सर्व ग्रामीण कृषी उत्पादने अंतर्भूत केली आहेत. नवीन वेब तंत्रज्ञानामध्ये विकसित केलेले हे पोर्टल डाउनलोड करावे लागत नाही. मात्र त्यात मोबाइलवर वापरण्यास सुलभ अशी रचना केली आहे. आपल्या कोणत्याही ग्रामीण उत्पादनाची यामध्ये आपण जाहिरात करू शकतो. जाहिरात पोस्ट केल्यावर त्वरित खरेदीदारांची लिंक पाठविली जाते. यामुळे ग्रामीण विक्रेते आणि खरेदीदार एकमेकांशी विनामूल्य थेट संपर्क साधू शकतात. हेच अन्य व्यावसायिक ‘ई-कॉमर्स’ कंपन्यापेक्षा त्याचे वेगळेपण आहे. हे स्वदेशी, बहुभाषिक वेब पोर्टल शेतकऱ्याची कृषी उत्पादन, उद्योजकांची ग्रामीण उत्पादने, ग्रामीण सेवा यांचा डिजिटल विपणनासाठी मदत करते. ‘मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग विथ मार्केटमिरची.कॉम’ ही चळवळ त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव डॉ. अनिल काकोडकर, विजय भटकर, विवेक सावंत आदी मान्यवरांनी केला आहे़. असा करा वापर मार्केटमिरची.कॉम वरील पोस्ट फ्री सेल अ‍ॅड बटणावर क्लिक करा. श्रेणी निवडा. आपण विक्री करू इच्छित असलेल्या उत्पादनाची माहिती द्या. आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर नोंदवून पासवर्ड तयार करा. पुढे आलेल्या माहिती भरत जा. शेवटी ‘पोस्ट ॲड’ या बटणावर क्लिक करा. आपली जाहिरात ‘मार्केटमिरची.कॉम’वर दिसू लागेल. ताबडतोब आपल्याला संपर्क करण्यासाठी खरेदीदारांची लिंक दर्शविली जाईल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर सर्व खरेदीदारांच्या जाहिराती दिसतील. या वैयक्तिक जाहिरातीवर क्लिक करताच संपर्क दिसेल. आपल्याला आवश्यक सर्व उत्पादनांसाठी खरेदीदार शोधण्यासाठी सर्च बटणही दिले आहे. आपण संपर्क साधत असलेल्या खरेदीदारांची संख्या आपल्या जाहिरातीची ‘अ‍ॅक्टिव्ह रँक’ वाढवेल. यामुळे अधिक खरेदीदार मिळण्याची शक्यता वाढेल.

  • देशभरातून सुमारे वीस हजार ग्रामीण उद्योजक, शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांना या माध्यमातून बाजारपेठ मिळविली आहे.
  • आयआयटी, मुंबईने या उपक्रमाला कृत्रिम बुद्धिमत्तेचे तांत्रिक बळ उपलब्ध केले आहे.
  •  राष्ट्रीय बांबू मिशनच्या विनंतीवरून बांबू आणि अन्य वन-उपजाच्या विपणनाचीही सुविधा उपलब्ध केली आहे.
  • विशेष म्हणजे या पोर्टलवरून थेट शेतकऱ्याकडून माल घेण्यासाठी बिग बास्केट, रिलायन्स रिटेलने पुढाकार घेतला आहे.
  • ग्लोबल वूमन ऑफ वर्थ ॲवॉर्ड ‘वर्ल्ड वूमन लीडरशिप काँग्रेस’ने जगभरातील ५० कर्तृत्ववान महिलांचा नुकताच सन्मान केला. यात विनामूल्य डिजिटल विपणनाद्वारे ग्रामीण डिजिटल सशक्तीकरणाच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी श्रीमती प्रगती गोखले यांना ‘ग्लोबल वूमन ऑफ वर्थ अवॉर्ड’ने सन्मानित केले. त्या भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या प्रधान वैज्ञानिक म्हणून त्या निवृत्त झाल्या असून, सध्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. प्रगती गोखले, ९८२२७१९६१८ --

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com