जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
टेक्नोवन
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून उद्योजकतेकडे
ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ भातशेतीऐवजी विविध भाजीपाला पिकांची लागवड त्यातही स्वर्ण अलौकीक या सुधारित जातीच्या भोपळ्याची लागवड केली.पुढे या सुधारित जातीची रोपे तयार करून विक्री करत उद्योजकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ भातशेतीऐवजी विविध भाजीपाला पिकांची लागवड करून पुढाकार घेतला. पुढे त्यांना पाटना येथील पर्वतीय प्रदेश कृषी पद्धती संशोधन केंद्रातील तत्कालीन पैदासकार डॉ. व्ही. एस. आर. कृष्णमूर्ती यांनी विकसित केलेल्या परवल (भोपळ्याचा एक प्रकार) च्या स्वर्ण अलौकिक आणि स्वर्ण रेखा या सुधारित जाती मिळाल्या. त्यातील स्वर्ण अलौकीक या सुधारित जातीच्या लागवडीतून चांगला फायदाही मिळाला. पुढे या सुधारित जातीची रोपे तयार करून विक्री करत आहेत. हळूहळू त्यांची वाटचाल उद्योजकतेकडे सुरू झाली आहे.
ओडिशा राज्यातील गौलीगोराडा (जि. पुरी) चंदन कुमार खुंटिया हे पूर्वी भुवनेश्वर येथे नोकरी करत असत. मात्र २०१४ मध्ये नोकरी सोडून आपली १२ एकर शेती करायला सुरुवात केली. पूर्वी या शेतामध्ये केवळ भातशेती होत असे. पाण्याची सुविधेसाठी एक शेततळे आणि कूपनलिका घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड सुरू केली. त्यामध्ये भोपळ्याचे काही प्रकार, कारली, ढोबळी मिरची, वांगी, चवळी अशा पिकांची समावेश होता. त्यात परवल नावाने ओळखला जाणाऱ्या भोपळ्याचा प्रकार होता. याच्या गडद रंग, जाड साल आणि कडक बिया यामुळे बाजारात फारशी मागणी होत नसे. त्यांच्या येथील स्थानिक कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदा पाटना (बिहार) येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन केंद्राला भेट देण्याचा योग आला. तिथे त्याला परवलच्या स्वर्ण रेखा आणि स्वर्ण अलौकिक या नव्या जातींविषयी माहिती समजली. २०१५ मध्ये त्यांनी कमी क्षेत्रावर दोन्ही जातींची लागवड केली. त्यातील स्वर्ण अलौकिकला पुरी, भुवनेश्वर आणि कटक येथील बाजारामध्ये चांगली मागणी व दर मिळत असल्याचे लक्षात आले. दरम्यानचे एक वर्षा फानी चक्रीवादळाने मोठा फटका बसल्याने वाया गेले. मात्र, २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात एक एकर क्षेत्रामध्ये स्वर्ण अलौकिक या जातीच्या १७५० रोपांची लागवड केली.
वाफ्यावर मल्चिंग करून दीड मीटर बाय दीड मीटर अंतरावर लागवड केली. या वेलींना आधार देण्यासाठी तारांची व्यवस्था केली. फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० या काळामध्ये सुमारे १०७ क्विंटल परवलचे उत्पादन मिळाले. त्याला सरासरी ५० रुपये इतका दर मिळाला. अगदी कोरोनाच्या स्थितीमध्येही त्याला चांगला दर मिळाला. या पिकासाठी १,९७,६७० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यातून ३,३७,३१० रुपये उत्पन्न मिळाले.
रोपवाटिकेतून अतिरिक्त उत्पन्न
खुंटिया यांच्या यशामुळे अन्य शेतकऱ्यांकडूनही रोपांची मागणी वाढू लागली. तेव्हा केंद्रातील शास्त्रज्ञांची मदत घेऊन त्याने व्यावसायिक रोपवाटिका तयार केली. हंगामामध्ये त्याने १० हजार रोपे तयार करून, २० रुपयाप्रमाणे विकली. या व्यवसायातून त्याला २ लाख रुपये उत्पन्न आणि १,२०,००० रुपये निव्वळ नफा मिळाला. झारखंडमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या स्वर्ण अलौकिक या परवल भोपळ्याची मागणी ओडिशामध्येही वाढत आहे. या भोपळ्याचा उपयोग भाजीमध्ये तसेच मिठायांमध्ये केला जातो. या भोपळ्यातील पोषक आणि औषधी घटकांमुळे आरोग्याकडे जागरूक लोकांकडून मागणी वाढत आहे. अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचाही ओढा या नव्या जातींकडे वाढत आहे.
- 1 of 23
- ››