agricultural stories in Marathi, Technowon, post harvest machinary | Agrowon

काढणीपश्‍चात कामासाठी सुधारित यंत्रे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 मार्च 2021

पारंपरिक मानवाद्वारे केल्या जाणाऱ्या कामांसाठी आधुनिक किंवा सुधारीत यंत्राचा पर्याय विकसित करण्यात आला आहे. त्यांचा वापर कष्ट कमी करण्यासोबत कार्यक्षमता वाढवतो.

मानवचलित सुपारी सोलणी यंत्र

पारंपरिक पद्धतीने सुपारी सोलणीसाठी विळी किंवा टोच्याचा वापर केला जातो. मात्र सुपारीचा लहान आकार असल्याने हाताला जखम होण्याची शक्यता वाढते. यामुळे कामाचा वेग अत्यंत कमी राहतो. काढलेल्या ताज्या किंवा हिरव्या सुपारी सोलण्यासाठी कर्नाटक येथील कृषी शास्त्र विद्यापीठ, बंगलोर येथे अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पांतर्गत मानवचलित सुपारी सोलणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यावर चार माणसे एकाच वेळी सुपारी सोलणी करू शकतात.

अशी आहे रचना ः
सुपारी सोलणी यंत्र हे माइल्ड स्टीलपासून बनवलेले असून, लोखंडी अॅंगलच्या स्टॅंडवर बसवले आहे. सोलणीसाठी दोन धारदार ब्लेड असून, त्यातील एक स्थिर, तर दुसरे हलते असते. हे हलते ब्लेड चालवण्यासाठी खाली पॅडलद्वारे ऊर्जा दिली जाते. वरील बाजूला नरसाळ्याप्रमाणे फिडर बसवला असून, त्यात २० किलो सुपारी बसते. ती गुरुत्वाकर्षणाने खाली ट्रेमध्ये येत राहते. सुपारीचे आवरण धारदार ब्लेड्सद्वारे काढले जाते. पॅडलच्या साधारण दोन ते तीन आवर्तनांमध्ये सुपारी सोलली जाते.

आकारमान व क्षमता ः
आकार - ६८ × ६८ × १३७ सेंमी
वजन - ४० किलो
प्रति यंत्र किंमत - ४५०० रुपये.
क्षमता - १६० किलो कच्ची सुपारी प्रति दिन प्रति व्यक्ती.

चिंचा फोडून गर वेगळे करण्याचे यंत्र

चिंचेच्या काढणीपश्‍चात कामांमध्ये झाडावरून चिंचा पाडणे, गोळा करणे, त्यावरील आवरण वेगळे करून त्यातील बिया- चिंचोके बाजूला करणे, चिंचांतील शिरा वेगळ्या करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बांधावरील दोन- चार झाडे ते संपूर्ण सलग चिंच बाग अशा दोन्ही पद्धतींनी सामान्यतः चिंचांचे उत्पादन घेतले जाते. बांधावरील काही झाडांसाठी ठेकेदारांना ठरावीक रकमेला झाडे देण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याने सलग बाग असलेल्या शेतकऱ्यांना ठरावीक दराने झाडे देणे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकते. स्वतः चिंच पाडल्यानंतर महिलांच्या साह्याने चिंचा फोडून स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रति किलो १५ ते २० रुपये खर्च येतो. या प्रक्रियेसाठी कर्नाटक येथील कृषी शास्त्र विद्यापीठ, बंगलोर येथे अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पांतर्गत यंत्र विकसित केले आहे.

अशी आहे रचना ः
चिंच फोडणी यंत्रामध्ये करवतीप्रमाणे धारदार अशा माइल्ड स्टीलच्या रिंगा दोन समांतर शाफ्टवर बसवलेल्या असतात. त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. या रिंगाच्या पृष्ठभागावर लहान पिना वेल्डिंगद्वारे बसवलेल्या असतात. त्या चिंचावरील आवरण फोडण्याचे आणि शिरा वेगळ्या करण्याचे काम करतात. चिंचोके (बिया) वेगळ्या करण्यासाठी या चिंचा पुढे फिरणाऱ्या स्टेनलेस स्टील रोलर आणि खाली असलेल्या स्थिर रास्प बारवरून पाठवले जाते. त्यात दाबले गेल्याने बिया बाजूला फेकल्या जातात. चिंचेचा गर वेगळा होतो.

आकार आणि क्षमता ः
आकारमान - ६८ × ६८ × १३७ सेंमी
वजन - ४० किलो
प्रति यंत्र किंमत - ३० हजार रुपये. (मोटारशिवाय)
क्षमता -
आवरण फोडणे, शिरा वेगळ्या करणे - ६०० किलो प्रति तास
चिंचोके वेगळे करणे - ४५ किलो प्रति तास.

बहुउद्देशीय हस्तचलित काढणीपश्‍चात यंत्र

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे यंत्र घेण्यापेक्षा बहुउद्देशीय काढणीपश्‍चात यंत्र उपयुक्त ठरते. या यंत्रामध्ये शेंगा फोडणी, सूर्यफूल मळणी, मका सोलणी अशी अनेक कामे होतात.

अशी आहे रचना ः
हे माइल्ड स्टीलपासून बनवण्यात आलेल्या हस्तचलित यंत्र आहे. यात मळणीसाठी दंडगोलाकार रचना असून, त्यात बियांना इजा न होता आवरण तोडण्यासाठी रबर कुशन ठेवण्यात आले आहे. याला शेलिंग चेंबर म्हणतात. वरील बाजूस असलेल्या नरसाळ्याची क्षमता ५०० ग्रॅम इतकी आहे. हाताने दांडा फिरवला असता आतील शेंगा फोडल्या जातात. त्याखाली असलेल्या जाळीमधून शेंगा आणि टरफले खाली पडतात. यातून शेंगा आणि टरफले वेगळी करावी लागतात.
या यंत्रामध्ये दोन आणखी रचना दिल्या आहेत. त्यातून मक्याची सोलणी आणि सूर्यफुलाची मळणी करता येते.

आकार आणि क्षमता ः
एकूण आकारमान - ५८ × ३० × ४५ सेंमी
वजन - ८ किलो
मूल्य - ८५० रुपये
क्षमता - १५ किलो शेंगा प्रति तास, १२ ते १५ किलो सोललेला मका किंवा सूर्यफुलाचे बी.

(स्रोत ः अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प, कृषी शास्त्र विद्यापीठ, बंगलोर, कर्नाटक)

धान्य स्वच्छता, प्रतवारी सायकल यंत्र

धान्य, कडधान्ये यांच्या उत्पादनानंतर मळणी झाल्यानंतर त्यातील कुसळे व अन्य घटक वेगळे करण्यासाठी नैसर्गिक वाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कामाचा वेग कमी राहतो. यासाठी अलमोरा (उत्तराखंड) येथील विवेकानंद पर्वतीय कृषी संस्थेने पायाने चालवता येणारे स्वच्छता व प्रतवारी यंत्र विकसित केले आहे.

या यंत्रातील मुख्य भाग फायबर आणि प्लॅस्टिक घटकापासून बनवलेले आहेत. त्यात पंखे, स्वच्छतेसाठीच्या चाळण्या आणि प्रतवारी संरचना यांचा समावेश आहे. हे यंत्र एका माणसाद्वारे चालवता येते.

  • त्याची स्वच्छतेची क्षमता बाजरीसाठी २५० ते ३०० किलो प्रति तास इतकी आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी क्षमता २०० ते २५० किलो प्रति तास इतकी आहे.- त्याची पाखडण्याची क्षमता बाजरीसाठी ३०० ते ३५० किलो प्रति तास इतकी आहे.
  •  स्वच्छतेची व पाखडण्याची कार्यक्षमता बाजरीसाठी ९६ ते ९७ टक्के इतकी आहे.

आकार आणि क्षमता ः
आकारमान - १४५० × १४५० × १२१० मिमी
वजन - ६० किलो
क्षमता - २५० ते ३०० किलो प्रति तास
यंत्राचे मूल्य - ८,००० रुपये
कामाचे मूल्य - ०.०४ प्रति किलो धान्य

(स्रोत ः अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प, विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन संस्था, अलमोरा, उत्तराखंड.)

ओल्या हरभऱ्याच्या सोलणीसाठी यंत्र

उत्तर व मध्य भारतामध्ये ताजा व ओला हरभराही भाजी म्हणून खाल्ला जातो. मात्र ओला हरभरा मिळवण्यासाठी अधिक कष्ट लागतात. हे कष्ट कमी करण्यासाठी जबलपूर (मध्य प्रदेश) येथील अखिल भारतीय समन्वयित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पामध्ये एक यंत्र तयार केले आहे.

या यंत्रामध्ये किंचित उंचवटे असलेल्या माइल्ड स्टीलपासून तयार केलेल्या रोलरचा वापर केला आहे. या रोलरची लांबी ३०० मिमी असून, त्यावरील उंचवटे ५० मिमी ठेवण्यात आले आहेत. दर १५ मिमी अंतरावर असलेल्या या चपट्या उंचवट्यांचा आकार २५ मिमी × ४ मिमी असा आहे. ते ११० मिमी व्यासाच्या दोन प्लेटमध्ये बसवले आहेत. या फिरणाऱ्या प्लेटमध्ये हरभऱ्याची जुडी धरल्यानंतर पाला आणि आवरणासह असलेले हरभरे वेगळे होतात. पाल्यापासून हरभरे वेगळे केले जातात.

ज्या वेळी हरभऱ्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण ६१.४१ टक्के असते, आणि यंत्राचा वेग ३५० फेरे प्रति मिनिट ठेवला असता या यंत्राची कार्यक्षमता ९८.८२ टक्के इतकी मिळाली. या स्थितीमध्ये यंत्राची कार्यक्षमता १०० किलो प्रति तास इतकी राहते.

आकार आणि क्षमता ः
एकूण आकारमान - १०४० × ३८० × १२४० मिमी
वजन - १०५ किलो
जागेची आवश्यकता - १२ × १० फूट.
यंत्राची किंमत - २५,००० रुपये
सरासरी क्षमता ः ६० किलो प्रति तास

(स्रोत ः जबलपूर येथील अखिल भारतीय समन्वीत काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍व विद्यालय, जबलपूर, मध्य प्रदेश)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...