agricultural stories in Marathi, Technowon, reaper binder for harvesting | Page 2 ||| Agrowon

पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’

डॉ. अमोल गोरे
शनिवार, 14 ऑगस्ट 2021

शेतकऱ्यांसाठी पीक कापणीसाठी (उदा. गहू इ.) रिपर बाइंडर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या यंत्राद्वारे पीक कापणीबरोबरच कापलेल्या पिकाच्या गड्ड्याही बांधल्या जातात. या बांधलेल्या गड्ड्या एका ओळींमध्ये सोडल्या जातात.

पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते १२ महिला मजूर लागतात. मजुरांचा वाढता तुटवडा आणि वाढलेली मजुरी पाहता शेतकरी हार्वेस्टर मशिनच्या वापराकडे वळत आहे. हे सोयीचे असले तरी प्रत्येक वेळी हार्वेस्टर मशिन उपलब्ध होतेच असे नाही. लहान शेतकऱ्यांसाठी मोठे मशिन आणण्यातही अडचणी येतात. अशा अशा शेतकऱ्यांसाठी पीक कापणीसाठी (उदा. गहू इ.) रिपर बाइंडर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या यंत्राद्वारे पीक कापणीबरोबरच कापलेल्या पिकाच्या गड्ड्याही बांधल्या जातात. या बांधलेल्या गड्ड्या एका ओळींमध्ये सोडल्या जातात. यामुळे कापलेले पीक गोळा करताना पिकाच्या काड्या गळणे, धान्य जमिनीवर सांडणे यातून होणाऱ्या नुकसानीला आळा बसतो.

कार्य आणि संरचना
या यंत्रामध्ये एक फ्रेम, कटर बार, क्लच आणि ब्रेकसह बसविलेले हँडल, ड्रायव्हरसाठी सीट, दोन ड्राइव्ह व्हिल्स, पीक गोळा करणारा घटक आणि कापलेले पीक बांधण्यासाठी सुतळी असते. या प्रकारच्या यंत्राचे कटिंग युनिट हे डिस्क प्रकार किंवा कटर बार प्रकारातील असू शकते. या यंत्रातील कटर बारद्वारे पिकाची कापणी केली जाते. पीक कापल्यानंतर एका बाजूला असलेल्या बांधणाऱ्या यंत्रणेने सुतळीने गड्डी बांधली जाते. या गड्ड्या एका मागोमाग एक या प्रमाणे ओळीत पडतात. या यंत्राचे स्वयंचलित (सेल्फ-प्रोपेल्ड वॉकिंग) प्रारूप उपलब्ध आहेत. खरिपामध्ये तांदूळ आणि रब्बीमध्ये गहू यांसारख्या पिकांच्या काढणीसाठी रिपर बाइंडर खूप उपयुक्त ठरतात.

उपयुक्तता
१. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.
२. धान्य पिकांची काढणी व बांधणी एकाच वेळी होते.
३. तांदूळ, गहू, चारा अशा पिकांच्या काढणीसाठी उपयुक्त.
४. एक एकर शेतातील कापणी व बांधणीसाठी १ लिटर डिझेल पुरेसे होते.
५. पिकांची काढणी व बांधणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च यांची बचत होते.

याला अन्य उपसाधने जोडता येतात
१. पाणलोट क्षेत्र / शेतात कापणीसाठी ‘केज व्हिल’ उपलब्ध आहेत.
२. चारा पिके कापणीसाठी गवत कटर जोडला जाऊ शकतो.
३. स्प्रेअर कीटदेखील जोडले जाऊ शकते.

(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)


इतर टेक्नोवन
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...