agricultural stories in Marathi, Technowon, research for potato keeping quality | Agrowon

बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणाली

वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

बटाटा साठवणीसाठी त्यात सातत्याने हवा खेळती राहणे गरजेचे असते. यासाठी बटाटा साठवणीमध्ये हवा खेळती ठेवणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

दक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल ३२ अंश आणि किमान १५ अंश सेल्सिअस असून, सापेक्ष आर्द्रता कमाल ८९ टक्के आणि किमान ४२ टक्के इतकी असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८९३ मिमी आहे. अशा स्थितीमध्ये बटाटे कुजणे, त्यावर बुरशीची वाढ होणे अशा कारणांमध्ये बटाट्याचे मोठे नुकसान होते. बटाटा साठवणीसाठी त्यात सातत्याने हवा खेळती राहणे गरजेचे असते. यासाठी बटाटा साठवणीमध्ये हवा खेळती ठेवणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीच्या दोन ते तीन महिन्यांच्या साठवणीतील नुकसानीचे प्रमाण - भौतिक नुकसान २.१ टक्के आणि कुजण्यामुळे होणारे नुकसान २.८ टक्क्यानी कमी करण्यात यश आले आहे.

...असे आहे तंत्रज्ञान
ही सोपी यंत्रणा असून, त्यामध्ये गोलाकार आडव्या सच्छिद्र पाइप आणि त्याला उभ्या वरपर्यंत जोडलेल्या पाइप (रायझर) यांचा समावेश होतो. मुख्य पाइपचा व्यास हा १०० मिमी असून, १३ मिमी व्यासाचा सच्छिद्र आडवा बसवलेला असतो. पाइपची लांबी शक्यतो बटाट्याच्या ढिगाइतकी असावी. दोन छिद्रांमधील अंतर ५० मिमी ठेवावे. दर एक मीटर अंतरावर एक रायझर उभा बसवावा. त्याचा व्यास ६० मिमी आणि शेवटची टोके मुख्य पाइपशी जोडलेली असतात. या पाइपना हलका उतार (२ अंश) दिलेला असतो. यामुळे हवेतील आर्द्रता व त्यामुळे तयार झालेला ओलावा उताराच्या दिशेने बाहेर काढणे शक्य होते. या रचनेमुळे ढिगाच्या आतील बाजूला तयार झालेली उष्ण हवा हलकी होऊन बाहेर फेकली जाते. थंड हवा आत येत राहते. ढिगामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे बटाटे कंदाचे नुकसान होत नाही.

आकार आणि क्षमता ः
एकूण आकारमान - ३५ × १७ × ३ सेंमी
वजन - ०.३५ किलो
क्षमता - ७५० फळे प्रति तास.

(स्रोत - अखिल भारतीय समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प, कृषी शास्त्र विद्यापीठ, बंगलोर, कर्नाटक)


इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...