agricultural stories in Marathi, Technowon, Researchers develop ultra-thin 'computer on the bone | Agrowon

हाडावर वाढवता येईल संगणक!

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार करण्यात अॅरिझोना विद्यापीठातील अभियांत्रिकी शास्त्रज्ञांना यश आले आहे. या प्रकारच्या उपकरणाला ओसेओसरफेस इलेक्ट्रॉनिक्स असे नाव देण्यात आले आहे.

हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार करण्यात अॅरिझोना विद्यापीठातील अभियांत्रिकी शास्त्रज्ञांना यश आले आहे. या प्रकारच्या उपकरणाला ओसेओसरफेस इलेक्ट्रॉनिक्स असे नाव देण्यात आले आहे. या उपकरणामुळे हाडांचे आरोग्य आणि ते भरून येण्याच्या दीर्घकालीन प्रक्रियेवर अत्यंत जवळून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

याविषयी माहिती देताना अस्थी शल्यचिकित्सक डॉ. डेव्हिड मार्गोलिस यांनी सांगितले, की हाडांना झालेल्या मोठ्या इजांमध्ये त्यांचे आरोग्य आणि भरून येण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी असते. या दरम्यान लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने एक्स रे काढावे लागतात. त्यातून उपचाराच्या खर्चात वाढ होत जाते. हाडांचे आरोग्य सातत्याने तपासण्यासाठी ओसेओसरफेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण अत्यंत महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या उपकरणाने नोंदवलेल्या पहिल्या व अचूक मोजमापामुळे माझ्या हर्षोल्हासाला पारावार राहिलेला नाही.

हाडांना झालेल्या मोठ्या इजांमुळे रुग्णांना ह्रदयरोग, ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांपेक्षाही अधिक काळ रुग्णालयात घालवावा लागतो. हाडांचे व त्याजवळ असलेल्या स्नायूंच्या आरोग्य आणि जखमा भरून येण्याची प्रक्रिया जवळून तपासणे आणि उपचाराच्या प्रक्रियेमध्ये वायरलेस बोन संगणक महत्त्वाचे ठरू शकतात. अर्थात, नुकत्याच तयार करण्यात आलेल्या या उपकरणाच्या चाचण्या अद्याप माणसांमध्ये झालेल्या नाहीत. तसेच त्याला अद्याप आवश्यक त्या परवानग्याही मिळालेल्या नसल्याची बाब जैववैद्यक अभियांत्रिकीचे सहाय्यक प्रो. फिलिप गुत्रुफ यांनी अधोरेखित केली.

...अशी आहेत वैशिष्ट्ये

  • कागदाच्या जाडीइतकीच जाडी आणि लवचिकता.
  • हाडाभोवती घट्ट चिटकून राहू शकते.
  • याला बॅटरीची आवश्यकता नाही.
  • नीअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्राने ऊर्जा पुरवता येते. सध्या स्मार्टफोनमधून संपर्काशिवाय पैसे देण्याच्या प्रक्रियेमध्ये हे तंत्र वापरले जाते.
  • हाडाच्या पेशींप्रमाणेच कॅल्शिअम कणांपासून बनवलेल्या सिरॅमिक चिकटद्रव्यानेच हाडांशी जोडले जाते. अन्य कोणत्या चिकटद्रव्याने काही दिवस किंवा महिन्यांपेक्षा जास्त काळ चिकटून ठेवणे शक्य झाले नसते.
  • हाडाचाच एक भाग असल्याप्रमाणे जोडल्या गेलेल्या उपकरणाच्या सेन्सरपर्यंत हाडाची वाढ होत येते. त्यामुळे हाडांची वाढ, त्याची मोजमापे दीर्घकाळपर्यंत घेता येतात.
  • सध्या हाडामध्ये आधारासाठी घातलेल्या बाह्य वस्तू उदा. प्लेट्स, रॉड किंवा स्क्रू योग्य वेळी काढण्यासाठी या उपकरणाची मदत होते.
  • हाडाच्या आरोग्यासाठी दिलेल्या औषधांची परिणामकारकता किंवा साइड इफेक्टही त्वरित समजू शकतील. त्यानुसार औषधांच्या मात्राही वेळीच बदलता येतील.

इतर टेक्नोवन
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...
हाडावर वाढवता येईल संगणक!हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार...
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने...एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...