agricultural stories in Marathi, Technowon, Robot for pollination of tomato | Agrowon

टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!

वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील अरुग्गा एआय फार्मिंग यांनी नुकत्याच एक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार बायोबेस्टने अरुग्गाच्या नव्या आर्थिक प्रकल्पामध्ये अमेरिका आणि कॅनडा येथील उत्पादन वितरणामध्ये भागीदारी करण्याचे मान्य केले.

बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील अरुग्गा एआय फार्मिंग यांनी नुकत्याच एक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार बायोबेस्टने अरुग्गाच्या नव्या आर्थिक प्रकल्पामध्ये अमेरिका आणि कॅनडा येथील उत्पादन वितरणामध्ये भागीदारी करण्याचे मान्य केले.

अरुग्गा एआय फार्मिंग ही इस्राईलमध्ये २०१७ मध्ये स्थापन झालेली स्टार्टअप कंपनी आहे. ती प्रामुख्याने हरितगृह शेतीमधील विविध समस्यांवर यंत्रमानवाच्या किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने समाधान शोधण्याचे काम करते.

हरितगृहातील टोमॅटोमध्ये मधमाश्या आणि बंबलबी यांच्या कमी संख्येमुळे उद्‌भविणाऱ्या परागीभवनाच्या समस्येवर मात करण्यासाठी या कंपनीने प्रयत्न सुरू केले आहे. त्याविषयी माहिती देताना अरुग्गाचे कार्यकारी अधिकारी म्हणाले, की सध्या मधमाश्यांच्या अभावामुळे परागीभवनासाठी मानवी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आम्ही त्यासाठी परागीभवन करणारे रोबोट तयार केले असून, त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. मधमाश्या आणि मानवी परागीभवनाच्या तुलनेमध्ये यंत्रमानवाच्या साह्याने परागीभवन केलेल्या हरितगृहातून पाच टक्के अधिक उत्पादन मिळाले आहे. त्याच प्रमाणे टोमॅटो पिकामध्ये उद्‌भविणाऱ्या अन्य समस्यांवरही आम्ही काम करत आहोत. प्रायोगिक पातळीवरून आता व्यावसायिक पातळीवर आम्ही झेप घेत असून, आमचे तंत्रज्ञान अमेरिका आणि कॅनडामध्येही उपलब्ध करत आहोत. त्यासाठी बायोबेस्ट या कंपनी करार केला आहे.

बायोबेस्ट ही कंपनी जागतिक पातळीवर जैविक नियंत्रण आणि परागीभवनाच्या क्षेत्रात काम करते. कंपनीचे कार्यकारी अधिकारी जीन मार्क वॅन्डूर्ने म्हणाले, की अरुग्गा या कंपनीच्या उद्योजकता आणि रोबोटिक पॉलिनेशन क्षेत्रातील निष्कर्षांनी आम्ही प्रभावित झालो आहोत. आम्ही गेल्या तीस वर्षांपासून जंगली मधमाश्याचे (बंबल बी) व्यावसायिक उत्पादन घेत आहोत. टोमॅटोसारख्या पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाश्यामुळे अनेक फायदे झाले आहेत. मात्र या जैविक घटकांसोबतच पीक उत्पादनांची शाश्‍वती वाढविण्यासाठी यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरत जाणार आहे. त्या दिशेने अरुग्गा कंपनीसोबतचा करार फायद्याचा ठरू शकतो. उत्तर अमेरिकेतील अत्याधुनिक टोमॅटो उत्पादनामध्ये अरुग्गाच्या तंत्रज्ञानाला चांगली मागणी राहू शकेल.


इतर टेक्नोवन
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...
नाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक...जागतिक पातळीवर भारत हा भाजीपाला व फळ...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
शाश्‍वत उत्पन्नासाठी एकात्मिक शेती...गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि...
आवळा प्रक्रियेसाठी हस्तचलीत यंत्रहस्तचलीत यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या...
व्हे प्रथिनांच्या उत्पादनातून वाढेल...निवळी (व्हे) प्रथिने ही उच्च दर्जाची प्रथिने असून...
संपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान...नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन...
मसाल्यांचा स्वाद टिकवण्यासाठी...प्राचीन काळापासून जगभरामध्ये भारत हा मसाले व...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
शेतकऱ्यांसाठी खास शूजची निर्मितीशेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला...
भात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी...पालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या...
अन्न प्रक्रियेमध्ये ३ डी प्रिंटिंगची...थ्री डी प्रिंटिंग तंत्राचा वापर बांधकाम,...
कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची...खरीप हंगामात कापूस लागवड ही टोकन पद्धतीने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...