agricultural stories in Marathi, Technowon, seeddrill for cotton seeds | Agrowon

कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची निर्मिती

राजेंद्र दिघे
शुक्रवार, 25 जून 2021

 नाशिक जिल्ह्यातील देवारपाडे (ता. मालेगाव) येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे यांने बियाणे टोकन उपकरणाची निर्मिती घरगुती वस्तूंच्या साह्याने केली आहे.

खरीप हंगामात कापूस लागवड ही टोकन पद्धतीने केली जाते. त्यासाठी दरवेळी वाकून बिया टोकाव्या लागतात. यामुळे काम करणाऱ्या व्यक्तींना पाठ, कंबर व गुडघेदुखीचा त्रास होतो. परिणामी कामांचा वेग मंदावतो. शारीरिक व्याधींही जडू शकतात. ही गरज ओळखून  नाशिक जिल्ह्यातील देवारपाडे (ता. मालेगाव) येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे यांने बियाणे टोकन उपकरणाची निर्मिती घरगुती वस्तूंच्या साह्याने केली आहे.

 शेतीत संशोधक वृत्ती महत्त्वाची असते. वडिलांना शेतीत मदत करत असता कमलेश सातत्याने त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील, याचा विचार करत असतो. कापूस लागवडीमध्ये बियाणे टोकण करण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे प्रयोग सुरू केले. घरामध्ये उपलब्ध पाइप, नळी, त्यास दोन वेल्डिंग रॉड अशा जुजबी साहित्यातून त्याने यंत्राची निर्मिती केली. त्यासाठी केवळ शंभर रुपयांपर्यंत खर्च आल्याचे कमलेशने सांगितले. या यंत्राने तूर, भुईमूग, मका अशा कोणत्याही बियांची टोकण करणे शक्य होते. कमलेश हा कलासक्त असून, अनेक लघुपटामध्ये अभिनय केला आहे. वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी नवनवीन उपकरणे, यंत्रे तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामध्ये त्याला ‘ॲग्रोवन’च्या वाचनातून नव्या संकल्पना आणि प्रेरणा मिळत असल्याचेे कमलेश सांगतो. कमलेशने दोन वर्षांपूर्वी जुन्या सायकलीचा वापर करून पेरणी, कोळपणी व फवारणी करणारे बहुपयोगी यंत्र तयार केले होते. 

टोकण यंत्राची रचना अशी 
यंत्र बनविण्यासाठी एक इंच आकाराचा गोलाकार, ३ फूट लांबीचा पाइप वापरला आहे. वरील भागात बियाणे टाकण्यासाठी टाकाऊ बाटलीचे तोंड नरसाळ्याप्रमाणे कापून बसवले. त्यात हाताने एक किंवा दोन बिया (गरजेनुसार) सोडल्या जातात. या पाइपमधून बियाणे खालील भागात येते. येथे एक झडप बसवली आहे. तिथे बियाणे अडकते. टोकण करण्याच्या जागेवर पाइप योग्य खोलीपर्यंत पाइप जमिनीमध्ये रुतवला जातो. त्यातून झडप उघडण्यासाठी वरील भागापर्यंत एक दोरी किंवा तार जोडलेली आहे. ती खेचल्यानंतर झडप उघडली जाते व बियाणे खाली जमिनीत योग्य खोलीवर जाते. बियाणे मातीमध्ये कमी श्रमात योग्य खोलीपर्यंत जाण्यासाठी खालील झडप ही किंचित त्रिकोणी किंवा पक्ष्याच्या चोचीप्रमाणे बनवली आहे. टोकण यंत्र धरण्यासाठी वरील बाजूस दांडा दिला आहे. त्यामुळे यंत्राला स्थिरता येते व हाताळणे सोपे होते. शेजारी बियाणे ठेवण्यासाठी एक डबा जोडला आहे. त्यातून गरजेनुसार मूठ मूठ बियाणे काढून घेऊन वरील भागातील नरसाळ्यातून टाकू शकतो. संपूर्ण यंत्राचे वजन अवघे १ किलो असल्याने हाताळणीमध्ये शेतकऱ्यांवर कोणताही ताण येत नाही.

फायदे 

  •   यंत्रामुळे कापूस टोकण प्रक्रियेत सुलभता येते. काम जलद होते. वेळ व मजुरी खर्चात बचत होते. 
  •   जमिनीच्या ओलाव्यानुसार यंत्राचा वापर शक्य. ओल अधिक असताना यंत्राची चोच काढून ठेवता येते.
  •   कपाशीशिवाय तूर, मका, भुईमूग अशा वेगवेगळ्या पिकांच्या टोकणसाठी उपयुक्त.
  •   याच यंत्राने पुढे खतही गाडून देणे शक्य. खते गाडून दिल्याने हवेमध्ये होणारा त्यांचा ऱ्हास कमी होतो.

 

शेतीतील उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे या उद्देशाने माझे प्रयोग सुरू असतात. आपल्या कल्पनाशक्ती व शिक्षणाचा उपयोग वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी होत असल्याचा आनंद काही औरच!
- कमलेश घुमरे, ७०३०३ ८८२४३


इतर टेक्नोवन
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...