केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ निर्मितीची क्रांती

लाप्पुझा येथील केव्हिकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे.
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ निर्मितीची क्रांती
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ निर्मितीची क्रांती

केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनाची निर्मिती केली जाते. मात्र केळीच्या पिठापासून विविध पदार्थांची निर्मिती आणि प्रसारामध्ये उत्तर आणि दक्षिण कर्नाटकातील काही महिलांनी पुढाकार घेतला आहे. अलाप्पुझा येथील केव्हिकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड १९ महामारी आणि त्यामुळे असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर तुमकूर येथील नयना आनंद या गृहिणी असलेल्या महिलेने केळीच्या पिठापासून विविध रेसिपी तयार केल्या आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी अलाप्पुझा येथील कृषी विज्ञान केंद्रातून केळीचे पीठ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्यांनी त्यावरच न थांबता या पिठाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रयोग केले. छोट्या कामातूनही होऊ शकते क्रांती कोविडमुळे आलेल्या टाळेबंदी आणि प्रवासावरील निर्बंधामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने हातात आलेल्या उत्पादनांची विक्री येईल त्या दराने करावी लागली. त्यातून त्यांचा उत्पादनखर्चही निघाला नाही. उत्तम दर्जाच्या केळींनाही कमी दर मिळाला. या केळीपासून पावडर किंवा पीठ तयार केल्यामुळे ते अधिक काळ टिकवणे शक्य होते. केळीची पोषकता टिकवतानाच सर्वसामान्यांच्या आहारामध्ये अधिक पोषक पदार्थ पोहोचवण्याची नयना आनंद यांच्या धडपडीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २५ जुलै रोजी प्रसारित ‘मन की बात’मध्ये घेतली. कारण घरबसल्या केवळ सामाजिक माध्यमांच्या साह्याने आपल्या पदार्थांच्या रेसिपीचे छोटे छोटे व्हिडिओ आणि लिखित मेसेज त्यांनी सर्वदूर पोहोचवले. त्यांचा ‘एनी टाइम व्हेजिटेबल’ हा व्हॉट्सअॅपवरील गट उत्तर कॅनडामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे प्रयोग, बारीक बारीक टीप्स यामुळे सर्वसामान्य ग्रामीण महिला, शेतकरी हेही केळीचे पीठ बनवणे आणि पदार्थ तयार करण्यामध्ये उतरले. छोट्याशी गोष्टीमुळे गावोगावी केळीचे पीठ आणि त्यापासूनचे पदार्थ बनवण्याची स्पर्धा सुरू झाली. केळी पिठाचा महोत्सव कच्च्या केळीपासून पीठ बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, साध्या घरात उपलब्ध असलेल्या साधनांच्या साह्याने ते बनवता येते. ड्रायर वगळता कोणतेही यंत्र लागत नाही. ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, तिथे ड्रायरचा वापरही टाळता येते. हा सारा बदल अदिके पत्रिका या नियतकालिकाच्या श्री. पद्रे यांच्या लक्षात आला. त्यांनी व्हॅनिला उत्पादकांच्या संघटनेने कोटेगड्डे येथे उभारलेल्या केंद्रीय प्रक्रिया सुविधा केंद्राशी संपर्क साधला. तिथे प्रथम स्थानिक जातीच्या केळीवर प्रक्रिया करून ५० किलो पीठ तयार केले. हे पीठ तीर्थहल्ला या परिसरातील शेतकरी व महिलांना वाटले. त्यांना त्यापासून विविध आणि वेगळे पदार्थ बनवण्याचे आव्हान दिले. त्याचा एक महोत्सव भरवला.     भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तिरुची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र व त्यांच्या संचालिका डॉ. उमा सुब्बराया यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केळी पिठापासून विविध पदार्थनिर्मिती व त्यातून उद्योजकता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले. अलाप्पुझा येथील केव्हीकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे. (स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, अलाप्पुझा, कर्नाटक) १७५ पदार्थांचे प्रदर्शन सिरसी (उत्तर कन्नडा) येथील कृषी विज्ञान केंद्राने उत्तर कन्नडा सेंद्रिय फेडरेशन, फळबाग विभाग आणि कृषी विभागाच्या आत्मा यांच्या सहकार्याने बुधवारी (ता. ११ ऑगस्ट) केळी पिठापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीची कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केली होती. केळीच्या पिठाला स्थानिक भाषेमध्ये ‘बकाहू’ म्हणतात. या बकाहूपासून पदार्थ निर्मितीच्या या कार्यशाळेसाठी तिरुची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. उमा सुब्बराया आणि अदिके पत्रिकेचे संपादन श्री. पद्रे हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यशाळा व प्रदर्शनामध्ये सुमारे ५६ ग्रामीण महिला व स्वयंसाह्यता गटाच्या सदस्यांनी भाग घेतला. येथे बकाहूपासून तयार केलेले १७५ पदार्थ मांडण्यात आले होते. या पदार्थामध्ये गोड, मसालेदार आणि दररोजच्या वापरातील पदार्थ अशी वर्गवारी केली होती. या प्रदर्शनाला ३५० शेतकरी, महिला, उद्योजक यांनी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com