agricultural stories in Marathi, Technowon, A Silent Revolution in Value-Addition of Banana | Page 2 ||| Agrowon

केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ निर्मितीची क्रांती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 ऑगस्ट 2021

लाप्पुझा येथील केव्हिकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे.

केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनाची निर्मिती केली जाते. मात्र केळीच्या पिठापासून विविध पदार्थांची निर्मिती आणि प्रसारामध्ये उत्तर आणि दक्षिण कर्नाटकातील काही महिलांनी पुढाकार घेतला आहे. अलाप्पुझा येथील केव्हिकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड १९ महामारी आणि त्यामुळे असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर तुमकूर येथील नयना आनंद या गृहिणी असलेल्या महिलेने केळीच्या पिठापासून विविध रेसिपी तयार केल्या आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी अलाप्पुझा येथील कृषी विज्ञान केंद्रातून केळीचे पीठ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्यांनी त्यावरच न थांबता या पिठाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रयोग केले.

छोट्या कामातूनही होऊ शकते क्रांती
कोविडमुळे आलेल्या टाळेबंदी आणि प्रवासावरील निर्बंधामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने हातात आलेल्या उत्पादनांची विक्री येईल त्या दराने करावी लागली. त्यातून त्यांचा उत्पादनखर्चही निघाला नाही. उत्तम दर्जाच्या केळींनाही कमी दर मिळाला. या केळीपासून पावडर किंवा पीठ तयार केल्यामुळे ते अधिक काळ टिकवणे शक्य होते. केळीची पोषकता टिकवतानाच सर्वसामान्यांच्या आहारामध्ये अधिक पोषक पदार्थ पोहोचवण्याची नयना आनंद यांच्या धडपडीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २५ जुलै रोजी प्रसारित ‘मन की बात’मध्ये घेतली. कारण घरबसल्या केवळ सामाजिक माध्यमांच्या साह्याने आपल्या पदार्थांच्या रेसिपीचे छोटे छोटे व्हिडिओ आणि लिखित मेसेज त्यांनी सर्वदूर पोहोचवले. त्यांचा ‘एनी टाइम व्हेजिटेबल’ हा व्हॉट्सअॅपवरील गट उत्तर कॅनडामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे प्रयोग, बारीक बारीक टीप्स यामुळे सर्वसामान्य ग्रामीण महिला, शेतकरी हेही केळीचे पीठ बनवणे आणि पदार्थ तयार करण्यामध्ये उतरले. छोट्याशी गोष्टीमुळे गावोगावी केळीचे पीठ आणि त्यापासूनचे पदार्थ बनवण्याची स्पर्धा सुरू झाली.

केळी पिठाचा महोत्सव
कच्च्या केळीपासून पीठ बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, साध्या घरात उपलब्ध असलेल्या साधनांच्या साह्याने ते बनवता येते. ड्रायर वगळता कोणतेही यंत्र लागत नाही. ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, तिथे ड्रायरचा वापरही टाळता येते.
हा सारा बदल अदिके पत्रिका या नियतकालिकाच्या श्री. पद्रे यांच्या लक्षात आला. त्यांनी व्हॅनिला उत्पादकांच्या संघटनेने कोटेगड्डे येथे उभारलेल्या केंद्रीय प्रक्रिया सुविधा केंद्राशी संपर्क साधला. तिथे प्रथम स्थानिक जातीच्या केळीवर प्रक्रिया करून ५० किलो पीठ तयार केले. हे पीठ तीर्थहल्ला या परिसरातील शेतकरी व महिलांना वाटले. त्यांना त्यापासून विविध आणि वेगळे पदार्थ बनवण्याचे आव्हान दिले. त्याचा एक महोत्सव भरवला.
    भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तिरुची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र व त्यांच्या संचालिका डॉ. उमा सुब्बराया यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केळी पिठापासून विविध पदार्थनिर्मिती व त्यातून उद्योजकता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले. अलाप्पुझा येथील केव्हीकेच्या छोट्या प्रशिक्षणातून सुरू झालेली उद्योजकतेची छोटी ज्योत ही केळी प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण कर्नाटकामध्ये वणव्यासारखी पसरली आहे.
(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, अलाप्पुझा, कर्नाटक)

१७५ पदार्थांचे प्रदर्शन
सिरसी (उत्तर कन्नडा) येथील कृषी विज्ञान केंद्राने उत्तर कन्नडा सेंद्रिय फेडरेशन, फळबाग विभाग आणि कृषी विभागाच्या आत्मा यांच्या सहकार्याने बुधवारी (ता. ११ ऑगस्ट) केळी पिठापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीची कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केली होती.
केळीच्या पिठाला स्थानिक भाषेमध्ये ‘बकाहू’ म्हणतात. या बकाहूपासून पदार्थ निर्मितीच्या या कार्यशाळेसाठी तिरुची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. उमा सुब्बराया आणि अदिके पत्रिकेचे संपादन श्री. पद्रे हे प्रमुख पाहुणे होते.
या कार्यशाळा व प्रदर्शनामध्ये सुमारे ५६ ग्रामीण महिला व स्वयंसाह्यता गटाच्या सदस्यांनी भाग घेतला. येथे बकाहूपासून तयार केलेले १७५ पदार्थ मांडण्यात आले होते. या पदार्थामध्ये गोड, मसालेदार आणि दररोजच्या वापरातील पदार्थ अशी वर्गवारी केली होती. या प्रदर्शनाला ३५० शेतकरी, महिला, उद्योजक यांनी भेट दिली.


इतर टेक्नोवन
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...