agricultural stories in Marathi, Technowon, small tractor driven sowing machine | Agrowon

लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी यंत्र

मनोहर पाखरे, डॉ. एस. एच. ठाकरे
बुधवार, 9 जून 2021

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागात लहान ट्रॅक्टरवर चालू शकणारे बियाणे व खते पेरणी यंत्र तयार करण्यात आले आहे.

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागात लहान ट्रॅक्टरवर चालू शकणारे बियाणे व खते पेरणी यंत्र तयार करण्यात आले आहे.

यंत्राची रचना ः
१) एका लोखंडी सांगाड्यावर एक पेटी बसवलेली असून, त्याचे खत व बियाण्यासाठी दोन भागात रूपांतर केले आहे.
२) बियाण्यासाठी असलेल्या भागात चार वेगवेगळे कप्पे केले आहेत. बियाण्याची तबकडी पेटीच्या खालच्या बाजूस घट्ट बसवलेली आहे.
३) खतपेटीमध्ये स्वतंत्र कप्पे दिलेले आहेत. खत पेटीत दिलेल्या लोखंडी पट्टीद्वारे खत नियंत्रित केले जाते. खतांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पेटीवर दिलेल्या लोखंडी पट्टीवर रेषा दिलेल्या आहे. त्यानुसार पट्टीची लांबी कमी-जास्त करून खताची निर्धारित मात्रा देता येते.
४) बीजपेटीतील बियाणे प्रमाण करण्यासाठी खाचा असलेला रोलर बसवलेला आहे. लरच्या पट्टीची लांबी कमी-जास्त करून आवश्यकतेनुसार बियाण्याची मात्रा कमी-जास्त करता येते.
५) पेरणी यंत्राला जमिनीवर चालणाऱ्या दातेरी चाकाद्वारे गती दिली आहे.
६) यंत्राची वाहतूक सुलभ होण्यासाठी आणि पेरणीची खोली कमी-जास्त करण्यासाठी यंत्रास दोन चाके दिलेली आहेत.

बियाणे, खत पेरणीनंतर आंतरमशागतही शक्य ः
या यंत्राने हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन इ. पिकांची पेरणी करता येते.
पिकानुसार दोन फणांतील अंतर कमी-जास्त करता येते. बियाण्यासोबत खताची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर व बियाण्याच्या खाली पेरता येते.
या यंत्राच्या साह्याने आंतरमशागत सुद्धा करता येते. त्यासाठी पेरणी यंत्राचा मुख्य सांगडा बाजूला काढता येतो. तेथील फणाला जमीन उकरण्यासाठी स्वीप जोडता येते.

यंत्राचे ठळक वैशिष्ट्ये
१) या यंत्राद्वारे विविध पिकांची पेरणी करता येते. उदाहरणार्थ, हरभरा, मका, ज्वारी, तूर व सोयाबीन इत्यादी.
२) दोन ओळींमधील अंतर हे आवश्यकतेनुसार बदलता येते.
३) तसेच शिफारशीनुसार योग्य खोलीवर दाणेदार खतांची मात्रा देता येते.
४) या यंत्रामध्ये बियाणे घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा दिलेली आहे.
५) हे यंत्र २० ते २५ अश्‍वशक्तीच्या लहान ट्रॅक्टरवर चालते.
६) या यंत्राच्या साह्याने आंतरमशागत सुद्धा करता येते.
७) या यंत्राचा वापर केल्याने बियाणे व वेळेची बचत होते.
८) या यंत्राची कार्यक्षमता १.५ ते २.० हेक्टर प्रति दिवस इतकी आहे.
९) वापरण्यास सोपे, देखभाल खर्च खूपच कमी.

मनोहर पाखरे, ८८८८५९३८८१
(मनोहर पाखरे हे कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय, खंडाळा येथे सहाय्यक प्राध्यापक असून, डॉ. एस. एच. ठाकरे, कृषी शक्ती व अवजारे विभाग, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विभाग प्रमुख आहेत.


इतर टेक्नोवन
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जमिनीतील ओलावादर्शक उपकरणशेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत,...
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील...
निसर्गाप्रमाणे प्रकाशाचे ग्रहण करणारा...निसर्गामध्ये वनस्पती आणि जिवाणूंकडून...
लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी...अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील...
मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार...नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील...
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे,...मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या...
पेरोव्हस्काइट सौरसेल ः सौर...अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व...
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित...भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे...
बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन्...ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान...
वापर बीबीएफ यंत्राचा...बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या...
पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात...किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला...
पदार्थांची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी ‘...फळे आणि भाजीपाल्यापासून तयार होणाऱ्या...
डीफ्युजर’ तंत्राने वाढवली सिंचन...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...ऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस सुधारणा...