agricultural stories in Marathi, Technowon, soil water testing implement | Agrowon

जमिनीतील ओलावादर्शक उपकरण

अशोक भोईर, डॉ. विलास जाधव
शनिवार, 12 जून 2021

जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले आहे.

शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शेतीमध्येही ऊस, केळी, कापूस यांसारखी नगदी पिके उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा खेचून घेतात. या सर्व पिकांमध्ये पिकांच्या आवश्यकतेपेक्षी कमी किंवा अधिक पाणी दिल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याच प्रमाणे कमी ओलावा असताना पिकाला मातीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही घेण्यात अडचणी येतात. तसेच अतिपाण्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकताही धोक्यात येते.

आपल्या शेतजमिनीमध्ये ओलावा किती आहे, याचीच अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. त्याविषयी सारे अंदाज बांधले जातात. म्हणूनच पिकाला नेमके पाणी किती द्यायचे, कधी द्यायचे याविषयी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. मातीतील ओलावा जाणून घेण्यासाठी कोइमतूर येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ऊस पैदास संस्थेमध्ये ओलावा दर्शक पकरण विकसित केले आहे. हे वापरण्यास सोपे असून, किंमतही कमी आहे. २०१६ मध्ये संस्थेचे संचालक डॉ. राम बक्षी यांच्या हस्ते या उपकरणाचे उद्‌घाटन करण्यात आले. या संशोधनासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभाग मंत्रालयाचा प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले असून, त्याच्या उत्पादन व विक्रीचा परवाना टेक सोर्स सोलूशन या बंगळूर येथील या कंपनीने घेतला आहे. या उपकरणाची किंमत १४०० रुपये एवढी आहे

जमिनीतील ओलावा दर्शक उपकरणाची रचना :
ओलावा दर्शक उपकरणामध्ये संवेदक कांड्या (sensor rod) व आवरण (casing) यांचा समावेश आहे. यामध्ये दोन संवेदक कांड्या दिलेल्या असून, त्या दोन्हींमधील अंतर ३ सें.मी आहे. या उपकरणात १० दिवे, इलेक्ट्रॉनिक्स परिपथ, बॅटरीची तरतूद केली आहे. हे उपकरण चालू बंद करण्यासाठी बटण दिले आहे.

असा करता येतो वापर ः
जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी, जमिनीतील ओलावादर्शक उपकरण्याच्या संवेदक कांड्या (sensor rod) आवश्यक तेवढा जमिनीत घुसवावा. (साधारण ३० सेंमी). त्यानंतर बटण चालू करावे. हे काही क्षण बटण दाबून धरल्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार उपकरणात दिलेला दिवा चमकतो. पेटलेल्या दिव्याच्या रंगानुसार ओलाव्याची स्थिती समजते. उपकरणावर एक तक्ता दिलेला आहे. त्यानुसार पेटलेल्या दिव्याचा रंगानुसार आपल्याला ओलाव्याची स्थिती समजू शकते.
उदा. जर उपकरण्याच्या संवेदक कांड्या जमिनीत घुसाविल्यानंतर निळा रंग आला तर जमिनीत खूप ओलावा असल्याचे समजावे. म्हणजेच पिकाला पाणी देण्याची गरज नाही.

तक्ता १ : जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीतील वाचन

अ.क्र पेटलेल्या दिव्याचा रंग ओलाव्याची स्थिती अनुमान
निळा खूप ओलावा पाणी देण्याची आवश्यकता नाही
हिरवा पुरेसा ओला वा लगेच पाणी देण्याची आवश्यकता नाही
नारंगी कमी ओलावा पाणी द्यावे
लाल खूप कमी ओलावा त्वरित पाणी द्यावे

जमिनीतील ओलावा दर्शक उपकरणाचे फायदे :
१. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण लगेच समजते, त्यानुसार पाण्याचे नियोजन करता येते.
२. शेतीसाठी आणि कुंडीतील झाडासाठी फायदेशीर.
३. वेगवेगळ्या जमिनीत उपयुक्त.
४. वापरण्यास सोपे आणि किंमत कमी.

संपर्क :
अशोक भोईर (कार्यक्रम सहायक-मृदा विज्ञान), ९६३७७२६२५२७
डॉ. विलास जाधव (प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ), ८५५२८८२७१२

(गोएसो कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)
 


इतर टेक्नोवन
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...
नाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक...जागतिक पातळीवर भारत हा भाजीपाला व फळ...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
शाश्‍वत उत्पन्नासाठी एकात्मिक शेती...गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि...
आवळा प्रक्रियेसाठी हस्तचलीत यंत्रहस्तचलीत यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या...
व्हे प्रथिनांच्या उत्पादनातून वाढेल...निवळी (व्हे) प्रथिने ही उच्च दर्जाची प्रथिने असून...
संपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान...नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन...
मसाल्यांचा स्वाद टिकवण्यासाठी...प्राचीन काळापासून जगभरामध्ये भारत हा मसाले व...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
शेतकऱ्यांसाठी खास शूजची निर्मितीशेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला...
भात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी...पालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या...
अन्न प्रक्रियेमध्ये ३ डी प्रिंटिंगची...थ्री डी प्रिंटिंग तंत्राचा वापर बांधकाम,...
कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची...खरीप हंगामात कापूस लागवड ही टोकन पद्धतीने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...