agricultural stories in Marathi, Technowon, Solar panels unique for agrivoltaics | Agrowon

शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा उत्पादन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021

नेदरलॅंड येथील कंपनी बे वा आणि त्यांची ग्रोयेनलेवेन या सहकारी कंपनीने एकूण पाच अॅग्री व्होल्टाइट पॉवर प्रकल्प नेदरलॅंडमध्ये उभारले असून, त्यात ब्ल्युबेरी, रेड करंट्स, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी यांचे उत्पादन घेतले जात आहे.

शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे शक्य करण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयत्न नेदरलॅंड येथील कंपनी बे वा आणि त्यांची ग्रोयेनलेवेन ही सहकारी कंपनी करत आहे. त्यांनी एकूण पाच अॅग्री व्होल्टाइट पॉवर प्रकल्प नेदरलॅंडमध्ये उभारले असून, त्यात ब्ल्युबेरी, रेड करंट्स, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी यांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यातील सर्वांत मोठा प्रकल्प झेवेनार येथे (डच आणि जर्मन सीमेवरील) आर्नहेम शहराजवळ ३.२ हेक्टर क्षेत्रावर उभारला आहे. त्याची क्षमता २.६७ मेगावॉट ऊर्जा इतकी आहे.

त्याविषयी माहिती देताना कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विल्यम डे व्रियेज म्हणाले, की या प्रकल्पामध्ये प्रमाणित पीव्ही मोड्यूल्सचा वापर करण्याऐवजी आम्ही खास मोनोक्रिस्टलाइड सोलर पॅनेल विकसित करून बसवले आहेत. यात पारदर्शकतेचा खास विचार केला असून, त्याखालील रोपांच्या वाढीसाठी आवश्यक तितका प्रकाश खाली येतो. मात्र सरळ तीव्र सूर्यकिरणे, धुके, गारा किंवा बर्फकण यापासून रोपांचे संरक्षणही होते.

पथदर्शक प्रकल्पात वापरलेले तंत्रज्ञान
१) आजवर कंपनीने दोन वेगळे पथदर्शक प्रकल्प उभारले असून, त्यात दोन वेगवेगळ्या प्रमाणांतील पारदर्शकतेच्या पॅनेलचा वापर केला आहे. जिथे अधिक पारदर्शकता आहे, तिथे अधिक चांगले उत्पादन मिळत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळले आहे. पारंपरिक प्लॅस्टिक आच्छादनाच्या तुलनेमध्ये सोलर पॅनेल खालील वातावरण अधिक चांगल्या प्रकारचे राहील, असा प्रयत्न केला आहे.
२) ग्रोईनलेवेन यांच्या २६० वॉट क्षमतेच्या काचेच्या पॅनेलचे प्रत्येकी वजन ३५ किलो इतके असून, सामान्यपेक्षा थोडेसे अधिक आहे. पर्यावरणातील आपत्तींचा सामना करण्याच्या उद्देशानेच थोडी जाड काच वापरल्याचे ते स्पष्ट करतात.
३) पिकांसाठी आवश्यक तो थंडावा दोन प्रकारे उपलब्ध केला जातो. अ) सरळ सूर्यप्रकाशातून येणारे तीव्र किरण पॅनेलद्वारे शोषली जातात.
ब) दोन मॉड्यूल्समधून हवा सातत्याने खेळती राहील, अशी खास रचना केली आहे. या रचनांमुळे उष्ण हवामानातही प्लॅस्टिक आच्छादनाच्या तुलनेत पॅनेलखालील तापमान ५ अंशांनी, तर सामान्य स्थितीच्या तुलनेत २ अंशांनी कमी राहत असल्याचे ते सांगतात. तर रात्रीच्या वेळी पॅनेलखालील तापमान प्लॅस्टिकच्या तुलनेमध्ये थोडे उष्ण राहते. त्याचा फायदा पिकांना होतो.
४) मॉड्यूल्ससाठी लाकडी, क्राँकीट आणि धातूआधारित संरचना तयार केल्या आहेत. मात्र गरजेनुसार त्यात अधिक संशोधन आणि विकास सातत्याने सुरू असतो. अधिक वेगवान वाऱ्यापासून बचाव शक्य होतो. पारंपरिक फॉइल आधारित पद्धतीच्या तुलनेमध्ये यात हालचाल किंवा हलवाहलव कमी असल्यामुळे मजूर कमी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

खर्च वाढला तरी दुहेरी उत्पन्न शक्य
जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या सोलर पॅनेलच्या तुलनेमध्ये थोड्या अधिक उंचीवर संरचना उभारावी लागते. परिणामी, त्या तुलनेत थोडा अधिक खर्च येतो. मात्र जमिनीमध्ये पिके घेणे शक्य होत असल्याने ती उत्पादक राहते. त्यातून उत्पादन थोडे कमी आले तरी दर्जा चांगला राहत असल्याने दर चांगले मिळतात. एकाच वेळी सौरऊर्जा आणि पिकांचे उत्पादन मिळते. रास्पबेरी ही थोड्या सावलीमध्येही चांगली वाढते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये बेरी वर्गीय पिकांमध्येच चाचण्या घेतल्या जात असल्याचे शिन्डेले यांनी सांगितले.


इतर टेक्नोवन
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...
पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...
छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...
हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...