सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील आहार

पारंपरिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षाही हे नवीन तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक ठरू शकेल, असा दावा गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील आहार
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील आहार

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक प्रमाणात सूक्ष्मजीव आधारित प्रथिनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. केवळ प्रथिनेच नाही, तर अन्य पोषक अन्नद्रव्येही त्यातून उपलब्ध होऊ शकतील. या पद्धतीमध्ये सौरऊर्जा, जमीन, पोषक घटक आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साइड इ. घटक घेतले जातात. पारंपरिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षाही हे नवीन तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक ठरू शकेल, असा दावा गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. आहारापासून विहारापर्यंत, अगदी पचनापर्यंत सर्व प्रकारच्या क्रियांमध्ये सूक्ष्मजीव अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. उदा. चीज ते इडली. पदार्थांची पचनीयता वाढवण्यासोबत पोषकताही वाढवली जाते. वाढत्या लोकसंख्येबरोबर उपलब्ध जमिनीचे प्रमाण नेहमीच कमी होत जाणार आहे. अशा वेळी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने प्राणीज उत्पादनांची मागणी वाढत जाणार आहे. केवळ शेती आणि पशुपालनातून ही गरज भागवायची म्हटले तर त्याची पर्यावरणाला मोठी किंमत चुकवावी लागेल. अशा वेळी गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेच्या साह्याने सूक्ष्मजीवांद्वारे प्रथिने व पोषक घटकांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने संशोधन करत आहे. हे तंत्र अधिक पर्यावरणपूरक ठरेल, असा त्यांचा दावा आहे. प्रयोगशाळेमध्ये सौरऊर्जा, जमीन, पोषक घटक आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साइड या बाबींच्या साह्याने सूक्ष्मजीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेली प्रथिन व पोषक घटकयुक्त भुकटी ही विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येईल. या भुकटीपासून पशुआहार आणि मानवी अन्नही तयार करता येते. प्रयोगशाळेमध्ये कमी प्रमाणात केलेल्या या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातील ऊर्जा आवश्यकता, गरज लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी किती सौर पॅनेल आवश्यक ठरतील, याचेही विश्‍लेषण केले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष

  • प्रति किलो प्रथिनांच्या उत्पादनासाठी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये केवळ १० टक्के जागा लागेल. येथेही सर्वाधिक कार्यक्षम प्रथिन पुरवणाऱ्या सोयाबीनसारख्या पिकाशी तुलना केली आहे. अन्य पिकांशी व पशुपालनाशी तुलना केली तर ही टक्केवारी आणखी कमी होईल.
  • ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी आहे, अशा विभागामध्ये ही (उदा. उत्तरेकडील भाग) अन्य पिकाच्या तुलनेमध्ये अधिक सूक्ष्मजीव आधारित उत्पादन मिळवणे शक्य आहे.
  • खते व पाण्याचा पुनर्वापर शक्य असल्याने पाणीही अत्यंत कमी लागणार आहे.
  • यासाठी जमीन किंवा चांगली माती आवश्यक नाही. त्यामुळे शेती शक्य नसलेल्या प्रदेशातही (उदा. वाळवंट, क्षारपड जमिनी इ.) उत्पादन घेणे शक्य आहे.
  • या पूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये सूक्ष्मजीवांपासून प्राप्त केलेल्या प्रथिनांचा वापर पशुआहारामध्ये अत्यंत फायदेशीर असल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारचे व्यावसायिक उत्पादन युरोपीय देशात घेतले जात आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक डोरियन लेगर यांनी सांगितले, की सूक्ष्मजीवापासून मिळवल्या जाणाऱ्या उत्पादनातून उच्च दर्जाचे प्रथिने, अमिनो आम्ले उपलब्ध होतात. त्याच प्रमाणे जीवनसत्त्वे, खनिजेही मिळतात. मानवी आहारासाठीची त्यांची उपयुक्तता चाचण्या व प्रयोगांच्या आधारावर अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. सध्या सुमारे ३० ते ४० टक्के क्षेत्र हे शेतीखाली आहे. उर्वरित क्षेत्र हे विविध कारणांमुळे शेतीयोग्य राहिलेले नाही. जागतिक पातळीवर दर दहामागे एक व्यक्ती ही कुपोषित आहे. सौरऊर्जेवर आधारित अधिक पोषक अशा सूक्ष्मजीव आधारित उत्पादनामुळे कमी जागेमध्ये पोषक उत्पादने तयार करणे शक्य होईल.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com