agricultural stories in Marathi, Technowon, Solar-powered microbes to feed the world | Page 2 ||| Agrowon

सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील आहार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 ऑगस्ट 2021

पारंपरिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षाही हे नवीन तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक ठरू शकेल, असा दावा गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक प्रमाणात सूक्ष्मजीव आधारित प्रथिनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. केवळ प्रथिनेच नाही, तर अन्य पोषक अन्नद्रव्येही त्यातून उपलब्ध होऊ शकतील. या पद्धतीमध्ये सौरऊर्जा, जमीन, पोषक घटक आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साइड इ. घटक घेतले जातात. पारंपरिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षाही हे नवीन तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक ठरू शकेल, असा दावा गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

आहारापासून विहारापर्यंत, अगदी पचनापर्यंत सर्व प्रकारच्या क्रियांमध्ये सूक्ष्मजीव अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. उदा. चीज ते इडली. पदार्थांची पचनीयता वाढवण्यासोबत पोषकताही वाढवली जाते. वाढत्या लोकसंख्येबरोबर उपलब्ध जमिनीचे प्रमाण नेहमीच कमी होत जाणार आहे. अशा वेळी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने प्राणीज उत्पादनांची मागणी वाढत जाणार आहे. केवळ शेती आणि पशुपालनातून ही गरज भागवायची म्हटले तर त्याची पर्यावरणाला मोठी किंमत चुकवावी लागेल. अशा वेळी गॉटिंगेन विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेच्या साह्याने सूक्ष्मजीवांद्वारे प्रथिने व पोषक घटकांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने संशोधन करत आहे. हे तंत्र अधिक पर्यावरणपूरक ठरेल, असा त्यांचा दावा आहे.

प्रयोगशाळेमध्ये सौरऊर्जा, जमीन, पोषक घटक आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साइड या बाबींच्या साह्याने सूक्ष्मजीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेली प्रथिन व पोषक घटकयुक्त भुकटी ही विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येईल. या भुकटीपासून पशुआहार आणि मानवी अन्नही तयार करता येते. प्रयोगशाळेमध्ये कमी प्रमाणात केलेल्या या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातील ऊर्जा आवश्यकता, गरज लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी किती सौर पॅनेल आवश्यक ठरतील, याचेही विश्‍लेषण केले आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष

  • प्रति किलो प्रथिनांच्या उत्पादनासाठी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये केवळ १० टक्के जागा लागेल. येथेही सर्वाधिक कार्यक्षम प्रथिन पुरवणाऱ्या सोयाबीनसारख्या पिकाशी तुलना केली आहे. अन्य पिकांशी व पशुपालनाशी तुलना केली तर ही टक्केवारी आणखी कमी होईल.
  • ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी आहे, अशा विभागामध्ये ही (उदा. उत्तरेकडील भाग) अन्य पिकाच्या तुलनेमध्ये अधिक सूक्ष्मजीव आधारित उत्पादन मिळवणे शक्य आहे.
  • खते व पाण्याचा पुनर्वापर शक्य असल्याने पाणीही अत्यंत कमी लागणार आहे.
  • यासाठी जमीन किंवा चांगली माती आवश्यक नाही. त्यामुळे शेती शक्य नसलेल्या प्रदेशातही (उदा. वाळवंट, क्षारपड जमिनी इ.) उत्पादन घेणे शक्य आहे.

या पूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये सूक्ष्मजीवांपासून प्राप्त केलेल्या प्रथिनांचा वापर पशुआहारामध्ये अत्यंत फायदेशीर असल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारचे व्यावसायिक उत्पादन युरोपीय देशात घेतले जात आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक डोरियन लेगर यांनी सांगितले, की सूक्ष्मजीवापासून मिळवल्या जाणाऱ्या उत्पादनातून उच्च दर्जाचे प्रथिने, अमिनो आम्ले उपलब्ध होतात. त्याच प्रमाणे जीवनसत्त्वे, खनिजेही मिळतात. मानवी आहारासाठीची त्यांची उपयुक्तता चाचण्या व प्रयोगांच्या आधारावर अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.
सध्या सुमारे ३० ते ४० टक्के क्षेत्र हे शेतीखाली आहे. उर्वरित क्षेत्र हे विविध कारणांमुळे शेतीयोग्य राहिलेले नाही. जागतिक पातळीवर दर दहामागे एक व्यक्ती ही कुपोषित आहे. सौरऊर्जेवर आधारित अधिक पोषक अशा सूक्ष्मजीव आधारित उत्पादनामुळे कमी जागेमध्ये पोषक उत्पादने तयार करणे शक्य होईल.

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...