agricultural stories in Marathi, Technowon, Special shoes for farmers by earthen tunes | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांसाठी खास शूजची निर्मिती

सतीश कुलकर्णी
बुधवार, 30 जून 2021

शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला वापरण्यायोग्य टिकाऊ, चिवट आणि त्याच वेळी अभिमान वाटेल अशा प्रकारचे उत्पादन बनवण्याचा ध्यास ‘ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड ऑटोमोबाइल डिझाइन’च्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक धाग्यांचा वापर करत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण बूट (शूज) तयार केले आहेत. 

शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला वापरण्यायोग्य टिकाऊ, चिवट आणि त्याच वेळी अभिमान वाटेल अशा प्रकारचे उत्पादन बनवण्याचा ध्यास ‘ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड ऑटोमोबाइल डिझाइन’च्या विद्यार्थ्यांनी घेतला. नैसर्गिक धाग्यांचा वापर करत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण बूट (शूज) तयार केले आहेत. त्यांचे हे आरेखन ‘लेक्सस डिझाइन ॲवॉर्ड’च्या अंतिम पाचांमध्ये पोहोचले होते. 

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) या संस्थेमध्ये शिकत असलेल्या तीन मित्रांनी जानेवारी २०१७ मध्ये पदवी पूर्ण केली. पदवीदरम्यान  ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आधारित उत्पादन बनविण्याचा ध्यास घेतला. त्यानुसार पदवी पूर्ण होताच नकुल लाटकर (मूळ गाव उस्माननगर -लाठी, ता. जि. नांदेड, वय ३०), विद्याधर भंडारे (मूळ गाव - वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, वय ३१) आणि संतोष कोचेरलकोटा (मूळ गाव - लिंगमपल्ली, जि. हैदराबाद, वय ३१) यांनी टप्प्याटप्प्याने सहा महिन्यांसाठी नांदेड, बारामती (जि. पुणे), वाठार (जि. कोल्हापूर) या भागामध्ये शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित संस्थेतील पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. राहण्याची सोय झाली ती नकुल आणि विद्याधर यांच्या नातेवाइकांकडे. तिघेही सकाळ शेतकऱ्याबरोबर उठून कामाला सुरुवात करत, शेतीतील प्रत्येक कामाचे अवलोकन करत. त्यातून त्यांनी सिंचनासाठी पाण्याच्या अभावापासून साठवणीच्या अपुऱ्या व्यवस्थांपर्यंत २० वेगवेगळ्या समस्या, अडचणी ओळखल्या. त्यातील नेमक्या व तातडीने काम करण्यायोग्य पाच समस्या त्यांनी वेगळ्या काढल्या. २०१९ मध्ये तिघांनी मिळून ‘अर्थन ट्यून्स’ ही कंपनी स्थापन केली. त्याअंतर्गत या पाच समस्यांवर काम सुरू केले. 

संतोष कोचेरलकोटा यांनी सांगितले, की सहा महिन्यांच्या काळामध्ये अनेक शेतकरी विनाचप्पल उन्हातान्हात काम करताना, चालताना आढळले. यामुळे पायांना भेगा पडण्यासोबत अन्य इजा होतात. साप, विंचू यांचे दंशही होण्याचा धोका असतात. हा धोका कमी करण्यासाठी स्थानिक घटकांपासून पण त्याचवेळी आरामदायक असे बूट तयार करण्याचे ठरवले. 

    बूट हेच उत्पादन निवडीचे कारण सांगताना विद्याधर यांनी सांगितले, की बाजारामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे अनेक प्रकारचे बूट उपलब्ध आहेत. पण शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून एकही उत्पादन बाजारात नाही. सध्या ऑफिस, खेळ यांच्यासाठी वेगवेगळे मॉडेल उपलब्ध आहे. शेतीमध्ये अधिक काटक, चिवट आणि त्याचवेळी आरामदायक बूट आवश्यक आहेत. सध्या काही प्रमाणात कातड्यांच्या चप्पल स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्या तरी शेतकऱ्यांसाठी बूट कोणीही तयार करत नाही. पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे गमबूट मिळतात. पण ते सर्व हंगामामध्ये वापरता येत नाहीत.

सर्व हंगामामध्ये वापरता येतील असे आरामदायक बूट तयार करण्याचे नियोजन केले. 
 तिघा मित्रांनी मिळून बुटाचे आरेखन तयार केले. देशातील केरळ, कर्नाटकासह विविध राज्यांना भेटी देत त्यात वापरण्यासाठी योग्य अशा घटकांचे नैसर्गिक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २० प्रकारच्या नैसर्गिक घटकांच्या धाग्यांच्या चाचण्या घेतल्या. उदा. केळीचे, जलपर्णी, नारळाचे केसर इ. वेगवेगळ्या कारणांमुळे एकेक पदार्थ कमी होत शेवटी लोकरीच्या धाग्यावर ते स्थिर झाले. २०१८ च्या अखेरीला हैदराबादच्या जवळच्या एका खेड्यामध्ये त्यांच्या पाहण्यामध्ये पातळ घोंगडी आली. वेगवेगळ्या हंगामांनुसार ती ऊब नियंत्रित करते. याचा वापर त्वचेसाठी अधिक आरामदायक राहू शकले, हे समजले. पण आता दुसरीच समस्या उभी राहिली. घोंगडी विणणाऱ्या विणकरांना बूट तयार करण्याचे काम किचकट वाटत होते. तर चप्पल किंवा बूट तयार करणाऱ्या व्यक्तींना अशा लोकरीपासून बूट बनवण्याची सवय आणि इच्छा नव्हती. शेवटी त्यांनी स्वतःच शूजनिर्मितीचे कौशल्य आत्मसात केले. त्यातून प्राथमिक स्वरूपाची अनेक प्रारूपे बनवली. त्याचे परीक्षण करून डिझाइन अधिक सक्षम केले. प्राथमिक प्रारूप तयार पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये तिघा मित्रांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास यांच्याकडे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत अर्ज केला. त्यात त्यांनी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. या काळामध्ये त्यांना आपले उत्पादन बाजारपेठेमध्ये सक्षमपणे उभे राहू शकले, हे दाखवायचे होते. 

विक्री व चाचण्या
सुरुवातीला ३० शूज तयार करून घेतले व त्याच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. ज्यांच्या पूर्वी भेटी घेतल्या होत्या अशा शेतकऱ्यांशी संपर्क केला. अशा काही शेतकऱ्यांना थोडी सवलत देत खरेदी करण्याचा आग्रह केला. त्यांना सर्व कामांमध्ये, पाण्यामध्ये, चिखलात जास्तीत जास्त बूट वापरण्याच्या सूचना दिल्या. काही दिवसांच्या व महिन्यांच्या वापरानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडून बुटाविषयीचा अभिप्राय घेण्यात आला. २९ वर्षांच्या एका तरुण शेतकऱ्याने अन्यही वेगवेगळे शूज वापरलेले होते. पण स्वतःच्या ऊस आणि डाळिंब शेतीमध्ये काम करताना त्याने या नवीन बुटांचा वापर केला. कोरड्या जमिनीसोबतच चिखलात, अगदी पाणी देतानाही याचा वापर करता येतो. अन्य शूजच्या तुलनेमध्ये चिखलामध्ये घसरण्याचे प्रमाण कमी होते. 

सुधारणा

  • एकदा समस्या लक्षात आल्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नुसत्या लोकरीऐवजी प्लॅस्टिक आणि लोकर यांचे एक मिश्रण केले. त्यामुळे त्याला टिकाऊपणा आला. पॉली -युरिथेनचे सोल वापरले. सोल आणि शूजना जोडण्यासाठी चांगल्या प्रकारचे चिकटद्रव्य वापरले. या टप्प्यावर आग्रा येथील एका शूज उत्पादकाचे साह्य घेतले. सध्या त्यांच्याकडून एक हजार शूज विक्रीसाठी तयार करून घेत आहोत. 
  • या नव्या तयार केलेल्या शूजचे नमुने चेन्नई येथील ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट’ (CLRI) येथे पाठवून सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेतल्या.
  • शेतकऱ्यांच्या शूजमध्ये २० टक्क्यांपर्यंत प्लॅस्टिकचा अंतर्भाव केल्याने टिकाऊपणा वाढला उद्देशाने केला आहे. शहरी भागामध्ये १०० टक्के नैसर्गिक घटकांपासून शूज तयार केले.
  • शेतकऱ्यांचा शूज हा ७५० रुपये, तर शहरी शूज ३५०० रुपये किमतीला आहे. वेबसाइट व अन्य माध्यमांतून शूजचे बुकिंग सुरू झाले आहे. साधारण ऑगस्टच्या मध्यावधीनंतर उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यात येईल. 
  • शूजच्या विक्रीची क्षमता लक्षात आल्यानंतर ‘अर्थन ट्यून्स’ला आयआयटी, मद्रास यांच्याकडून इनक्युबेशन प्रकल्प पुढे नेण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मिळाला. 

संभाव्य मार्गक्रमण 
शूज बाजारपेठेत उतरण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्याच वेळी कोविड १९ महामारी आणि त्यानंतर उद्‍भवलेल्या टाळेबंदी व कडक नियमांचा अडसर आला. हा अडसर कमी होऊन बाजारपेठ खुली झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक आणि शहरी लोकांसाठी एक असे दोन मॉडेल बाजारात उतवण्याचे नियोजन केले  असल्याचे विद्याधर भंडारे यांनी सांगितले. पुढील टप्प्यामध्ये नाग, सापाच्या दंशापासून बचावाच्या दृष्टीने खास बूट तयार करण्यावर संशोधन व काम सुरू आहे.

- विद्याधर भंडारे  ९५५८२५१७२०
संतोष कोचेरलकोटा  ९३८१३४३५०६
वेबसाइट - https://earthentunes.in/


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक...
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली...जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सूक्ष्मजीवांच्या साह्याने बनवले...अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे...कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या...
कॉम्प्रेस्ड बायोगॅस ः सुवर्णसंधी की...पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे...
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...