agricultural stories in Marathi, Technowon, Straw combine machine | Agrowon

पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन’ यंत्र

डॉ. अमोल गोरे
बुधवार, 17 मार्च 2021

पिकाचा शिल्लक राहिलेला पेंढा कापणी, आवश्यकता असल्यास त्याचे बारीक तुकडे करणे व गोळा करणे ही तिन्हीही कामे एकत्रितरीत्या करणारे यंत्र उपयोगी ठरते. या यंत्राला स्ट्रॉ कंबाइन या नावाने ओळखले जाते.

अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. मात्र या यंत्राद्वारे काढणी केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंढा किंवा भुश्शाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करण्यामध्ये अडचणी येतात. अनेक ठिकाणी पिकाचे हे अवशेष जाळून टाकले जात असल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. या गोष्टी टाळण्यासाठी पिकाचा शिल्लक राहिलेला पेंढा कापणी, आवश्यकता असल्यास त्याचे बारीक तुकडे करणे व गोळा करणे ही तिन्हीही कामे एकत्रितरीत्या करणारे यंत्र उपयोगी ठरते. या यंत्राला स्ट्रॉ कंबाइन या नावाने ओळखले जाते. हे यंत्र ३५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवले जाते. अशा प्रकारचे स्वयंचलित स्ट्रॉ कंबाइन यंत्रही उपलब्ध आहे. यंत्राच्या मागे जोडलेल्या ट्रेलरमध्ये भुस्सा गोळा केला जातो.

संरचना :

  • या यंत्रामध्ये पेंढा कापणी घटक, पेंढा गोळा करणारा घटक, फिडिंग युनिट, स्ट्रॉ ब्रुइझिंग म्हणजेच पेंढ्यांचा भुगा करणारा घटक आणि स्ट्रॉ ब्लोईंग युनिट (भुस्सा बाहेर टाकणारा घटक) इ. मुख्य कार्यरत घटक असतात.
  • पेंढा एकत्र करण्यासाठी स्पाइक-टूथ प्रकार, चाफ कटर प्रकार आणि सेरेटेड सॉ अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांचा उपयोग या यंत्रामध्ये केला जातो.
  • या यंत्राचे प्रमुख घटक रील, कटर बार, ऑगर, फीडर, स्ट्रॉ ब्रुइझिंग सिलिंडर, कॉन्केव्ह अ‍ॅस्पिरेटर ब्लोअर, चाळण्या आणि गिअर बॉक्स हे आहेत.
  • कापणीनंतर उरलेला पेंढा स्ट्रॉ कंबाइनद्वारे गोळा केला जातो. कॉन्केव्ह सिलिंडर विभागात नेऊन तिथे त्याचे तुकडे केले जातात. कंबाइन हार्वेस्टरने न कापता सोडलेल्या पेंढ्याची कापणी करण्यासाठी रेसिप्रोकेटिंग कटर बारचा वापर केला जातो. कॉन्केव्हमधून जाणारा पेंढा ब्लोअरद्वारे वेगळा केला जातो. मागील बाजूस वायरच्या जाळीने झाकलेल्या ट्रॉलीमध्ये पाठवला जातो. पेंढ्यापासून राहिलेले धान्य पुन्हा मिळवण्यासाठी कॉन्केव्हच्या खाली एक चाळणी दिली आहे.

यंत्राची काही वैशिष्ट्ये :

एकूण परिमाण (सें.मी.) ः ४६८ × १६० × १९७
ऊर्जेचा स्रोत ः ३५ एचपी किंवा त्याहून अधिकचा ट्रॅक्टर
कटर बार रुंदी, (सें.मी.) ः २००
ब्लोअर आकार (सें.मी.) ः ५० × ७०
कॉन्केव्ह ओपनिंग (सें.मी.) ः २
कटची उंची (सें.मी.) (पेंढा कापण्याची उंची) ः २

उपयुक्तता
१) स्ट्रॉ कंबाइनची कार्यक्षमता ०.४ ते ०.५ हेक्टर प्रति तास एवढी आहे. सुमारे १ ते २ टन भुस्सा प्रति हेक्टरमध्ये मिळू शकतो.
२) पारंपरिक पद्धतीने मळणी करण्याच्या तुलनेत हे यंत्र ५५-६५ टक्के पेंढा यशस्वीरीत्या पुन्हा उपलब्ध होऊ शकते.
३) वाया जाण्याची शक्यता असलेले धान्य प्रति हेक्टरी ७५-१०० किलो पुन्हा मिळू शकते.

डॉ. अमोल गोरे, ९४०४७६७९१७
(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)


इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...