agricultural stories in Marathi, Technowon, students make sugarcane planting machine | Agrowon

विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्र

राजकुमार थोरात
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करताना अधिक मजूर आणि कष्ट लागतात. त्यामुळे लागवडीचा कालावधीही वाढतो. या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ऊस लागवड यंत्राची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही सर्वाधिक लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. सामान्यतः सऱ्यामध्ये पाणी सोडून उसाचे कांडे पायाने दाबण्याची पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीत पाण्याचा अपव्ययही अधिक होतो. त्याच प्रमाणे दिवसेंदिवस मजुरांच्या टंचाईही या कामासाठी भासत असल्याने उसाच्या लागवडीचा कालावधी वाढत जातो. तसेच मजुरीही अधिक जाते. परिणामी, उत्पादनखर्चात वाढ होते. कमी वेळेमध्ये व कमी कष्टामध्ये ऊस लागवड करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्रसाद पाठक, काशिनाथ दुबळे, रोहन लांडगे व वैभव जगताप या विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांना प्राचार्य नागेश ठोंबरे, विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

असे झाले यंत्र तयार
चार चाके असणाऱ्या गाड्यावर एक माणूस बसण्याची सोय केली असून, दुसऱ्या माणसाच्या साह्याने ही गाडी ढकलली जाते. गाडीच्या पुढील बाजूला चरी खोदण्यासाठी छोटा फाळ बसवला आहे. त्यांच्या मागोमाग वरून खालीपर्यंत पोकळ असा पाइप बसवला आहे. त्याच्या शेजारी उसाचे कांडे साठवण्यासाठी बादली बसवली आहे. पाइपच्या मागे एका व्यक्ती बसण्यासाठी सीट तयार केली आहे. त्यावर बसून एक व्यक्ती त्याच्या पुढील पाइपमध्ये हाताने ऊस कांडे टाकेल. गाडा पुढे जाताना आपोआप माती ढकलली जाण्यासाठी दोन तिरक्या प्लेट खाली बसविल्या आहेत.

दुसऱ्या प्रकारामध्ये या चारचाकी यंत्राला चालविण्यासाठी चेन स्प्रॉकेट आणि पॅडेलची सोय केली. सायकलप्रमाणे पॅडल मारून ते चालवता येते. मात्र भुसभुशीत मातीमध्ये पॅडलद्वारे चालवण्यासाठी अधिक श्रम पडत असल्याचे लक्षात आले.

माणसांचे चालवण्याचे श्रम कमी करण्यासाठी छोट्या इंजिनद्वारे या यंत्राला ऊर्जा देता येईल. त्यावर अद्याप प्रयोग सुरू असल्याचे विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी सांगितले.
या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या व मजुराच्या कष्ट आणि वेळेमध्ये बचत होईल. सध्या याच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतामध्ये घेतल्या जात असून, येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकचे प्राचार्य नागेश ठोंबरे यांनी दिली आहे. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व दत्तात्रेय फडतरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अशी होते मजूर आणि वेळेत बचत
पारंपरिक लागवड पद्धत - एक एकर लागवडीसाठी ८ ते १० मजुरांना संपूर्ण दिवस (सुमारे ८ तास) लागतो. ऊस लागवड यंत्राद्वारे - एक एकर लागवडीसाठी दोन मजूर पुरेसे असून, ते तीन तासांत काम पूर्ण करतात.

तृतीय क्रमांकाचे बक्षीस
बारामती येथील एका खासगी कंपनीने ‘स्किल इंडिया डे’ निमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये आलेल्या १०० प्रकल्पांतून या ऊस लागवड यंत्राच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

संपर्क ः
प्रसाद पाठक (विद्यार्थी), ७९७२९८३१८५
उदय चव्हाण (विभाग प्रमुख) , ९९६०३२२६०७
नागेश ठोंबरे (प्राचार्य), ९९६०००३११३


इतर टेक्नोवन
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...