संपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान पेलण्यासाठी व्हा सज्ज

नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन विभागाच्या वतीने संपूर्ण स्वयंचलित पद्धतीच्या हरितगृहासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात संपूर्णपणे मानवरहित लेट्यूस उत्पादनाचे आव्हान ठेवण्यात आले आहे. यात तयार झालेल्या यंत्रणा व अल्गोरिदम हे सहभागी गटांसह सर्वांना उपलब्ध होतील.
संपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान पेलण्यासाठी व्हा सज्ज
संपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान पेलण्यासाठी व्हा सज्ज

नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन विभागाच्या वतीने संपूर्ण स्वयंचलित पद्धतीच्या हरितगृहासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात संपूर्णपणे मानवरहित लेट्यूस उत्पादनाचे आव्हान ठेवण्यात आले आहे. यात तयार झालेल्या यंत्रणा व अल्गोरिदम हे सहभागी गटांसह सर्वांना उपलब्ध होतील. मानवरहित भाजीपाला उत्पादनासाठी स्वयंचलित हरितगृह व तंत्रज्ञान निर्मितीचे तंत्रज्ञान तयार करण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. कोविड महामारीमुळे जगभरामध्ये एकाच जागी जास्त माणसे काम करण्यावर अनेक बंधने आणि मर्यादा आलेल्या आहेत. विविध बैठका, संमेलने, लग्न कार्ये अशा ठिकाणीही शक्य तितकी गर्दी टाळण्याच्या सूचना सर्वत्र आहेत. अशा स्थितीमध्ये हरितगृहासारख्या बंदिस्त ठिकाणी माणसांची गर्दीही धोक्याची ठरत आहे. हे लक्षात घेता वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन विभागाकडून लेट्यूस पिकासाठी स्वयंचलित हरितगृह आव्हान ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याविषयी माहिती देताना आयोजक सिल्के हेम्मिंग यांनी सांगितले, की या स्पर्धेमध्ये दरवर्षी एक पाऊल आपण पुढे जात आहोत. पहिल्या वर्षी काकडी, दुसऱ्या वर्षी टोमॅटो या पिकावर काम केले. मात्र आजवर प्रत्येक तंत्रज्ञान विकासामध्ये मानवी हस्तक्षेपाची किंवा निरीक्षणाची किंवा अत्यंत कमी असल्या तरी माणसांकडून काही बदल करण्याची आवश्यकता भासत होती. उदा. हरितगृहातील वातावरणाचे सेटिंग बदलणे इ. संपूर्णपणे स्वयंचलित, संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे हरितगृह तंत्रज्ञान हे आपले ध्येय असले पाहिजे. या वर्षीच्या आव्हानामध्ये लेट्यूस पीक घेण्यात आले आहे. या पिकाचा कालावधी अत्यंत कमी असून, त्यामध्ये मानवी हस्तक्षेपाविना संपूर्ण वाढ करण्याचे तुलनेने सोपे आव्हान आहे. इथे स्वयंचलित म्हणजे खरोखरच स्वयंचलित अपेक्षित आहे. यात सहभागी होणाऱ्या गटांना पहिल्या प्राथमिक पिकातून त्यांचे अल्गोरिदम मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची संधी असेल. दुसऱ्या पिकामध्ये स्पर्धा सुरू झालेली असेल. त्यात अल्गोरिदममध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. ही स्पर्धा प्रेक्षक वेबसाइटवरून पाहू शकतील. त्यासाठी पिकामध्ये त्रिमितीय रिअल सेन्स कॅमेरे आणि सिग्रो स्टोमॅटो कॅमेरे लावलेले असतील. वातावरणातील सर्व निकष व स्रोत वेळोवेळी प्रकाशित करण्यात येतील. अल्गोरिदम बदलता येणार नसल्यामुळे कोणत्याही गटांना एकमेकांच्या किंवा स्पर्धेत उपलब्ध होणाऱ्या माहितीचा काही उपयोग होणार नाही. पिकाच्या शेवटी प्रत्येक गटाचे मूल्यांकन त्यांनी मिळवलेल्या निव्वळ नफ्यावरून केले जाईल. फळबाग क्षेत्रामध्ये यंत्रमानवांचा वापर वाढत आहे. मात्र हा प्रकल्प स्वयंचलित यंत्रमानवासाठी (मजूर) नाही. वास्तविक लेट्यूस या पिकामध्ये स्वयंचलित यंत्रणांचा वापर अधिक प्रमाणात होतो. अत्याधुनिक लागवड तंत्रज्ञानामध्ये हरितगृहापासून व्हर्टिकल फार्मिंगपर्यंत या पिकाला प्राधान्य दिले जाण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण आहे. अर्थात, या स्पर्धेमध्ये व्हर्टिकल फार्मिग अपेक्षित नाही. या आव्हानाचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा की या स्पर्धेमध्ये बाग घेतलेल्या सर्व गटांची सर्व माहिती (डाटासेट) सार्वजनिक खुला असेल. कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला त्यावर स्वतःचे अल्गोरिदम तयार करू शकतील. त्यातून त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये उपलब्ध होईल. मोठ्या आकाराची हरितगृहाचे व्यवस्थापनही एकाच माणसाला सहजतेने करणे शक्य होईल. शिकण्यासोबत व्यवसायालाही संधी संगणक व यंत्रांची कृत्रिम बुद्धिमत्ता, सहभागींची दूरदृष्टी, कौशल्ये तपासण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. यात विजेत्या गटाला पुढील टप्प्यासाठी त्वरित सहभाग शक्य असेल. पहिल्या आव्हानामध्ये सहभागी झालेल्या एका गटाने ब्ल्यू रॅडिक्स ही कंपनी स्थापन केली असून, हरितगृह उत्पादकांसाठी अल्गोरिदमवर आधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहेत. डेल्फीहून आलेल्या दुसऱ्या गटाने स्वतःचे अल्गोरिदम तयार केले असून, त्यातून स्वतःची सल्लासेवा कंपनी स्थापन केली आहे. याचाच अर्थ, या स्पर्धेतून निर्माण झालेली माहिती व कौशल्ये यांचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारणीसाठी करता येतो. अधिक माहितीसाठी : Wageningen University & Research, वेबसाइट - http://www.wur.nl  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com