agricultural stories in Marathi, Technowon, tractor driven machine for turmeric plantion | Page 2 ||| Agrowon

हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात केल्या सुधारणा

कृष्णा जोमेगावकर
बुधवार, 23 जून 2021

नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शेतकरी शंकरराव मरकुंदे यांनी पारंपरिक पद्धतीने हळद बेणे लागवडीला पर्याय देत स्वत:च्या कल्पकतेने ट्रॅक्टरवर अगदी कमी खर्चात हळद बेणे लावण्याचे यंत्र तयार केले आहे. 

नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीकडे वळले आहेत. पारंपरिक पद्धतीने हळदीचे पीक घेताना मजुरांची वानवा आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे खर्चात प्रचंड वाढ होत चालली आहे. तुलनेने दरामध्ये वाढ झालेली नाही. अशा वेळी कमीत कमी मजुरांमध्ये कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडला जात आहे. बाजारात उपलब्ध यंत्रामध्ये स्थानिक पातळीवरील समस्या आणि अडचणी यानुसार शेतकरीही आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे बदल करून घेत आहेत. चाभरा (ता. अर्धापूर) येथील शंकर मरकुंदे यांनी ट्रॅक्टरच्या सरी यंत्रामध्ये योग्य त्या सुधारणा करून घेतल्या आहेत. ट्रॅक्टरचलित सरी यंत्रामध्ये तीन इंचाचे पीव्हीसी पाइप बसवून, बसण्याची सोय केली आहे. यामुळे हळद बेणे लागवडीतील कष्ट कमी झाले असून,  वेळ आणि खर्चात बचत होते. 

असे आहे यंत्र
शंकरराव मरकुंदे यांनी पारंपरिक पद्धतीने हळद बेणे लागवडीला पर्याय दिला आहे. त्यांनी कल्पकतेने ट्रॅक्टर चलित यंत्रामध्ये सुधारणा केल्या असून, त्यामुळे कमी खर्चात हळद बेणे लावण्याचे यंत्र तयार केले आहे. हळद बेड आणि उसासाठी सरी मारण्याच्या यंत्रावर बसण्यासाठी खुर्ची तयार केली. यंत्रांच्या खालच्या बाजूला तीन इंची पाइप बसवले. या साध्या सुधारणेमुळे माणसांचे खाली वाकून हळद लावण्याचे कष्ट कमी झाले. मजुरांची संख्याही कमी झाली. सरी रेजवर काही सुधारणा करण्यासाठी केवळ चार हजार रुपये खर्च आल्याचे शंकर मरकुंदे यांनी सांगितले.

मरकुंदे यांनी या सुधारणा केलेल्या सरी यंत्राने गेल्या वर्षीही हळदीची लागवड केली होती. या पद्धतीने लागवड वाढविण्यासाठी यंदाही पुढाकार घेतला. 

हळद लागवडीची तुलना 

पारंपरिक  लागवड पद्धत   ट्रॅक्टरचलित सुधारित यंत्राद्वारे लागवड
एकरी लागवडीसाठी सुमारे १० महिला मजूर लागतात लागवडीसाठी दोन मजूर व एक ट्रॅक्टरचालक इतके पुरेसे. 
एकरभर लागवडीसाठी पूर्ण दिवस लागतो.  एक एकर लागवडीसाठी दोन ते अडिच तास पुरेसे. एका दिवसामध्ये ३.२ एकर क्षेत्रावर हळद लागवड शक्य होते.
२०० रुपये प्रति दिन महिलांची मजुरी धरल्यास एकरभर लागवडीसाठी २००० रुपये खर्च होतो. (प्रति एकर २००० रुपये खर्च.)  २०० रुपये मजुरीप्रमाणे दोन मजुरांचे ४०० रुपये आणि डिझेलचा खर्च साधारणपणे ५०० रुपये होतो. मात्र यात सुमारे ३ एकर क्षेत्र लावून होते. म्हणजेच प्रति एकर खर्च  केवळ ३०० रुपये होतो.
बसून आणि वाकून काम करावे लागत असल्याने माणसांना कष्ट अधिक.  बसून आणि वाकून काम करावे लागत असल्याने माणसांना कष्ट अधिक. 

 

स्वत:च्या कल्पकतेने बनविलेल्या हळद लागवड यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व वेळही वाचतात. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. मागील वर्षी स्वतःच्या शेतात केलेली लागवड यशस्वी झाली. सध्या इतर शेतकऱ्यांच्या लागवड करत आहोत. एखाद्या कंपनीच्या सहकार्याने यात आणखी सुधारणा करण्याची इच्छा आहे.
-  शंकर मरकुंदे, ९९२१४५१५३६


इतर टेक्नोवन
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक...
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली...जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सूक्ष्मजीवांच्या साह्याने बनवले...अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे...कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या...
कॉम्प्रेस्ड बायोगॅस ः सुवर्णसंधी की...पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे...
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...