agricultural stories in Marathi, Technowon, Transperant phone : new world of augmented reality | Agrowon

पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या दिशेने पाऊल...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

मोबाईल कंपन्यांनी मोबाईल पारदर्शक करण्यावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचा संपूर्ण मेकओव्हरच करावा लागणार आहे. यासाठी मोबाईलमधील कॅमेरा, सेन्सर्स, अंतर्गत सर्किट इ. सर्व बाबी पारदर्शक बनवाव्या लागणार आहेत.

दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे आपल्याला दिसून येते. दोन व्यक्तींतील समन्वयासाठी शोधण्यात आलेल्या या संपर्क साधनाने तंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेतली आहे. आज अशी स्थिती आहे, की या मोबाईलशिवाय आपण एक दिवसच काय, पण एक तासही राहू शकत नाही. या क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या मोबाईलच्या मॉडेलबरोबरच त्यात नवी नवी फीचर्स अंतर्भूत करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसामध्ये मॉडेलच्या आकाराशिवाय फारसे बदल झाले नव्हते. त्यामुळे या कंपन्यांनी मोबाईल पारदर्शक करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी मोबाईलचा संपूर्ण मेकओव्हरच करावा लागणार आहे. यासाठी मोबाईलमधील कॅमेरा, सेन्सर्स, अंतर्गत सर्किट इ. सर्व बाबी पारदर्शक बनवाव्या लागणार आहेत. ते अर्थातच सोपे नाही. म्हणून ही बाब उपकरणांतील क्रांती म्हणून पाहिली जात आहे.
सध्या काही कंपन्यांना संपूर्ण फोन जरी पारदर्शक करता आला नसला तरी त्याचे काही भाग पारदर्शक करण्यात यश आले आहे. मोबाईल हा आकाराने तुलनेने लहान उपकरण आहे. एकदा ते पारदर्शक बनवणे शक्य झाले तर भविष्यात टेलिव्हिजन, लॅपटॉप, कॅमेरा अशी अनेक उपकरणे पारदर्शक बनवता येतील.

पारदर्शक फोनच्या संशोधनाचा इतिहास ः
१) २००९ मध्ये एलजी या कंपनीने आणलेल्या GD900 या स्टायलिश स्लायडर फोनचा कीबोर्ड हा पारदर्शक होता.

२) त्यानंतर सोनी एरिक्सन कंपनीने आणलेल्या ‘एक्सपेरिया प्युअरनेस’ या फोनचा कीबोर्डसह डिस्प्ले पारदर्शक होता. तंत्रज्ञानातील प्रगतीचा आविष्कार असलेल्या या फोनला तज्ज्ञांनी फारशी पसंती दिली नाही. कारण त्याची दृश्यमानता तितकी चांगली नव्हती.

३) त्यानंतर साधारण दोन वर्षांनी जपानी कंपनी टीडीके यांनी ‘ऑर्गेनिक लाइट इमिटिंग डायोड’च्या (OLED) साह्याने लवचिक, वाकवता येणारे डिस्प्ले तयार केले.

४) २०१२ मध्ये जपानमधील एनटीटी डोकोमो आणि फ्युजित्सू या दोन कंपन्यांनी एकत्रितरीत्या पारदर्शक म्हणजेच पलीकडील संपूर्ण दृश्यमानता देणारा फोन विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून त्यांनी पारदर्शक ओएलईडी टचस्क्रीन असलेले प्रोटोटाइपही तयार केले.

५) त्यानंतरच्या वर्षात तैवान येथील पॉलिट्रॉन टेक्नॉलॉजीज या कंपनीने पारदर्शक फोन तयार केला असल्याचा दावा केला. त्यांच्या प्रोटोटाइपमध्ये कॅमेरा, मेमरी कार्ड आणि मदरबोर्डसारखे काही घटक संपूर्ण पारदर्शक केले होते. हा फोन एखाद्या काचेच्या तुकड्याप्रमाणे पारदर्शक दिसत होता.

या तिन्ही कंपन्यांचे फोन जरी पारदर्शकतेच्या अत्यंत जवळ होते, तरीही त्यांचा फोन अद्याप बाजारात टचस्क्रीन फोनच्या स्पर्धेमध्ये उतरण्याइतकेही शिरकाव करू शकलेले नाहीत. अर्थात, त्यामागील कारणे या कंपन्यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत.

६) नोव्हेंबर २०१८ मध्ये जागतिक स्वामित्व हक्क कार्यालयाने (विपो) सोनी कंपनीच्या दोन्ही बाजूने पारदर्शक डिस्प्ले असलेल्या
फोनच्या स्वामित्व हक्काविषयीची माहिती प्रकाशित केली. त्यानुसार अतिउच्च दर्जाच्या फोन बाजारपेठेमध्ये उतरवण्याची शक्यता आहे.

७) २०१९ मध्ये एलजी या कंपनीला अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून (USPTO) फोल्डेबल ट्रान्स्फरंट स्मार्टफोनच्या डिझाइनसाठी पेटंट मंजूर करण्यात आले. मात्र एलजी ने बाजारातील स्थितीचा अंदाज घेत आपण हा फोन बनविण्याचे थांबविल्याचे घोषित केले.

८) सॅमसंग ही कंपनीही या स्पर्धेमध्ये असल्याचे दिसते. जागतिक स्वामित्व हक्क कार्यालयाच्या (विपो) संकेतस्थळावर ऑगस्ट २०२० मध्ये प्रकाशित माहितीनुसार, सॅमसंगने पारदर्शक फोनसाठी मिळवलेल्या पेटंटचा उल्लेख आहे. मात्र केवळ स्मार्टफोनच नव्हे तर अन्यही काही डिजिटल उपकरणे पारदर्शक आणि चमकत्या डिस्प्ले पॅनेलसह आणण्याचे ध्येय कंपनीने ठेवल्याचे ‘लेट्स गो डिजिटल’ यांच्या अहवालावरून दिसते.

याचे फायदे

  •  येणारे संदेश अधिक अचूकतेने पाहता येतील.
  •  असे वेगवेगळ्या उपकरणांसह कोणताही बाधा न येता सहजतेने वापरता येतील.
  •  त्याच्या दोन्ही बाजूंनीही डिस्प्ले ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे फोनची उलटी आणि सुलटी बाजू असा प्रकारच राहणार नाही.
  •  एकाच वेळी अनेक कामे (मल्टिटास्किंग) करता येणे शक्य. त्याच प्रमाणे फोनच्या एका बाजूला एक विंडो आणि दुसऱ्या बाजूला दुसरी विंडो उघडून दोन कामेही करता येतील.
  •  भविष्यातील आभासी सत्यता (augmented reality) ही अशा उपकरणांमुळे आणखी अचूक होईल. कारण सध्या सत्यता आणि आभासी विश्‍व यात स्क्रिनचाच अडथळा आहे. सध्याच्या एआर सिम्युलेटर आणि अॅपमध्ये जाऊन तुम्हाला सत्यतेचा आभास होतो. या वेगळ्या उपकरणाची गरज कमी होत जाईल, असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात.

आव्हाने, व्यावहारिक अडचणी

गेल्या दशकापासून जागतिक पातळीवरील मुख्य तंत्रज्ञान कंपन्या पारदर्शक फोनच्या निर्मितीच्या स्पर्धेत असल्या तरी त्यांच्यापैकी एकाचाही फोन बाजारपेठेत आलेला नसल्याची बाब या क्षेत्रातील तज्ज्ञ अधोरेखित करतात. संपूर्ण पारदर्शक फोन ही भविष्यातील बाब असली तरी ती अनेक कारणामुळे शक्य नसल्याचे ते स्पष्टपणे मांडतात. या फोनसमोरील आव्हाने नेमकी कोणती आहेत, याचा अंदाज घेऊ.
१) सध्या या कंपन्यांची ओएलईडी तंत्रज्ञानाने पारदर्शक डिस्प्ले बनवणे शक्य झाले असले तरी सेल्फी कॅमेरा आणि मुख्य कॅमेरा पारदर्शक करण्यामध्ये अभियांत्रिकी अडचणी आहेत.
२) पारदर्शक फोनमध्ये सिम कार्ड, मेमरी चीप, स्पीकर्स असे काही भाग दिसून येतील. त्यामुळे पारदर्शकतेला बाधा येण्याचीच शक्यता अधिक आहे. जर हे भाग फोनमध्ये दिसत राहिले तर २०१३ मध्ये आलेल्या पॉलिट्रॉन प्रोटोटाइपपेक्षा फारसा फरक असणार नसल्याचे सांगण्यात येते.
३) पारदर्शकतेमुळे डिस्प्लेतील चित्रे किंवा व्हिडिओची दृश्यमानतेची समस्या उद्भवू शकते. पारदर्शक डिस्प्लेमध्ये प्रतिमा आणि शब्द तितके स्वच्छ दिसणार नाहीत, अशा शंका व्यक्त केली जाते. कारण सध्याचे डिस्प्ले प्रामुख्याने स्वच्छ आणि अचूकतेसाठी तयार करण्यात येत असतात. त्यात दिवसाच्या प्रखर प्रकाशात आणि अंधारातही उत्तम दृश्‍य दिसावे, याकडे अधिक कल असतो.


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...
हाडावर वाढवता येईल संगणक!हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार...
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने...एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...