बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर चिंच लागवड

बेणापूर (जि.सांगली) ः ग्रामस्थांनी टॅंकरने पाणी  आणून  माळरानावरील रोपे जगविण्यास सुरवात केली आहे.
बेणापूर (जि.सांगली) ः ग्रामस्थांनी टॅंकरने पाणी आणून माळरानावरील रोपे जगविण्यास सुरवात केली आहे.

खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील ४१ एकर गायरान जमिनीवरती सप्टेंबर महिन्यात चार हजार रोपांची लागवड करून वनीकरणाला चालना दिली. मात्र सध्या पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे रोपे जगणे कठीण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच सुरेखा शिंदे यांनी स्वखर्चाने टँकरने पाणी आणून रोपांना देण्यास सुरवात केली आहे.

लोकसहभागातून वनीकरण सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे बेणापूर हे गाव आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने आदर्श काम करण्याचा ध्यास जपला आहे. ग्रामपंचायतीच्या गायरान क्षेत्रातील ४१ एकर जमीन नुसते दगड धोंड्याचे माळरान आहे. या माळरानावर ग्रामस्थांनी श्रमदानातून चिंच, गुलमोहर, शिरस, कडूलिंब इत्यादी झाडे लावून नंदनवन फुलवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सरपंच सुरेखा शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य आणि लोकवर्गणीतून वृक्षारोपणाचे काम झाले आहे. लागवड केलेल्या चार हजार रोपांपैकी ३,५०० रोपे चिंचेची आहेत. उरलेल्या पाचशे रोपांमध्ये गुलमोहर, शिरस, कडूलिंबाचा समावेश आहे. चिंचेच्या रोपांची जास्त प्रमाणात लागवड करण्यामागचा उद्देश म्हणजे भविष्यकाळात चिंचेपासून ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न मिळणार आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक रोप जगवण्यासाठी पाणी आणि खतमात्रा देण्यात येत असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी दिली. घाटमाथ्यावर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड झाली आहे. या माळावरती सुरवातीला पावसाचे पाणी अडवण्यासाठी मोठ्या सरी काढण्यात आल्या. त्याच सरीमध्ये खड्डे काढून त्यामध्ये चांगल्या प्रतीची काळी व तांबडी माती भरण्यात आली. बहुतांशी ठिकाणी दगड होते ते बाजूला करून संपूर्ण माळरानावरती रोपांची लागवड करण्यात आली. माळरानावर रोप लागवडीसाठी झालेला खर्च हा ग्रामपंचायत नफा फंड, सरपंच, सदस्य व लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीने गायरानामध्ये लागवड केलेल्या रोपांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये टॅंकरने पाणी आणून लागवड केलेल्या रोपांना देण्यात येत आहे. सध्या रोपे जगविण्यासाठी शासनाने मदत करावी अशी ग्रामस्थांनीची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com