agricultural stories in Marathi, turmeric seed selection & storage | Agrowon

हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची

डॉ. मनोज माळी, डॉ. राजेंद्र भाकरे
शनिवार, 13 एप्रिल 2019

   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जात निश्चित करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे. बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी.

योग्य जातीची निवड

   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जात निश्चित करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे. बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी.

योग्य जातीची निवड

 •  जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. हळव्या जाती लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांत काढणीस येतात. उदा. आंबे हळद.
 • निम गरव्या जाती ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात.
 • गरव्या जाती ८ ते ९ महिन्यांत काढणीस येतात. उदा. सेलम, कृष्णा.
 • त्यामुळे लागवडीपूर्वी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार हळद लागवडीसाठी योग्य जातींची निवड करावी.

हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरली जातात. बेणे निवडतांना खालील काळजी घ्यावी.

 • जेठा गड्डा ः मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठा गड्डा अथवा मातृकंद किंवा गड्डा असे संबोधतात. प्रामुख्याने लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावे. सशक्त, निरोगी, जाड मातृकंद (गड्डा) बेणे म्हणून निवडावेत. बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. आकाराने त्रिकोणाकृती असावे.
 • बगल गड्डे : जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्याच्या खाली येणाऱ्या गड्ड्याला बगल गड्डे असे संबोधतात. त्यास अंगठा गड्डे असेही म्हटले जाते. लागवडीसाठी निवडलेल्या बगल गड्ड्याचे वजन ४० ग्रॅमपेक्षा अधिक असावे.
 • हळकुंडे : बगल गड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. हळकुंडेदेखील बियाण्यासाठी वापरली जातात. बियाणांसाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. जर मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान  आकाराची [भेसळ मुक्त] असावीत.

    बेणे साठवणूक / काळजी

 • निवडलेले बियाणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावे.
 •  बियाण्यांचा ढीग करताना हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. अन्यथा उगवणीवर परिणाम होऊ शकतो.
 • बियाणे थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत. ढीगावर हळदीचा वाळलेल्या पानांचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर द्यावा. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते अशा ठिकाणी पाल्यावर गोणपाट टाकावे आणि केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर शिंपडावे.
 •  साधारणत: २ ते २.५ महिन्यांच्या कालावधीपर्यंत बियाणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ अंतर्गत बदल घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत. सुप्तावस्था संपेपर्यंत बियाण्यांवर पाणी वगैरे शिंपडू नये. साधारण २ ते २.५ महिन्यांत सर्व बियाण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते. सुप्तावस्था संपल्यानंतर बियाणेमध्ये बदल दिसून येतात. या वेळी बियाण्यांवरील डोळे फुगीर होतात, डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर मात्र बियाणे परत निवडावेत. बियांण्यावरील मुळ्या काढाव्यात, पानांचे शिल्लक रहिलेले अवशेष काढावेत आणि मुळ्याविरहित, रसरशीत बियाणे लागवडीसाठी वापरावे.
 •  जर लागवड करण्यास थोडाफार अवधी असेल, तर दिवसातून दोन वेळेस बियाण्यावर पाणी शिंपडावे. पाणी मारल्यामुळे बियाण्यांची एकसारखी उगवण होण्यास मदत होते.
 •  उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बियाण्यांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.

   महत्त्वाचे...

 • हळद लागवडीसाठी हळकुंडे व बगलगड्डे वापरण्यापेक्षा जेठे गड्डे वापरावे, त्यामुळे उत्पादन २५ ते ३० टक्के जास्त येते. बियाणे
 • लागवडीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया अवश्‍य करावी.
 •  हळदीची लागवड रुंद वरंबा पद्धतीने केली असता, सरी वरंबा पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन मिळते.
 •  अधिक उत्पादकतेसाठी हळदीची लागवड ही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच करावी.
 •  हळद लागवडीपूर्वी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे.
 • हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून मिरची, घेवडा, कोथिंबीर, मूग, उडीद, मुळा, भुईमूग ही पिके घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

 


इतर मसाला पिके
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....
हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...