agricultural stories in Marathi, Urea toxicity for animals | Page 2 ||| Agrowon

युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी आवश्यक

डॉ. बी. सी. घुमरे, डॉ. विकास कारंडे
गुरुवार, 29 जुलै 2021

युरिया विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. युरिया विषबाधेची सर्वसाधारण कारणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.

युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. उदा. गाय, बैल, शेळी, मेंढी. लहान वासरांच्या रूमेन या पोटाच्या कप्प्याची पूर्णपणे वाढ झालेली नसल्यामुळे युरियाची विषबाधा तुलनेने कमी होते. मात्र विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. युरिया विषबाधेची सर्वसाधारण कारणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.

युरिया विषबाधेची कारणे :
युरियाचा वापर पशुखाद्यामध्ये उदा. युरिया मोलॅसिस, मूर घास किंवा युरिया प्रक्रियायुक्त चारा यामध्ये अधिक प्रमाणात झाल्यास ते विषबाधेचे कारण ठरू शकते. युरियाचे प्रमाण एक ते दीड ग्रॅम प्रति किलो जनावरांच्या शरीर वजनानुसार (किंवा ४०० ते ४५० ग्रॅम युरिया) विषबाधक ठरू शकतो.

 • युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा चारल्यास.
 • पेरणीच्या वेळी बांधावर ठेवलेले युरिया खत जनावरांनी खाल्ल्यास.
 • युरिया किंवा इतर खताची रिकामी पोती जनावरांनी चाटल्यास.
 • दुभत्या जनावरांना खुराकामधून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घातल्यास.
 • जनावरांमध्ये युरियाची विषबाधा होऊन योग्य उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होतो.

विषबाधेची लक्षणे ः

 • जनावरांच्या तोंडाला फेस येणे.
 • पोटफुगी होते. पोटामध्ये वेदना होतात.
 • जनावरांना उभे राहता येत नाही.
 • जनावरे सतत ऊठ बस करतात. थोडीथोडी लघवी करतात. डोळे मोठे करतात.
 • जनावरांना झटके येतात.
 • युरियामुळे पोटात अमोनिया वायू तयार होतो. त्यामुळे ॲसिडासिस तयार होतो. जनावर बेशुद्ध होऊन जनावराचा मृत्यू होतो.
 • युरियाचे प्रमाण जास्त असेल तर जनावराचा अर्ध्या तासामध्ये मृत्यू होऊ शकतो.

उपचार:
युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात येताच,

 • विषबाधा झालेल्या जनावरांना तत्काळ दोन ते आठ लिटरपर्यंत ताक पाजावे.
 • थंड पाणी पाजावे. (मोठ्या जनावरांना ४० लिटर, तर लहान जनावरांना - २० लिटर)
 • पोटातील वायू काढण्यासाठी जनावरांच्या तोंडात घोड्याचा लगाम घालावा. यामुळे जनावराचे तोंड सतत उघडे राहून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल.
 • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.

प्रतिबंधक उपाय :

 • पेरणीच्या काळात शेतामध्ये पेरणी सुरू असताना मोकळ्या जनावरांवर लक्ष ठेवावे. जनावरांनी बांधावर व अन्यत्र ठेवलेल्या खताच्या पोत्यातील युरिया किंवा अन्य खते खाऊ नयेत, यासाठी खताची पोती व्यवस्थित तोंड बांधून ठेवावे.
 • पशुखाद्याद्वारे आवश्यकतेपेक्षा अधिक युरियाचा वापर टाळावा.
 • दुभत्या जनावरांना पशुखाद्याद्वारे युरिया खाऊ घालू नये.
 • खताची पोती व पशुखाद्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत.
 • युरिया प्रक्रियायुक्त चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा खाऊ घालू नये.
 • वरील प्रकारे काळजी घेतल्यास युरिया विषबाधेमुळे होणारे जनावरांचे मृत्यू टाळता येतील.

संपर्क
डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१
डॉ. विकास व्ही. कारंडे, ९४२००८०३२३

(सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा.)


इतर कृषिपूरक
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...