पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त

कडू कंदाचा वेल
कडू कंदाचा वेल

  कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून महाराष्ट्रातील सगळ्याच जंगलात हा वेल डोंगरकपारीला वाढलेला दिसतो. प्रामुख्याने कोकण तसेच पश्चिमघाट परिसरातील जंगलात मोठ्या झाडावर काटेरी झुडपावर वाढतो.

  • स्थानिक नाव    :     कडू कंद, कडू कांद, कडू करंदा         
  • शास्त्रीय नाव     :     Dioscorea bulbifera L.       
  • इंग्रजी नाव    :     Aerial Yam, Air potato, Bulb bearing yam,Potato yam,       
  • संस्कृत नाव     :     वराहीकन्द, आलुक       
  • कुळ    :     Discoreaceae       
  • उपयोगी भाग    :     कंद         
  • उपलब्धीचा काळ     :     सप्टेंबर- डिसेंबर        
  • झाडाचा प्रकार    :     वेल        
  • अभिवृद्धी     :     कंद        
  • वापर    :     उकडून खाणे     
  • वनस्पतीची ओळख

  • कडू कंदाच्या वेलींना जमिनीत आणि वर पानाच्या बेचक्यातही कंद येतात. पूर्ण वाढ झालेल्या वेलींना जमिनीत लहान मोठे अनेक कंद येतात.
  • पावसाळा संपल्यावर वेल वाळून जातो. कंद खाली जमिनीत तसेच राहतात. पुढच्या पावसाळ्यात कंद परत रुजून नवीन वेल तयार होतो.
  • वेलीचे खोड नाजूक व आधाराने वाढणारे असतात. मोठ्या झाडावर १५ ते २० फुटांपर्यंत चढत जातात.
  • पाने हिरवी, साधी, हृदयकृती आकाराची ७ ते १५ सें.मी. लांब व ९ ते १० सें.मी. रुंद व टोकाशी निमुळती असतात. फुले लहान, एकलिंगी, नियमित, १.५ मि.मी. लांब, लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत झुपक्यांनी येतात. फळे त्रिकोणी २ ते २.५ मि.मी. लांब असतात.
  •  औषधी गुणधर्म

  • हे कंद अतिशय कडू असून शिजवलेले कंद पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खातात.
  • कंद कापून सुजेवर बांधतात. त्यामुळे सूज कमी होते.
  • पाककृती उकडलेल्या कडूकंदाच्या चकत्या   साहित्य : कडूकंदाचे कंद, चवीपुरते मीठ, उकडण्यासाठी पाणी कृती: प्रथम कडूकंदाचे वरील पातळ साल काढून टाकावी. त्याच्या पातळ, पातळ कापा करून पाण्याने स्वच्छ धुऊन, एका पातेल्यात ठेवून उकडून घ्यावेत. नंतर त्या कापांना राख लावून रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्याने स्वच्छ धुऊन चवीपुरते मीठ टाकून उकडून घ्यावे.   आदिवासी लोक एकादशी, बळी प्रतिपदा, पाडवा या काळातील उपवासाला खाण्यासाठी वापरतात. तसेच कंदाचा कडूपणा कमी करण्यासाठी ह कापा नदीच्या वाहत्या पाण्यात ठेवतात. शिजवून खातात.

    टीप ः  खाद्य पदार्थ निर्मिती आणि औषधी वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

       - अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६ (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com