agricultural stories in Marathi, use of Aerial Yam | Agrowon

पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त

अश्विनी चोथे
शनिवार, 19 जानेवारी 2019

 कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून महाराष्ट्रातील सगळ्याच जंगलात हा वेल डोंगरकपारीला वाढलेला दिसतो. प्रामुख्याने कोकण तसेच पश्चिमघाट परिसरातील जंगलात मोठ्या झाडावर काटेरी झुडपावर वाढतो.

 कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून महाराष्ट्रातील सगळ्याच जंगलात हा वेल डोंगरकपारीला वाढलेला दिसतो. प्रामुख्याने कोकण तसेच पश्चिमघाट परिसरातील जंगलात मोठ्या झाडावर काटेरी झुडपावर वाढतो.

 • स्थानिक नाव    :     कडू कंद, कडू कांद, कडू करंदा         
 • शास्त्रीय नाव     :     Dioscorea bulbifera L.       
 • इंग्रजी नाव    :     Aerial Yam, Air potato, Bulb bearing yam,Potato yam,       
 • संस्कृत नाव     :     वराहीकन्द, आलुक       
 • कुळ    :     Discoreaceae       
 • उपयोगी भाग    :     कंद         
 • उपलब्धीचा काळ     :     सप्टेंबर- डिसेंबर        
 • झाडाचा प्रकार    :     वेल        
 • अभिवृद्धी     :     कंद        
 • वापर    :     उकडून खाणे     

 

वनस्पतीची ओळख

 • कडू कंदाच्या वेलींना जमिनीत आणि वर पानाच्या बेचक्यातही कंद येतात. पूर्ण वाढ झालेल्या वेलींना जमिनीत लहान मोठे अनेक कंद येतात.
 • पावसाळा संपल्यावर वेल वाळून जातो. कंद खाली जमिनीत तसेच राहतात. पुढच्या पावसाळ्यात कंद परत रुजून नवीन वेल तयार होतो.
 • वेलीचे खोड नाजूक व आधाराने वाढणारे असतात. मोठ्या झाडावर १५ ते २० फुटांपर्यंत चढत जातात.
 • पाने हिरवी, साधी, हृदयकृती आकाराची ७ ते १५ सें.मी. लांब व ९ ते १० सें.मी. रुंद व टोकाशी निमुळती असतात. फुले लहान, एकलिंगी, नियमित, १.५ मि.मी. लांब, लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत झुपक्यांनी येतात. फळे त्रिकोणी २ ते २.५ मि.मी. लांब असतात.

 औषधी गुणधर्म

 • हे कंद अतिशय कडू असून शिजवलेले कंद पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खातात.
 • कंद कापून सुजेवर बांधतात. त्यामुळे सूज कमी होते.

पाककृती
उकडलेल्या कडूकंदाच्या चकत्या  
साहित्य : कडूकंदाचे कंद,
चवीपुरते मीठ, उकडण्यासाठी पाणी
कृती: प्रथम कडूकंदाचे वरील पातळ साल काढून टाकावी. त्याच्या पातळ, पातळ कापा करून पाण्याने स्वच्छ धुऊन, एका पातेल्यात ठेवून उकडून घ्यावेत. नंतर त्या कापांना राख लावून रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्याने स्वच्छ धुऊन चवीपुरते मीठ टाकून उकडून घ्यावे.  
आदिवासी लोक एकादशी, बळी प्रतिपदा, पाडवा या काळातील उपवासाला खाण्यासाठी वापरतात. तसेच कंदाचा कडूपणा कमी करण्यासाठी ह कापा नदीच्या वाहत्या पाण्यात ठेवतात. शिजवून खातात.

टीप ः  खाद्य पदार्थ निर्मिती आणि औषधी वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

   - अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

 


फोटो गॅलरी

इतर कंद पिके
..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जातीकेंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९...
हळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...
तंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
सुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह,...जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
बटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्रबटाटा पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची आवश्यकता...
भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...
आरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...
कांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...
बटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...
रताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...
शास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...
फळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
बिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड...