agricultural stories in Marathi, use of asparagus in animal feed | Page 2 ||| Agrowon

पशुआहारात वापरा शतावरी
कु. प्रणिता सहाणे
गुरुवार, 6 जून 2019

जनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर ठरतो. गाई, म्हशीच्या दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी शतावरी वनौषधींचा वापर फायदेशीर ठरतो.

जनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर ठरतो. गाई, म्हशीच्या दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी शतावरी वनौषधींचा वापर फायदेशीर ठरतो.

दुग्धोत्पादनाचा संबंध हा दुधाळ जनावरांच्या आरोग्याशी आणि आहाराशी असतो. जनावराला कितीही उत्तम चारा किंवा खाद्य दिले पण जनावरांचे आरोग्य चांगले नसेल, तर दुग्धोत्पादनात वाढ होणे शक्य नाही. जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सगळ्याच ऋतूमध्ये त्यांचे आजारांपासून संरक्षण करणे गरजेचे असते. जनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर ठरतो. दुधाळ जनावरांचे स्वास्थ आणि दूधवाढीसाठी उपयुक्त व लाभदायक वनस्पती आपल्याकडे आहेत त्यांचा वापर पशुआहारात करणे आवश्यक आहे. शतावरीच्या मुळ्या, अंकुर हा उपयुक्त भाग आहे.

शतावरीचे फायदे:

१) दुभत्या जनावरांसाठी शतावरी ही एक अत्यंत उपयुक्‍त वनस्पती आहे. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
२) जनावरांची रोगप्रतिकार शक्‍ती वाढते त्याचबरोबर त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी येणारा खर्च कमी होतो.
३) शतावरी दिल्याने गाई, म्हशीमधील दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच २५ ते ३० टक्के नवजात जनावरांच्या वजनात वाढ होते. शतावरीचा वापर केल्यानंतर जनावरे योग्य वेळी तयार होतात.
४) शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्‌स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत.

औषधी उपयोग:

१) गाई म्हशीमधील दूध वाढविण्यासाठी
वापर : गाई म्हशी (दुभती)
वापरण्याचा प्रकार : शतावरी वनस्पतीच्या वाळविलेल्या मुळांची भुकटी
मात्रा:
१) व्यायल्यानंतर २० ते ३० दिवस होण्यापूर्वी आणि ९० दिवसांनंतर शतावरी देणे उपयुक्त.
२) दूध देत असेपर्यंत रोज ३० ग्रॅम सकाळी आणि ३० ग्रॅम सायंकाळी खाद्यातून शतावरीच्या मुळांची भुकटी द्यावी.

संपर्क ः कु. प्रणिता सहाणे ८६००३०१३२९
( कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर)

इतर कृषिपूरक
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...