आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट

ड्रॅगन फ्रूट
ड्रॅगन फ्रूट

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटमधील घटक फायदेशीर ठरतात. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत होते.

ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, आइस्क्रीम, जेली आणि वाइन बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर होतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत होते.

  • ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगन फ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते.
  • ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे
  • फळात जीवनसत्त्व सी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, आणि जीवनसत्त्व बी तसेच ९० टक्के पाणी असते.
  • बाहेरून जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो. त्यात लहान बिया असतात. त्या खाल्ल्या तरी चालतात.
  • फळामध्ये तंतुमय पदार्थ असल्याने पोट साफ राहते. साहजिकच एकदा पोट साफ असले की ९० टक्के व्याधी नाहीशा होतात. रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका राहत नाही. यामध्ये बीटा कॅरोटिन असल्याने रक्तदाब, हृदयविकार सर्वांवर मात करता येते.
  • यातील लोह रक्ताचे हिमोग्लोबिन वाढवते. अनेमिया होऊ देत नाही.
  • यातील घटकामुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. कर्करोगाला प्रतिकारक्षमता वाढविते.
  • रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.
  • - एस. एस.पटांगरे, ९१७२७२१३०१ (अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com