agricultural stories in Marathi, use of micro nutrients in Onion crop | Agrowon

जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

डॉ. साबळे पी. ए., सुषमा साबळे
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन वेळीच त्यांची पूर्तता करावी. कांदा पुनर्लागवडीनंतर पिकात सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसू शकते. प्रत्येक मुलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणाऱ्या लक्षणांची व्यवस्थित नोंद घ्यावी.

माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन वेळीच त्यांची पूर्तता करावी. कांदा पुनर्लागवडीनंतर पिकात सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसू शकते. प्रत्येक मुलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणाऱ्या लक्षणांची व्यवस्थित नोंद घ्यावी.

अनेक वेळा कीड, रोगाचा प्रादुर्भाव आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता यांच्या लक्षणांमध्ये समानता दिसून येते. या दोन्हीतील भेद लक्षात घ्यावा. आवश्यकता भासल्यास परिसरातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण (ग्रेड -४) लोह (४ %), जस्त (६ %) ,मँगेनीज (१ %), तांबे (०.५%), बोरॉन (०.५ %) हे २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्यावे. किंवा (ग्रेड -२) जस्त (३ %), लोह (२.५%), मंगल (१ %), तांबे (१ %) आणि बोरॉन (०.५%) हे ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीद्वारेही पूर्तता करता येते.

बाजारात सूक्ष्म अन्नद्रव्यांची विविध प्रमाणातील मिश्रणे उपलब्ध आहेत. त्यातील घटक जाणून योग्य मात्रेमध्ये फवारणी करावी लागते. आपल्या जमिनीत ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, किंवा पिकामध्ये लक्षणे दिसत आहेत, त्यानुसार योग्य त्या मिश्रणाची निवड करावी.

कांदा वाढ आणि फुगवणीसाठी
कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि ६० ते ७५ दिवसांनी १३:००:४५ किंवा ०:०:५० यापैकी एक विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. उत्पादन वाढीसाठी फायदा होतो.

- डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२
(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.)


फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
उशिरा गहू लागवडीचे तंत्र...बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (...
तेलाचं ‘पामर’ जंगलनैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो...
द्राक्ष बागेतील घडकूज, मणीगळीवर...सध्या बागेतील वातावरणातील बिघाडामुळे...
शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता केळी...शासन मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहते, परंतु...
शेतकरी नियोजन पीक : संत्राशेतकरी नाव ः ऋषिकेश सोनटक्‍के गाव ः टाकरखेडा...
शंखी गोगलगायींचे नियंत्रण शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड रात्रीच्या...
शेतकरी नियोजनः शेळीपालनशेळीपालनास सुरवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या विविध...
थंडीचा पिकावरील परिणाम कमी करणारे उपायसध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे...
यशाला आवश्यक पैलू पाडणारे गुजरातगुजरात हे भारताच्या प. किनारपट्टीवरील...
थंडीमध्ये घ्या केळी बागांची काळजीहिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात...
आठवड्याच्या सुरुवातीस पाऊस, नंतर थंडीत...हिवाळी हंगामात पाऊस होण्यामुळे आणि ढगाळ हवामान...
करडईमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी फटीच्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
द्राक्ष बागेत रोगांचा प्रादुर्भाव कमी...सध्या द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये कमी-अधिक...
द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरतेची...दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत...
शेतकरी नियोजन - कुक्कुटपालननाव : शत्रुघ्न नामदेव जाधव गाव : विटा...
शेतकरी नियोजन - पीक केळीएप्रिल व मे महिन्यातील केळी लागवडीमध्ये निसवण...
अन्नपदार्थांतील पोषण विरोधी घटक परिणाम...अन्नपदार्थात जसे पोषक घटक असतात. त्याप्रमाणे पोषण...
सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित...विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ...
वनशास्त्रातील शिक्षण, व्यावसायिक संधी वने ही जैवविविधतेचे आगर आहेत. हे लक्षात घेता बी....