दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
कृषी प्रक्रिया
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोग
शेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून, शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. शेवग्याची भाजी बहुतेकांच्या आहारामध्ये असते. त्यात उत्तम स्वादाप्रमाणेच भरपूर पोषणतत्त्वेही आढळतात. या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. शेवगा या वनस्पतीला अधिक पाण्याची आवश्यकता नाही. त्याची जलद गतीने वाढ होते. शेवगा लागवड कोणत्याही जमिनीमध्ये करणे शक्य आहे. भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे की शेवग्याचा मुख्यतः उत्तर भारतातून जगभरात प्रसार झाला आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो.
शेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून, शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. शेवग्याची भाजी बहुतेकांच्या आहारामध्ये असते. त्यात उत्तम स्वादाप्रमाणेच भरपूर पोषणतत्त्वेही आढळतात. या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. शेवगा या वनस्पतीला अधिक पाण्याची आवश्यकता नाही. त्याची जलद गतीने वाढ होते. शेवगा लागवड कोणत्याही जमिनीमध्ये करणे शक्य आहे. भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे की शेवग्याचा मुख्यतः उत्तर भारतातून जगभरात प्रसार झाला आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो.
शेवगा वनस्पतीतील गुणांविषयी लोकांमध्ये मोठे अज्ञान आहे. विदेशात शेवग्याच्या पानांपासून भुकटी तयार त्याचा विविध प्रकारे वापर केला जातो. अशी भुकटीला मूल्यही चांगले मिळते. आरोग्यासाठी त्याच्या कॅप्सूलही वापरल्या जातात. शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
शेवग्याच्या पानाची भुकटी करण्याची घरगुती पद्धत ः
कृती :
१. शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून घ्या.
२. ती पाने एका स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत वाळवत ठेवावी.
३. पाने वाळवताना प्रत्यक्ष सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्यावी. सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.
४. शेवग्याची पाने वाळवताना मच्छरदाणी किंवा जाळीदार कापडाने झाकावीत.
५. शेवग्याची पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.
६. पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून बारीक भुकटी करून घेणे.
७. तयार झालेली शेवग्याच्या पानांची भुकटी हवाबंद डब्यात साठवावी, त्यामुळे भुकटीचे हवा, आर्द्रता, उष्णता व प्रकाशापासून संरक्षण होईल.
सेवन असे करावे
सामग्री :
१. एक चमचा भुकटी
२. एक चमचा मध
३. एक लिंबू
४. गरजेनुसार आले (अद्रक) बारीक तुकडे
५. एक ग्लास कोमट पाणी
तयार करण्याची कृती :
१. एक ग्लास पाण्यात शेवग्याच्या पानांची भुकटी घेऊन ५ मिनिटे उकळून घ्या.
२. त्यात थोडे अद्रकाचे तुकडे टाकून लिंबू पिळावे.
३. आवश्यक गोडी मिळवण्यासाठी चवीपुरता मध टाकावा.
फायदे :
१. शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट (आरोग्यदायी घटक) मोठ्या प्रमाणात आढळतात.
२. १०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. त्यात गाजर पेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.
३. वजन कमी करणे : शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते.
४. शरीरातील विषारी घटक काढणे : शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते.
५. त्वचा व केसांसाठी उपयुक्त : शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.
६. पचन क्षमता वाढवणे : या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते. पोटाचा अल्सर व अन्य व्याधी नष्ट होतात.
७. अनिद्रेपासून मुक्तता : शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या संप्रेरकामुळे झोपेचे चक्र सुधारते. नेहमी उत्साह वाटतो.
या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.
तुषार देसले, ९४२१०४७३६४
(सहा. प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय, अंमळनेर)
- 1 of 15
- ››