agricultural stories in Marathi, use of rice bran in process industry | Agrowon

प्रक्रियेसाठी भाताचा कोंडा

डॉ. अमोल खापरे
मंगळवार, 14 मे 2019

भात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप नैसर्गिकरीत्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करते. यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच प्रतिजैविके असतात.

भात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप नैसर्गिकरीत्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करते. यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच प्रतिजैविके असतात.

  • कोंडा हा तांदळावरील बाह्य पातळ थर असतो. त्यामध्ये संयुक्त ऑलिओरॉन आणि पेरीकर्प थर असतात. कोंडा हा एकूण तांदळाच्या दहा टक्के प्रमाणात असतो. कोंडा हे तांदूळ गिरणीतील उप-उत्पादन आहे. तांदूळ कोंडा हे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, तंतुमय पदार्थ, प्रतिजैविके, कर्बोदके आणि इतर पोषक घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहे. विशेषतः कोंड्यामध्ये टॉकोफेरोल, जी-ऑरिझॅनॉल, स्टेरोल आणि कॅरोटीनोड्सचे प्रमाण असते.
  •  कोंड्यामध्ये जीवनसत्त्व ई, बी-कॉम्प्लेक्स, जी-ऑरिझॅनॉल आणि फायटोस्टेरॉल यांचा समावेश होतो. यामध्ये सर्व आवश्यक अमीनो ॲसिड आहे. कोंड्यामधील ऑरिझॅनॉल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते.
  •  संशोधनाच्या निष्कर्षानुसार यातील 'टोकोट्रियनोल्स' पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबू शकतो, तसेच हे एचबीए १ सी आणि रक्तातील लिपिडचे (चरबी) प्रमाण कमी करू शकते. मधुमेह (प्रकार-२) हे आजारावर फायदेशीर आहे.
  • कोंडामधील फायटोस्टेरॉल हे शरीरातील विविध हार्मोनची पातळी सुधारण्यास मदत करतात. यामधील उच्च प्रमाणातील तंतुमय पदार्थ आपल्या पचनासाठी चांगले असते.
  •  कोंड्यामध्ये २३ टक्के तेल असते. जे स्वयंपाकासाठी उत्तम असते.

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांमध्ये वापर
    बेकरी, नूडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करताना त्यातील प्रमुख धान्यपिठात (गहू किंवा तांदूळ पीठ) १० ते २० टक्के तांदूळ कोंडा पीठ मिसळून पदार्थांचे पोषणमूल्य वाढविता येते.

त्वचा उपचार
    नैसर्गिक सौंदर्य उपचार म्हणून कोंडा तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यातील ऑलिक ॲसिडचे उच्च प्रमाण हे मानवी त्वचेमध्ये शोषले जाते. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि जी-ऑरिजॅनॉलसह अँटिऑक्सिडंट्स समाविष्ट आहे, जे रंगद्रव्य विकासावर प्रभाव पाडतात.

बायोडिझेल उत्पादन
भात कोंडा तेल हे बायोडिझेल निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते.

पशुखाद्य
     गायी, म्हशी, शेळ्या, वराहांसाठी तांदूळ कोंडा हे खाद्य म्हणून वापरले जाते.

भात कोंडा हे सुपर फूड
भात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप नैसर्गिकरीत्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करते. तांदूळ कोंडा हा सुपर फूड आहे. यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच प्रतिजैविके असतात. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा होतो. विविध प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात भाताचा कोंडा मिसळून, आपल्या आहारामध्ये जास्त कॅलरीज न जोडता आपण अन्नपदार्थांचे पोषण सहजरीत्या वाढवू शकतो.

 

तेल उद्योगांतील वापर

  •  कोंड्यापासून तयार केलेले मूल्यवर्धित खाद्यतेल कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण कमी करणारे असून नैसर्गिकरीत्या ऑरिझॅनॉलने समृद्ध आहे.
  •   कोंड्यामध्ये १८ ते २३ टक्के तेल असते, जे पॉलिअनसॅच्युरेट्स आणि मोनोअनसॅच्युरेट्समध्ये स्निग्ध आम्लांनी उच्च असते. उच्च तापमानांमध्ये यातील पोषक गुणधर्म स्थिर असतात.
  •  तेलामध्ये अनेक आरोग्यपूर्ण गुणधर्म आहेत. त्यातील टोकोफेरोल, टोकोटीरिनॉल आणि जी-ऑरिजनॉल हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

- डॉ. अमोल खापरे, ०८०५५२२६४६४

(अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

 

 

 


फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित...रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात...
सुधारित पद्धतीने टिकवा मासेमासे खारवून टिकविणे ही पद्धत तुलनात्‍मक स्‍वरूपात...
मैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी...बेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे,...
मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून...ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते....
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंतीऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई...
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...