agricultural stories in Marathi, use of vitamines in animal feed. | Agrowon

जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे
डॉ. गोपाल मंजुळकर
गुरुवार, 28 मार्च 2019

जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. जीवनसत्त्वे शरीरातील उतींमध्ये नैसर्गिक चयापचयासाठी अल्प प्रमाणात गरजेची असतात. वाढ, रोगप्रतिकारकशक्ती  आणि प्रजनन क्षमता अबाधित ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे उपयोगी आहेत.

जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. जीवनसत्त्वे शरीरातील उतींमध्ये नैसर्गिक चयापचयासाठी अल्प प्रमाणात गरजेची असतात. वाढ, रोगप्रतिकारकशक्ती  आणि प्रजनन क्षमता अबाधित ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे उपयोगी आहेत.

जनावरांच्या आहारात प्रथिने, पिष्ठमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ व खनिज द्रव्ये या अन्नद्रव्याशिवाय इतर काही द्रव्यांची आवश्यकता असते. जनावरांची निकोप वाढ आणि शरीर क्रियेसाठी आहारातून आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते. जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. जीवनसत्त्व हा सेंद्रिय पदार्थ असून शरीरातील ऊतींमध्ये नैसर्गिक चयापचयासाठी अल्प प्रमाणात गरजेचा आहे.  जनावरांचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनसत्त्वे आवश्यक आहेत. काही जीवनसत्त्वे शरीरातच तयार होतात, तर काही आहारातून घ्यावी लागतात.

स्निग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे
जीवनसत्त्व अ :
फायदे ः
पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहतो.
जनावरांच्या वाढीसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी व प्रजनन क्षमता अबाधित ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
अभाव ः    
अभावाने रातआंधळेपणा होतो. वार न पडणे, जनावर    उशिरा माजावर येणे, स्त्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबते, मुका माज दिसतो. कमतरतेमुळे प्रजोत्पादन  संस्थेतील पेशींची तसेच श्लेमपटलांची वाढ नीट होत     नाही.
जनावर आडणे, वासराचा मृत्यू होणे, कमजोर वासरांना जन्म देणे, वार/झार अडकणे, गर्भाशयाचा दाह तसेच गर्भाच्या सुरुवातीच्या स्थितीतच मृत्यू होणे यासारख्या समस्या आढळून येतात.
 उपलब्धता ः
हिरवा मका, हिरवे गवत, गाजर या माध्यमातून उपलब्ध होते.

जीवनसत्त्व ड :
फायदे ः 
कॅल्शियम, स्फुरदाचे रक्तात रुपांतर करण्यासाठी आवश्यक.
अभाव:  
मुडदुस रोग होतो. रक्तातील कॅल्शियम व स्फुरदाचे शोषण योग्य प्रकारे होते. दातांचा विकार व हाडे ठिसूळ बनतात. गुडघ्यामध्ये पोकळी, सांध्याचा आजार होतात.
उपलब्धता:
कोवळ्या सूर्यकिरणापासून हे जीवनसत्त्व मिळते. यासाठी जनावरे काही वेळ सकाळच्या उन्हात बांधावीत. उन्हात वाळलेले गवत भरपूर प्रमाणात द्यावे.

जीवनसत्त्व इ :
फायदे :  
जीवनसत्त्व ‘इ’ व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते, शरीर निकोप तसेच कातडी निरोगी ठेवण्यासाठी फायद्याचे आहे. प्रजननासाठी आवश्यक आहे.
अभाव:  
हृदयाच्या स्नायूवर विपरीत परिणाम होतो.
कमतरतेमुळे प्रजनन व वंधत्वाचे रोग होतात, जनावर माजावर येत नाही.
उपलब्धता:
प्रजनन क्षमतेची उणीव दिसून आल्यास पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जीवनसत्त्व इ चे इंजेक्शन द्यावे.
हिरवे पदार्थ, चारा आणि धान्य पदार्थात रुपांतर करून देणे.
मोड आलेली मटकी आणि गव्हाचे अंकुर यामध्ये ई जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळते.
गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात ई जीवनसत्त्व जनावरास दिल्यास वार अडकण्यासारख्या समस्या टाळता येतात.

 जीवनसत्त्व के:
फायदे:  
जीवनसत्त्व ‘के’ रक्त गोठविण्यासाठी फायदेशीर.
अभाव:
जखमेतून रक्तस्राव जास्त होतो.
उपलब्धता:
जीवनसत्त्व ‘के’ हे सर्व प्रकारच्या हिरवा चारामध्ये उपलब्ध असते. हे जीवनसत्त्व खाद्यातून द्यावे लागते.

पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे ः
जीवनसत्त्व ब:
फायदे: 
जीवनसत्व ‘ब’ हे मज्जातंतू कार्यान्वित होण्यासाठी आणि चयापचयाच्या क्रियेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहे. कमतरतेमुळे कुपोषणासारख्या समस्या दिसतात.
अभाव:  
जीवनसत्त्व ‘ब’च्या अभावी मज्जातंतू सुजणे, स्नायूंची हालचाल न होणे ही लक्षणे दिसतात.
उपलब्धता:
 रवंथ करणाऱ्या जनावरांच्या मध्ये कोटीपोटात हे जीवनसत्त्व तयार होत असल्यामुळे त्यांची कमतरता सहसा भासत नाही.  जीवनसत्त्वांची कमतरता भासल्यास कृत्रिमरीत्या जीवनसत्त्वे खाद्यातून किंवा इंजेक्शनद्वारे द्यावीत.

जीवनसत्त्व क  :
फायदे:  
रोगप्रतिकारशक्ती तसेच जखमा भरून येण्यासाठी फायदेशीर आहे.
अभाव:  
अभावामुळे स्कर्व्ही रोग होतो.
उपलब्धता:    
हे जीवनसत्त्व संत्रा, लिंबू, चिंच, तसेच इंजेक्शनद्वारे जीवनसत्त्व ''क'' दिले जाते.

 -  डॉ. गोपाल मंजुळकर, ९८२२२३१९२३
(विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान),कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...