प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत शेतकऱ्यांचा गळा : डॉ. गवस

प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत शेतकऱ्यांचा गळा : डॉ. गवस
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत शेतकऱ्यांचा गळा : डॉ. गवस

पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच आता शेतकऱ्यांची शत्रू झाली आहेत. कुठल्याही तहसीलदार कार्यालयात जा, कुठल्याही शाळेत जा, कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, तिथं शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि हीच पोरं शेतकऱ्यांचा गळा घोटताहेत. अशा भयावय वास्तवामध्ये तुम्ही आम्ही जगतोय, अशा वेळी ‘ॲग्रोवन' या व्यवस्थेत समजंस हस्तक्षेप करतो आहे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.

‘सकाळ ॲग्रोवन''च्या वतीने आयोजित ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डस वितरण कार्यक्रमात बुधवारी (ता. ८) डॉ. गवस बोलत होते. ते म्हणाले, की भारतीय शेतकरी हा स्वतःची शेती परिस्थिती लक्षात घेत विविध पद्धतींनी करत होता. तोच शेतकरी नंतरच्या काळात कोणत्या अवस्थेला आलेला आहे, हे आपण बघत आहोत. आपल्या शेतकऱ्याला भिकेला लावण्याचे काम आपल्या ज्ञानी आणि राजकारणी लोकांच्या अडाणी हस्तक्षेपामुळे झाले. हे ज्ञानी लोक शेतकऱ्याला अडाणी म्हणतात. पण अडाणी हा शब्द शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी कोणाला अडाणी म्हणतो, तर ज्याला कुळव धरता येत नाही, नांगरता येत नाही, खुरपता येत नाही, कापता येत नाही, मळता येत नाही, त्यांना अडाणी म्हणतो. या बहाद्दरांनी हा शब्द त्याच्यावर उलटा उलटवला.

डॉ. गवस म्हणाले की, विविध विमा कंपन्या शेतकऱ्यांचा गळा घोटताहेत, त्यांची लूटमार करताहेत. भाताचे अनेक वाण खेड्यापाड्यात विक्रीला जातात, तरीदेखील शेती बकाल पडते. उगवला नाही वाण तर दाद कोणाकडे मागायची? कृषी सेवा केंद्रांनी तर शेतकऱ्याला भिकारी बनविले आहे. बोगस कंपन्यांपासूनही सावध राहा. अंधश्रद्धेतून मुक्त झालेल्या शेतकऱ्याला अंधश्रद्धेकडे नेण्यासाठी नवे सापळे रचले जातील. नव्या सापळ्यात अडकविण्यासाठी, वेदमंत्र शिकविण्यासाठी कोणीतरी येईल, त्याला सांगा की, माती श्रेष्ठ आहे, ती आम्हाला जगवेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com