agricultural stories in Marathi, views of Dr.Rajan Gavas in Agrowon Award programme | Page 2 ||| Agrowon

प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत शेतकऱ्यांचा गळा : डॉ. गवस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच आता शेतकऱ्यांची शत्रू झाली आहेत. कुठल्याही तहसीलदार कार्यालयात जा, कुठल्याही शाळेत जा, कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, तिथं शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि हीच पोरं शेतकऱ्यांचा गळा घोटताहेत. अशा भयावय वास्तवामध्ये तुम्ही आम्ही जगतोय, अशा वेळी ‘ॲग्रोवन' या व्यवस्थेत समजंस हस्तक्षेप करतो आहे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.

पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच आता शेतकऱ्यांची शत्रू झाली आहेत. कुठल्याही तहसीलदार कार्यालयात जा, कुठल्याही शाळेत जा, कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, तिथं शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि हीच पोरं शेतकऱ्यांचा गळा घोटताहेत. अशा भयावय वास्तवामध्ये तुम्ही आम्ही जगतोय, अशा वेळी ‘ॲग्रोवन' या व्यवस्थेत समजंस हस्तक्षेप करतो आहे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.

‘सकाळ ॲग्रोवन''च्या वतीने आयोजित ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डस वितरण कार्यक्रमात बुधवारी (ता. ८) डॉ. गवस बोलत होते. ते म्हणाले, की भारतीय शेतकरी हा स्वतःची शेती परिस्थिती लक्षात घेत विविध पद्धतींनी करत होता. तोच शेतकरी नंतरच्या काळात कोणत्या अवस्थेला आलेला आहे, हे आपण बघत आहोत. आपल्या शेतकऱ्याला भिकेला लावण्याचे काम आपल्या ज्ञानी आणि राजकारणी लोकांच्या अडाणी हस्तक्षेपामुळे झाले. हे ज्ञानी लोक शेतकऱ्याला अडाणी म्हणतात. पण अडाणी हा शब्द शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी कोणाला अडाणी म्हणतो, तर ज्याला कुळव धरता येत नाही, नांगरता येत नाही, खुरपता येत नाही, कापता येत नाही, मळता येत नाही, त्यांना अडाणी म्हणतो. या बहाद्दरांनी हा शब्द त्याच्यावर उलटा उलटवला.

डॉ. गवस म्हणाले की, विविध विमा कंपन्या शेतकऱ्यांचा गळा घोटताहेत, त्यांची लूटमार करताहेत. भाताचे अनेक वाण खेड्यापाड्यात विक्रीला जातात, तरीदेखील शेती बकाल पडते. उगवला नाही वाण तर दाद कोणाकडे मागायची? कृषी सेवा केंद्रांनी तर शेतकऱ्याला भिकारी बनविले आहे. बोगस कंपन्यांपासूनही सावध राहा. अंधश्रद्धेतून मुक्त झालेल्या शेतकऱ्याला अंधश्रद्धेकडे नेण्यासाठी नवे सापळे रचले जातील. नव्या सापळ्यात अडकविण्यासाठी, वेदमंत्र शिकविण्यासाठी कोणीतरी येईल, त्याला सांगा की, माती श्रेष्ठ आहे, ती आम्हाला जगवेल.


इतर इव्हेंट्स
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
AGROWON_AWARDS : अपंगत्वावर मात करीत...ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार...
‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून...
AGROWON_AWARDS : देशी, परदेशी ३०...ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार शेतकरी -...
AGROWON_AWARDS : नावीन्यपूर्ण तंत्रातून...अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - ...
AGROWON_AWARDS : तंत्रज्ञानातून शेती...ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार -...
AGROWON_AWARDS : बांबूच्या यशस्वी...ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
AGROWON_AWARDS : दीडशे एकर शेतीचे रुपडे...अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...
AGROWON_AWARDS : संवर्धित शेतीचे बीज...अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्र स्मार्ट शेतकरी...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
समृद्ध शेती योजनेतील सातव्या बक्षिसाचे...पुणे : ॲग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजनेची सोडत...
नांदेडचे देशमुख दोन लाखांच्या...पुणे ः सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस...
शेतकऱ्यांनी उघडले पूरक व्यवसायातील...सकाळ ॲग्रोवनच्या वतीने औरंगाबाद शहरातील जबिंदा...
बांबू शेती शेतकऱ्यांना समृद्ध करणारीबांबू शेतीमध्ये प्रचंड मोठे अर्थकारण दडलेले असून...
प्रदर्शनातून मिळाले नव्या पर्यायाचे...सकाळ-अॅग्रोवन परिवाराच्या वतीने औरंगाबादला कृषी...
दुष्काळात ३५ एकरांवरील फळबाग...शाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक शेती पद्धतीला...
प्रदर्शनात यंत्रे, नवीन तंत्र, ट्रॅक्टर...   औरंगाबाद (प्रतिनिधी) ः अॅग्रोवनचे...
सीताफळाने दिली दुष्काळातही शेतकऱ्यांना...औरंगाबाद : कधीकाळी दुर्लक्षित म्हणून ओळखल्या...
दुष्काळातही आम्ही जिद्द सोडलेली नाही !औरंगाबाद : 'दुष्काळाचे सर्वांत जास्त चटके...