विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर गायकवाड

विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर गायकवाड
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर गायकवाड

पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची बेटं आहेत. या बेटांचा स्मार्ट ॲवॉर्डच्या निमित्ताने आज गौरव होतो आहे. आपआपल्या भागात कष्टाने वर्षानुवर्षे प्रयोग करणारे शेतकरी हीच खरी प्रकाशाचीही बेटं आहेत. ती वाढविण्यासाठी स्मार्ट शेतीची संकल्पना पुढे नेली पाहिजे,’ असे उद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

शेतीच्या भविष्यकालीन वाटचालीत प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याला ज्ञानी अर्थातच 'स्मार्ट' व्हावे लागेल. ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग करणारे शेतकरी संजीव माने किंवा भात शेती, फळबागेत झोकून दिलेले अनिल पाटील असोत; ही सर्व स्मार्ट शेतीची उदाहरणं आहेत. राज्यातील कृषी पदवीधरदेखील चांगली शेती करीत आहेत. प्रयोगशील शेती करणारे प्रतापराव चिपळूणकर हे कृषी पदवीधरच आहेत. विविध भागांत प्रयोगशील शेती करणाऱ्या कृषी पदवीधरांच्या उपक्रमांचे संकलन कृषी विभागाने करावे, असेही श्री. गायकवाड यांनी सुचविले.

'ॲग्रोवन'चा मी पहिल्या अंकापासून वाचक आहे. चांगले काही वाचायचे असल्यास ॲग्रोवन वाचावा लागतो. संघर्ष किंवा आंदोलन असले की माध्यमांचे प्रतिनिधी गोळा होतात. मी देखील ते अनुभवतो. मात्र, चांगल्या घडामोडींसाठी मला 'ॲग्रोवन' वाचावा लागतो. माहितीच्या रूपाने शेतकऱ्यांना ज्ञानी करणारा हा उपक्रम आहे. मी देखील गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीविषयक कायद्यांची माहिती देत आहे. एकविसाव्या शतकाकडे जाणारा शेतकरी ज्ञानमय करावा लागेल. विदेशात अनाकलनीय शिक्षण घेण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांना त्यांना हवी ती माहिती देण्याचे उपक्रम कृषी क्षेत्रात उपयुक्त ठरतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com