agricultural stories in Marathi, views of Shekar Gaikwad regarding agriculture development | Agrowon

विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर गायकवाड
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची बेटं आहेत. या बेटांचा स्मार्ट ॲवॉर्डच्या निमित्ताने आज गौरव होतो आहे. आपआपल्या भागात कष्टाने वर्षानुवर्षे प्रयोग करणारे शेतकरी हीच खरी प्रकाशाचीही बेटं आहेत. ती वाढविण्यासाठी स्मार्ट शेतीची संकल्पना पुढे नेली पाहिजे,’ असे उद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची बेटं आहेत. या बेटांचा स्मार्ट ॲवॉर्डच्या निमित्ताने आज गौरव होतो आहे. आपआपल्या भागात कष्टाने वर्षानुवर्षे प्रयोग करणारे शेतकरी हीच खरी प्रकाशाचीही बेटं आहेत. ती वाढविण्यासाठी स्मार्ट शेतीची संकल्पना पुढे नेली पाहिजे,’ असे उद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

शेतीच्या भविष्यकालीन वाटचालीत प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याला ज्ञानी अर्थातच 'स्मार्ट' व्हावे लागेल. ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग करणारे शेतकरी संजीव माने किंवा भात शेती, फळबागेत झोकून दिलेले अनिल पाटील असोत; ही सर्व स्मार्ट शेतीची उदाहरणं आहेत.

राज्यातील कृषी पदवीधरदेखील चांगली शेती करीत आहेत. प्रयोगशील शेती करणारे प्रतापराव चिपळूणकर हे कृषी पदवीधरच आहेत. विविध भागांत प्रयोगशील शेती करणाऱ्या कृषी पदवीधरांच्या उपक्रमांचे संकलन कृषी विभागाने करावे, असेही श्री. गायकवाड यांनी सुचविले.

'ॲग्रोवन'चा मी पहिल्या अंकापासून वाचक आहे. चांगले काही वाचायचे असल्यास ॲग्रोवन वाचावा लागतो. संघर्ष किंवा आंदोलन असले की माध्यमांचे प्रतिनिधी गोळा होतात. मी देखील ते अनुभवतो. मात्र, चांगल्या घडामोडींसाठी मला 'ॲग्रोवन' वाचावा लागतो. माहितीच्या रूपाने शेतकऱ्यांना ज्ञानी करणारा हा उपक्रम आहे. मी देखील गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीविषयक कायद्यांची माहिती देत आहे. एकविसाव्या शतकाकडे जाणारा शेतकरी ज्ञानमय करावा लागेल. विदेशात अनाकलनीय शिक्षण घेण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांना त्यांना हवी ती माहिती देण्याचे उपक्रम कृषी क्षेत्रात उपयुक्त ठरतील.

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...