agricultural stories in Marathi, water management award for village, Umeshchandra Sarangi | Agrowon

पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक लाखाचे बक्षीस : सरंगी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी व्यवस्थापनामध्ये चांगले काम करेल, त्या गावाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड वितरणाच्या कार्यक्रमात रिव्हुलीस इरिगेशन इंडिया प्रा. लिमिटेडचे सल्लागार उमेशचंद्र सरंगी यांनी केली. सकाळ ॲग्रोवनच्या वतीने आयोजित ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड पुरस्कार वितरण कार्यक्रमात उमेशचंद्र सरंगी बोलत होते.

पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी व्यवस्थापनामध्ये चांगले काम करेल, त्या गावाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड वितरणाच्या कार्यक्रमात रिव्हुलीस इरिगेशन इंडिया प्रा. लिमिटेडचे सल्लागार उमेशचंद्र सरंगी यांनी केली. सकाळ ॲग्रोवनच्या वतीने आयोजित ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड पुरस्कार वितरण कार्यक्रमात उमेशचंद्र सरंगी बोलत होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोअर चार्जरचे संस्थापक संचालक राहुल बाकरे म्हणाले की, मी अमेरिकेत राहिलो असलो तरी शेतीशी नाळ कायम ठेवली आहे. आम्ही शेतीमध्ये बोअर चार्जर हा अभिनव प्रयोग घेऊन उतरलो आहोत. सध्या सर्वांनाच पाणीटंचाई जाणवत आहे. भूगर्भातील पाणी कमी होत आहे. आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो. मात्र हे पाणी वाहून जाते. हे पाणी बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भात कसे जिरवता येईल याबाबत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो.

महारयत ॲग्रो इंडिया प्रा. लिमिटेडचे संचालक सुधीर मोहिते म्हणाले की, गेल्या दोन वर्षापूर्वी महारयत ॲग्रो इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसाय सुरू करून दिला आहे. राज्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणात शेती आधारित उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा ॲग्रोवनचा उपक्रम कायमस्वरूपी राहावा.

निरामय ॲग्रो सोल्युशन्स प्रा. लिमिटेडच्या संचालिका डॉ. अमृता चांदोरकर म्हणाल्या की, मानवी आरोग्यासाठी ऊर्जा महत्त्वाची आहे. सकस अन्नधान्यासाठी शेतीदेखील चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. प्रत्येक शेतकरी प्रयोगशील झाला पाहिजे. आम्ही पिकांसाठी पंचतत्त्व ऊर्जेची संकल्पना पुढे आणली. निसर्गाचा समतोल हा आमचा प्रमुख उद्देश आहे.

सिस्टिमा बायोचे मुख्य कार्यकारी संचालक अलेक्स एटन म्हणाले, की आम्ही ७० देशांतील शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत बायोगॅस तंत्रज्ञान पोचवीत आहोत. बायोगॅसच्या माध्यमातून शेतावरच शाश्वत ऊर्जानिर्मिती, वीजनिर्मिती, बायोगॅस स्लरीचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करता येतो. याचबरोबरीने येत्या काळात बायोगॅस आधारित विविध तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवीत आहोत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


फोटो गॅलरी

इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...