agricultural stories in Marathi, weather forecast by Dr. Ramchandra Sable | Page 2 ||| Agrowon

महाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 8 जून 2019

महाराष्ट्रातील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. केरळमध्ये ८ जून दरम्यान माॅन्सून दाखल होऊन पुढील प्रवास वेगाने होण्यास हवेचे दाब अत्यंत अनुकूल बनत आहे. ९ जून रोजी महाराष्ट्राचे पूर्व, पश्‍चिम व मध्यभागावरही १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. माॅन्सून वेगाने पुढे सरकेल. दिनांक ८ व ९ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी पार करून माॅन्सून उत्तर दिशेने कोकण किनारपट्टी व्यापून दिनांक ११ रोजी मुंबईसह कोकणात व दक्षिण महाराष्ट्राच्‍या भागात पाऊस सुरू होईल.

महाराष्ट्रातील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. केरळमध्ये ८ जून दरम्यान माॅन्सून दाखल होऊन पुढील प्रवास वेगाने होण्यास हवेचे दाब अत्यंत अनुकूल बनत आहे. ९ जून रोजी महाराष्ट्राचे पूर्व, पश्‍चिम व मध्यभागावरही १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. माॅन्सून वेगाने पुढे सरकेल. दिनांक ८ व ९ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी पार करून माॅन्सून उत्तर दिशेने कोकण किनारपट्टी व्यापून दिनांक ११ रोजी मुंबईसह कोकणात व दक्षिण महाराष्ट्राच्‍या भागात पाऊस सुरू होईल. दिनांक १२ जून रोजी व १३ जून रोजी दक्षिणेकडून उत्तर दिशेने त्याची वाटचाल सुरूच राहील.

  • दिनांक ११ जून रोजी अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून १५० किलोमीटर अंतरावर जोरदार चक्राकार वारे वाहतील. त्याचे रूपांतर लहान चक्रीवादळात होईल. ते वेगाने पुढे सरकेल.
  • दिनांक १२ जून रोजी कर्नाटक व महाराष्ट्रातील कोकणच्या दिशेने चक्राकार वेगाने समुद्र किनारपट्टीचे दिशेने ढगांचा मोठा समूह वाहून आणतील. कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरवात होईल.
  • दिनांक १३ जून रोजी ते उत्तरेचे दिशेने अरबी समुद्रातून पुढे सरकेल. संपूर्ण किनारपट्टीत कोकणात पाऊस सुरूच राहील. तसेच गुजरातचे दिशेने हे वादळ सरकेल. त्या वेळी महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होतील आणि माॅन्सून पावसाचा जोर कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होईल.
  • त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातही दिनांक १४ व १५ जून पर्यंत माॅन्सून पोचेल. पाऊस सुरू होईल.
  • दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्राचा संपूर्ण भाग मान्सून व्यापेल. गुजरात भागात तो पोचेल. अशाप्रकारे माॅन्सूनच्‍या वाटचालीसाठी या आठवड्यातील हवामान घटक अनुकूल राहतील.

१. कोकण ः कमाल तापमान ठाणे ३८ अंश, सिंधुदुर्ग व रायगड ३५ ते ३६ अंश, रत्नागिरी ३२ अंश सेल्सिअस राहिल. किमान तापमान सिंधुदुर्ग २६ अंश, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८८ टक्के, रायगड व ठाणे ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ५२ ते ५६ टक्के व ठाणे जिल्ह्यात ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर, दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून, इतर जिल्ह्यातही पाऊस सुरू होईल.

२. उत्तर महाराष्ट्र ः कमाल तापमान नाशिक ३८ अंश, नंदुरबार ४० अंश, धुळे व जळगाव ४५ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान नाशिक २५ अंश, धुळे, नंदुरबार व जळगाव येथे २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार ७५ टक्के, धुळे ६९ टक्के, जळगाव ४९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात २३ टक्के, धुळे, नंदुरबार व जळगाव येथे १२ ते १४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा कमाल ताशी वेग वाढून २१ ते २८ कि.मी. व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पावसास या आठवड्यात सुरवात होईल.

३. मराठवाडा ः कमाल तापमान औरंगाबाद ४३ अंश, जालना व बीड ४५ अंश, उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथे ४६ अंश, परभणी व हिंगोली ४७ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ४२ ते ४७ टक्के, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३० ते ३८ टक्के, नांदेड जिल्ह्यात २५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे.

४. उत्तर विदर्भ ः कमाल तापमान बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत ४४ अंश, अकोला व अमरावती ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची आर्द्रता वाशीम २५ टक्के, अमरावती ४२ टक्के, तर अकोला व बुलढाणा ४५ ते ५० टक्के राहील. दुपारची आर्द्रता वाशीम, अकोला ३२ टक्के, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत २० ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. व दिशा वायव्येकडून राहील.

५. मध्य विदर्भ ः येथे कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ २९ टक्के, वर्धा व नागपूर येथे ४५ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ २१ टक्के, नागपूर ३२ टक्के व वर्धा २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी व दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

६. पूर्व विदर्भ ः येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर २५ टक्के, गडचिरोली ५५ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली ४२ टक्के व उर्वरित जिल्ह्यात १५ ते २४ टक्के राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

७. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः येथे कमाल तापमान सोलापूर ४५ अंश, नगर ४१ अंश व उर्वरित जिल्ह्यात ३४ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के, पुणे ६५ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७६ टक्के, नगर जिल्ह्यात ६० टक्के व सोलापूर जिल्ह्यात ५० टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत २१ ते २४ टक्के आणि पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३१ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते २४ कि.मी. राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.

कृषीसल्ला ः
१. या आठवड्यात महाराष्ट्रात माॅन्सूनचे आगमन होईल. त्यानंतर जमिनीत ६५ मिलीमीटर ओलावा झाल्यानंतर पेरणी सुरू करावी. धूळ वाफ पेरणी टाळावी. अन्यथा पावसात मोठी उघडीप झाल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येते.
२. कोरडवाहू भागात उताराला आडवे सारे पाडावेत, त्यामुळे जल व मृदसंधारण होईल.
३. शक्‍यतो कडधान्याच्या पेरण्या प्रथम कराव्यात.
४. कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके व त्यांच्या कमी कालावधीच्या जातींची पेरणी करावी.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...