agricultural stories in Marathi, weekly weather forcast | Agrowon

आठवड्याचे हवामान : राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 13 एप्रिल 2019

महाराष्ट्रात हवामानात वेगाने होणारे बदल या आठवड्यात जाणवतील. दुष्काळाच्या काळात पावसामुळे दिलासा मिळेल. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढगनिर्मिती होईल.

महाराष्ट्रात हवामानात वेगाने होणारे बदल या आठवड्यात जाणवतील. दुष्काळाच्या काळात पावसामुळे दिलासा मिळेल. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढगनिर्मिती होईल.

ढगांचा समूह पश्‍चिमेकडे जाऊन उत्तरेकडून पूर्वेचे दिशेने व दक्षिणेकडून उत्तरेचे दिशेने वारे वाहून आणतील. दिनांक १३ एप्रिल रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी होतील. तसेच नैर्ऋत्य दिशेस १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. साहजिकच वारे नैर्ऋत्येकडून तसेच दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे अग्नेयेकडून व दक्षिणेकडून वारे उत्तर दिशेने वाहतील. दिनांक १४ ते १८ एप्रिल रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाबात किंचित वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल राहतील. मात्र पूर्वेस १०१०, वायव्येस १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे पूर्वेकडून व अग्नेयेकडून मोठ्या प्रमाणात ढग लोटतील व महाराष्ट्रात दिनांक १३ पासून पावसाचे वातावरण तयार होऊन दिनांक १६ व १७ तारखेस चांगला पाऊस होईल. दिनांक १८ रोजी पूर्व भागात पाऊस होईल.
संपूर्ण हिंदी महासागराचे बाजूने हवेचे दाब वाढतील. आणि मोठ्या प्रमाणात वारे उत्तर दिशेने व पूर्व दिशेने वाहतील व अग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून प्रवेश करून मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. वादळीवारे व विजांचे कडकडाटासह तसेच ढगांचे गडगडाटासह पाऊस होईल.

कोकण
रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६२ टक्के राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८१ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
 नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील; तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस राहील, तर जळगाव जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १८ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते २८ टक्के राहील. आणि धुळे जिल्ह्यात ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ९ ते ११ टक्के राहील तर नाशिक जिल्ह्यात १७ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

मराठवाडा
 लातूर व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, बीड, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील.
औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर
जालना जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील तसेच नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के राहील. हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ टक्के राहील. बीड,
परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १० टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ
 बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. तसेच बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील, तर अमरावती व अकोला जिल्ह्यांत ३० ते ३५ टक्के आणि बुलढाणा जिल्ह्यात ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात १४ टक्के इतकी कमी राहील तर बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. कोला जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. मध्य विदर्भात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील. नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील. जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे.

पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमन तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील, तसेच गडचिरोली जिल्ह्यात ती ६७ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील. गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. पावसाची शक्‍यता आहे. अल्पसा पाऊस होईल.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे व नगर जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील, कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के, सोलापूर व पुणे जिल्ह्यात ३० ते ३२ टक्के, सातारा जिल्ह्यात ४९ टक्के, सांगली जिल्ह्यात ५१ टक्के व कोल्हापूर जिल्ह्यात ७९ टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ती २२ टक्के पुणे व सातारा जिल्ह्यात १५ ते १६ टक्के व नगर जिल्ह्यात ११ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • येत्या आठवड्यात १६ ते १७ तारखेस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • हळदीची काढणी करून उकडून शिजवून वाळत घातली असल्यास ती गोळा करून ढीग करून ताडपत्रीने झाकून ठेवावी.
  • पक्व झालेल्या अंजीर फळांची काढणी करून विक्री करावी.
  • फळबागांना अाच्छादन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीसाठी बँकर्स समितीची बैठक...मुंबई : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ...
मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जामुंबई : देशांतर्गत विमान उड्डाणे उद्यापासून सुरू...
टोमॅटो प्रश्नी समाधानकारक निदान,...पुणे : विषाणूग्रस्त टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना...
सातारा जिल्हा बॅंकेस १३३.९५ कोटींचा...सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
सिंदखेड ग्रामस्थांना होमिओपॅथी औषधाचे...अकोला  ः ‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव सध्या...
राज्यसभेवर व्हावी प्रयोगशील शेतकऱ्यांची...अमरावती ः भारताच्या राष्ट्रपतींव्दारा राज्यसभेवर...
थेट निविष्ठा पुरवठ्यातून वेळ-पैशांची...यवतमाळ ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत...
कापसाप्रमाणेच नाफेडच्या तूर खरेदीची गती...कलगाव, जि. यवतमाळ ः कापसाप्रमाणेच नाफेडव्दारे होत...
यवतमाळ जिल्ह्यातील २४ गावे माॅन्सून...यवतमाळ ः जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या...
सौंदड येथे थेट निविष्ठा वितरण उपक्रमाचा...गोंदिया ः कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना निविष्ठा...
नागपूरमधून २५ हजार शेतकऱ्यांकडून होणार...नागपूर ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक...
अमरावतीत पाणीटंचाईची ६६९ गावांमध्ये...अमरावती ः माॅन्सूनचे आगमन की दिवसांवर असतानाच...
मते मांडण्यास संधी नसल्याने नगर 'जिप'ची...नगर  ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा...
परभणी जिल्ह्यात बीटी कपाशीची सहा लाख...परभणी ः परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. २५) पासून...
बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला...नगर   ः एका क्षणी सर्वाधिक कोरोनाबाधित...
नगर : शेतकरी घरीच तपासत आहेत सोयाबीन...नगर  ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा...
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू...पुणे  : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू...
लग्नासाठी पन्नास व्यक्तींच्या...नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे...
परभणी, हिंगोलीत २८ हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
कृषी पदव्युत्तरच्या ऑनलाइन परीक्षेचा...पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर...