अतिउष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज

अतिउष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज
अतिउष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रातील कमाल व किमान तापमानात वाढ होऊन उत्तर महाराष्ट्रात ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत, मराठवाड्यात ४४ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत, तसेच ४४ ते ४५ अंश सेल्सिअस आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढण्याची शक्‍यता असून, त्यामुळे महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कलपर्यंत कमी होणे शक्‍य आहे. किमान तापमानातही वाढ होण्याची शक्‍यता असून सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत प्रचंड घट होईल, उष्णतेची लाट येईल आणि तापमान या आठवड्यात अति उष्ण व कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍य असून, काही ठिकाणी पावसाची  शक्यता आहे.

कोकण  ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी जिल्ह्यात ते ३८ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ टक्के राहील; रायगड जिल्ह्यात ५४ टक्के राहील; तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८६ टक्के राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ ते ३६ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र  नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील; तर नाशिक व धुळे जिल्ह्यात २५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील; तर नाशिक जिल्ह्यात २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के इतकी कमी राहील.

मराठवाडा मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. लातूर व औरंगाबाद जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड, बीड, परभमी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानातही वाढ होईल. जालना जिल्ह्यात किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड व बीड जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील तसेच बीड व परभणी जिल्ह्यात ती १६ टक्के राहील. हिंगोली जिल्ह्यात १८ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात १९ टक्के तर नांदेड व लातूर जिल्ह्यात २० ते २३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ८ ते १० टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा वेग वाढेल.

पश्‍चिम विदर्भ  अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. तर अकोला जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशिम जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १८ ते २२ टक्के राहील. तसेच बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशिम जिल्ह्यात १० टक्के राहील, अमरावती जिल्ह्यात १५ टक्के राहील तसेच बुलढाणा जिल्ह्यात २० टक्के आणि वाशिम जिल्ह्यात ३० टक्के राहील.

मध्य विदर्भ कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के राहील तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात २९ ते ३३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किलोमीटर राहील. नागपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ती आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात ४२ ते ४६ टक्के राहील. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात २८ ते ३६ टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २० टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ३० टक्के राहील व चंद्रपूर जिल्ह्यात ११ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. तर नगर जिल्ह्यात ते ४४ अंश सेल्सिअस राहील व सातारा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे व नगर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस व कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १९ ते २० टक्के राहील. तर पुणे जिल्ह्यात २६ टक्के आणि सातारा व सांगली जिल्ह्यात ३९ ते ४८ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १६ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

  • कमाल व किमान तापमानात वाढ होऊन आर्द्रतेत घट होणार असल्याने या आठवड्यात पिके, जनावरे आणि कोंबड्यांची पाण्याची गरज वाढेल. पिकांना ८ दिवसांच्या अंतराने किंवा ठिबकने दररोज गरजेनुसार पाणी द्यावे.
  • जनावरांना दिवसातून ४ ते ५ वेळा पाणी द्यावे. कोंबड्यांना मुबलक पाणी द्यावे.
  • पिकांच्यावर केओलीन द्रावणाची फवारणी करावी. फळबागांना आच्छादन करावे.
  • नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना सावली करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com