उष्ण तसेच ढगाळ हवामानाची शक्यता

हवामान सल्ला
हवामान सल्ला

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत व सह्याद्री पर्वतरागांवर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक दाब तर महाराष्ट्राच्या मध्यावर दक्षिण उत्तर दिशेने १००८ हेप्टापास्कल इतका सामान्य हवेचा दाब राहील. अधिक दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वारे वाहतील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील; तर संपूर्ण विदर्भात कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस, उर्वरित अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस आणि गोंदिया व बुलढाणा जिल्ह्यांत ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. दिनांक ११ व १२ मे रोजी महाराष्ट्रातील पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागात पावसाची शक्‍यता असून उर्वरित कोकण, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील.

कोकण रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४८ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. नाशिक धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्दता ५३ टक्के राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ६४ ते ६९ टक्के राहील; तर नाशिक जिल्ह्यात ७७ टक्के राहील. जळगाव व धुळे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १४ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. तर नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २६ टक्के राहील.

मराठवाडा लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. लातूर, परभणी औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना व बीड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ टक्के राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते ५४ टक्के राहील. जालना व लातूर जिल्ह्यात ५० ते ५१ टक्के राहील. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के इतकी किमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील; तर लातूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता  ३३ ते ३९ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता  १२ ते १८ टक्के राहील.

मध्य विदर्भ मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात वेगवेगळे म्हणजे वर्धा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के, नागपूर जिल्ह्यात ३५ टक्के व वर्धा जिल्ह्यात २८ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के, नागपूर जिल्ह्यात २१ टक्के व वर्धा जिल्ह्यात केवळ १० टक्के राहील.

पूर्व विदर्भ गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ते ४३ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. पूर्व विदर्भात हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के राहील. तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३८ टक्के राहील. गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत १५ ते १६ टक्के राहील तर भंडारा जिल्ह्यात ८ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील, सांगली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के राहील; सातारा जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली व पुणे जिल्ह्यात ७२ ते ७८ टक्के राहील. तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५५ ते ६४ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ टक्के राहील. नगर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २९ टक्के राहील. तर सोलापूर जिल्ह्यात ती १५ टक्के राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com