agricultural stories in Marathi, weekly weather forecast | Agrowon

उष्ण-कोरडे हवामान, अल्पशा पावसाची शक्‍यता

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 11 मे 2019

महाराष्ट्राच्या मध्य भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल.

महाराष्ट्राच्या मध्य भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल.

कोकण
रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते ३७ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ते २५ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ८३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ते २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. नंदूरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. तसेच नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आद्रता १७ ते २२ टक्के राहील.

मराठवाडा
बीड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. तर औरंगाबाद जिल्ह्यात ते ३९ अंश सेल्सिअस राहील. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील आणि जालना जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. लातूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १९ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. मराठवाड्यात पावसाची शक्‍यता आहे.

पश्‍चिम विदर्भ
 बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर अकोला व वाशीम मध्ये नैर्ऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता आहे.

 मध्य विदर्भ
 यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील; तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ६० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता आहे.

पूर्व विदर्भ
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २० ते २६ टक्के राहील तर गोंदिया जिल्ह्यात व गडचिरोली जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता आहे.

दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. तसेच कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात  सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील. तर नगर जिल्ह्यात ४३ टक्के राहील. सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५३ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते १९ टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा पुणे व नगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ती नैर्ऋत्येकडून राहील. सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

कृषी सल्ला

  • जमिनीची पूर्वमशागत करावी. बांधबंदिस्तीची कामे, उतारास आडवी नांगरट व कुळवाची पाळी द्यावी.
  • आले, हळद लागवडीचे नियोजन करावे. हळदीत मिरचीचे आणि आल्यात पपईचे आंतरपीक घ्यावे.
  • फळबागा व फळ भाज्यांना ठिबक सिंचनने पाणी द्यावे. फळबागेत आच्छादनांचा वापर करावा.
  • कोरडवाहू भागात पावसाचे पाणी मुरावे म्हणून मोठे वाफे तयार करावेत.

- डॉ.रामचंद्र साबळे

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

 

 


इतर ताज्या घडामोडी
बारावीचा परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्केपुणे ः कोरोना संकटात १२ वी परीक्षेचा निकाल कधी...
नवविवाहीत जोडप्याने केले कामगंध...सांगली  ः चिकुर्डे (ता. वाळवा) येथील नवरदेव...
पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने होणार...मुंबई : मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत...
शेतकरी, शेतमजुरांना न्याय न मिळाल्यास...नाशिक : कोरोना महामारीमुळे संकट शेतकरी, शेतमजूर व...
पुण्यातील लाॅकडाउनमुळे कोल्हापुरातील...कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुण्यात...
सिंधुदुर्गात अतिवृष्टी, वादळामुळे सव्वा...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर...
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तत्काळ पीककर्ज...नाशिक : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
गरजेपेक्षा जास्ती युरिया वापरानेच टंचाई...नगर ः युरिया खताची अजिबात टंचाई नाही. पाहिजे...
पुणे जिल्ह्यात पावसाअभावी भात लागवडी...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील...
सोलापुरात आजपासून ३१ गावांमध्ये कडक...सोलापूर : कोरोनोचा शिरकाव ग्रामीण भागातही वाढत...
खामगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा...अकोला ः वऱ्हाडात गेल्या २४ तासांपासून पावसाने ठाण...
यवतमाळ जिल्ह्यात एक हजार कोटींचे...यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा...
‘कोविड’च्या शिक्क्यावरून युवा सेना...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
राष्ट्रीयीकृत बँकांचा कर्ज निधी वळता...भंडारा : कर्ज वाटपात सहकार क्षेत्राच्या तुलनेत...
पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला...मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या...
लाॅकडाउनमुळे नाशिकमधील शेतकऱ्यांचे १०...नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला...
पुण्यातील लॉकडाउनमुळे  साताऱ्यातील...सातारा  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल...
नगर जिल्ह्यातून पुण्याला होणारा ...नगर ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने सोमवारी...
सोलापुरातून पुण्यात होणारा ७०० टन ...सोलापूर  ः ‘कोरोना’मुळे पुण्यात पुन्हा...
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील टाळेबंदी...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि...